मा. शरद पवार इन्सपायर फेलोशिप साठी अर्ज भरण्यास सुरू

Rajan garud
0

मा. शरद पवार इन्सपायर फेलोशिप साठी अर्ज भरण्यास सुरू 



आदरणीय पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने साहेबांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने 'शरद पवार इनस्पायर फेलोशीप'ची सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली या फेलोशिपची सुरुवात करण्यात आली. 

याअंतर्गत कृषी (‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर) , साहित्य ('शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर ’) आणि शिक्षण (‘शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन एज्युकेशन’) या क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत केले जाणार आहे.  


कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती व सह्याद्री फर्म्स नाशिक तसेच शिक्षण फेलोशिपसाठी एमकेसीएल फाउंडेशन व विवेक सावंत यांचे बहुमोल सहकार्य मिळत आहे. कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रोफेसर निलेश नलावडे, साहित्य क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रा. नितीन रिंढे तर शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी मा. विवेक सावंत हे मुख्य समन्वयक म्हणून भूमिका पार पाडत आहेत. आज या फेलोशिपच्या तिसऱ्या वर्षासाठीची घोषणा आम्ही करीत आहोत. ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे.


कृषी, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील फेलोशीपसाठी

  https://sharadpawarfellowship.com 

या वेबसाईटवर आपण २५ ऑगस्ट ते दिनांक २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत राज्यभरातून ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करु शकाल. आपले अर्ज दि. २० ऑक्टोबर २०२३ नंतर स्वीकारले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी. 


आलेल्या सर्व प्रस्तावांची तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली २० ऑक्टोबर २०२३ ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत काळजीपूर्वक तपासणी होऊन निवडप्रक्रिया पूर्ण होईल. निवडसमितीच्या वतीने ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन ॲग्रीकल्चर’ साठी ८०,  ‘शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशीप’ साठी १० अशा तर शरद पवार इन्स्पायर शिक्षण फेलोशिप साठी ३० अशा एकूण १२० फेलोंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या फेलोंची घोषणा दिनांक  २६ नोव्हेंबर २०२३ रोजी केली जाईल. दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी फेलोशिप मिळालेल्या फ़ेलोंना सन्मानपूर्वक फेलोशिप प्रदान केल्या जाणार आहेत. या उपक्रमाला पहिल्या वर्षापासून भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार तसेच पहिल्या व दुसऱ्या वर्षी फेलोशीप मिळालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. ते सर्वजण अतिशय उत्तमरीत्या काम करत आहेत याचे आम्हाला समाधान आहे व त्यांचा वेळोवेळी नियमितपणे आढावा घेतला जातो.


Yashwantrao Chavan Centre



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)