सी सी आर टी नवी दिल्ली च्या प्रशिक्षणासाठी शिक्षकांची नोंदणी करणे बाबत..

Rajan garud
0

सी सी आर टी नवी दिल्ली च्या प्रशिक्षणासाठी शिक्षकांची नोंदणी करणेबाबत

 प्रति,

उपसंचालक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण,मुंबई,

प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)

शिक्षणाधिकारी, माध्यमिक/प्राथमिक, (सर्व)

शिक्षण उपनिरीक्षक, (दक्षिण/पश्चिम/उत्तर)मुंबई 

प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न.प.(सर्व)


 विषय* - सी सी आर टी नवी दिल्ली च्या प्रशिक्षणासाठी शिक्षकांची नोंदणी करणे बाबत



संदर्भ - प्रस्तुत कार्यालयाचे  दि.   २३/०५/२०२३ चे पत्र

 

 

  उपरोक्त संदर्भिय विषयानुसार आणि उपरोक्त पत्रानुसार  सी सी आर टी नवी दिल्ली या संस्थेतर्फे दरवर्षी शिक्षकांसाठी कला आणि हस्तव्यवसाय या विषयांच्या बाबतची प्रशिक्षणे आयोजित केली जातात सन 2023- 24 मध्ये सी .सी. आर .टी. च्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्यासाठी परिषदेतील कला क्रीडा विभागातर्फे पुढील लिंक तयार करण्यात आलेली आहे.

https://forms.gle/fbd3SpVAtjrbu26R6

तरी आपल्या कार्यक्षेत्रातील इच्छुक शिक्षकांना सीसीआरटी प्रशिक्षणास जाण्यासाठी सदर लिंक वर नोंदणी करण्याचे अवगत करावे... तसेच या लिंकचा आपल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा....

सदर लिंक भरणाऱ्या इच्छुक सुलभकांपैकी योग्य उमेदवाराची निवड करण्याचे सर्व अधिकार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे राहतील, याची नोंद घ्यावी... लिंक भरणाऱ्या सुलभकांचा विविध राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कामकाजाचा अनुभव विचारात घेऊन व सदर काम पुढे नेण्याची इच्छा असणाऱ्या शिक्षकांमधून गुणवत्तेच्या आधारे संबंधित शिक्षकांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल....लिंक मध्ये नोंदणी केल्यानंतर संबंधित सुलभकांची प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर  सुलभकास  प्रशिक्षणास जाणे बंधनकारक असेल.प्रशिक्षण  ऐनवेळी रद्द करण्यासाठी दिले जाणारे कोणतेही कारण विचारात घेतले जाणार नाही वा या संदर्भात कोणतीही सबब विचारात घेतली जाणार नाही...



संचालक 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)