11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2022-23
11th Admission Process 2022-23
सन २०२२-२३ मध्ये राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR) तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ.११ वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार करण्यात येतील. संचालनालयाचे पत्र जाक्र. २४१८ दि. १३/०४/२०२२ अन्वये प्रवेश प्रक्रियेबाबत आवश्यक पूर्वतयारी करणेबाबत आपणास सूचित करण्यात आलेले आहे. त्यानुसार आवश्यक कार्यवाही आपण केलेली असेल.
मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ.११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याने या शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या इ.११वी प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सोबतच्या वेळापत्रकानुसार सुरु करणेत येत आहे.
विद्यार्थ्यांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन आपणास प्रवेश घ्यावयाच्या क्षेत्राची निवड करावी व प्रवेशासाठी आवश्यक पुढील कार्यवाही करावी.
वेबपोर्टल 👉👉👉👉 https://11thadmission.org.in
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे टप्पे :-
- विद्यार्थी नोंदणी / Student Registration
- प्रवेश अर्ज भाग-१ भरणे.
( भरलेला अर्ज आपली माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्र यांचेकडून प्रमाणित करुन घेणे. )
- पसंतीक्रम देणे , भाग-२ (Option Form) भरणे.
प्रवेश प्रक्रियेची कार्यपद्धती :-
◆ विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश दोन प्रकारे घेता येतील.1 ) केंद्रीय प्रवेश फेऱ्यांद्वारे Allotment मिळवून. (CAP Seats) किंवा
2 ) कोटांतर्गत राखीव जागांवर संबंधित विद्यालयास संपर्क साधून प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भाग-१ भरुन प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर (CAP Seats) करीता आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यास अर्जाचा भाग-२ पसंतीक्रम भरुन विद्यालये निवडता येतील. (किमान १ व कमाल १०)
● विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश फेरीमध्ये Allotment देण्यात येईल व त्यानुसार विद्यार्थ्यांनी संबंधित मिळालेल्या विद्यालयास संपर्क साधून आपला प्रवेश दिलेल्या वेळेत निश्चित करावयाचा आहे.
👉👉 11 वी ऑनलाईन प्रवेश फॉर्म ( Student Registration ) कसा भरावा ?
👉👉 अर्ज भरतांना केवळ ज्या विद्यार्थ्यांना मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका या शहारांमधील राज्यमंडळ संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असेल अशाच विद्यार्थ्यांनी या प्रणालीच्या माध्यमातून अर्ज करावा. राज्यातील उर्वरित ठिकाणच्या प्रवेशासाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा.
👉👉 विद्याथ्यांकरीता अर्ज भरण्याच्या सरावासाठी विशेष सुविधा :- विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करता यावा , प्रत्यक्ष अर्ज भरणे सुलभ व्हावे यासाठी दिनांक २३ मे ते २७ मे २०२२ या कालावधीत पोर्टलवर Demo Login सुविधा देण्यात येत आहे. यामध्ये विद्याथ्यांनी अर्ज भरण्याचा सराव करावा. प्रत्यक्षात अर्ज भरण्याची कार्यवाही दि. ३० मे २०२२ पासून सुरु होईल त्यापूर्वी Demo Login मध्ये भरलेली माहिती नष्ट करण्यात येईल. प्रत्यक्ष अर्ज भरण्याची कार्यवाही सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने नोंदणी करून लॉगीन आयडी व पासवर्ड जपून ठेवावयाचा आहे. याबाबत पुरेशी जागरुकता करण्यात यावी.
विद्यालयांची ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यपद्धती :-
ज्या विद्यालयांनी UDISE नंबर घेतलेले नाहीत त्यांना तात्पुरता लॉगीन आयडी देण्यात येईल तथापि त्यांनी UDISE No. त्वरीत मिळविणे आवश्यक राहील.
अनुदानित वर्गासाठी लागू शासन विहित शुल्क दर आपोआप दर्शविण्यात येतील. उर्वरित बिना अनुदानित, स्वयंअर्थसहायित वर्गासाठी शुल्क दर विहित पद्धतीने निश्चित केले आहेत याची तपासणी करून ते पोर्टलवर अंतिम करावेत.