जागतिक महिला दिन मराठी भाषण 2022
Mahila Din speech in marathi 2022
women's day speech marathi 2022
इतिहास सांगतो आमुचा स्त्रीनेच शत्रू तुडवला !
लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला !!
जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला !!!
महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला !!
आजच्या कार्यक्रमाचे सन्मा. अध्यक्ष - आदरणीय व्यासपीठ - वंदनीय गुरुजनवर्ग जमलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो आणि महिला दिवस साजरा करण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम महिला भगिनीनो...!
आज 8 मार्च . सर्वजण आज आपण येथे महिला दिवस साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणा-या राजमाता जिजाऊ.
"मैं मेरी झांशी कभी नही दुंगी" असे ठमकावून इंग्रजां सोबत संघर्ष करणारी राणी लक्ष्मीबाई तसेच स्त्री शिक्षणाची महती ओळखून मुलीना स्त्रीयांना शिक्षणाची दारे खुली करून देणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रीयांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरवात करते.
8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्क वस्त्रोद्योगातील हजारो स्त्रियांनी रुटगर्स चौकात जमून दहा तास काम व काम करतो तिथे सुरक्षितता या मागण्या साठी ऐतिहासिक निदर्शने केली. याचबरोबरच लिंग -वर्ण-मालमत्ता आणि सर्व प्रौढ स्त्रियांना -पुरुषांप्रमाणे मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी केली.अमेरिकेतील कामगार स्त्रियांनी केलेल्याह्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ-क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने 8 मार्च हा "जागतिक महिला-दिन" म्हणून स्वीकारून साजरा करावा असा ठराव मांडला तो पासही झाला.आणि तेव्हा पासून 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करतात .
या दिवसाचा मुख्य हेतू हा महिला सबलीकरण करणे . परंतु तो साध्य होतोय का ? आपल्या जवळची कोणती स्त्री सबल आहे का? आपण स्वत: ला प्रश्न विचारा आहोत का आपण सबल? थोडा विचार करा एखादा दारु पिणारा नवरा तो बायकोला आजही रोज मारतो. कारण तिच्या पैशातून त्याला दारु पेऊन मजा करायची असते. पण आपण जातोका तिच्या मदतीला कधी? नवऱ्यानं सोडून दिलेल्या बायकोला आपल्या समाजात आहे का स्थान ? विधवा झालेल्या स्त्रीला मिळतो का कधी सन्मान? उलट आपणच तिच्याकडे तिनेच तर मारले नसेल तिच्या नवऱ्याला अश्या नजरेने बघतो. दर वर्षी होणाऱ्या हळदीकुंकूवाला एखाद्या विधवा स्त्री ला बोलवण्याची हिम्मत कोण करते का ? अहो घरात शुभकार्य असलं की अजूनही विधवा स्त्री ला बोलवावकी नाही यावर चर्चा होतात . एखाद्या स्त्रीचा विनयभंग किवा बलात्कार, अँसिड हल्ला झालेल्या मुलीला आपण सन्मान कधी देऊ ?
स्त्रियांच्या बाबतीत समाजाची मानसिकता आजही बदलेली नाही. महिला दिवस साजरा करण्याचा मूळ हेतूच अजून पर्यंत यशस्वी झालेला नाही . उलट ज्या स्त्रियांना हा महिला दिवस साजरा करायचा त्यांनी स्वत:च्या सोयीने त्या दिवसाचा अर्थ काढलाय हे खरच खूप भयंकर आहे .
एखादी स्त्री असून आपण दुसऱ्या स्त्रीच्या भावना कधीच समजू शकत नाही का ? तिच्या अडचणीत त्या स्त्रीला मदत करू शकत नसूतर हा दिवसच का साजरा करायचा ? आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा मौजमजा मस्ती करण्यासाठी असतो अशी अशी जर तुमची समजूत असेल तर का करायचा हा दिवस साजरा ? पुरुषा पेक्षा आणि पुरुषा शिवाय पण महिला समर्थपणे नाहीतर त्याच्यापेक्षा उत्तमरितीनं कुटुंब चालवतात हे मी स्वतः बघितले आहे .
खरच अशा महिलांकडे पाहिलं की मनात वाटतं जागतिक महिला दिनाचं उद्दिष्ट थोडं का होईना साध्य झाल आहे आणि होत आहे .
शेवटी एवढेच म्हणेन......
स्त्री म्हणजे जन्मदाती,
स्त्री म्हणजे संस्कृती,
स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा,
स्त्री म्हणजे घराच घरपण,
स्त्री म्हणजे महान कार्य,
अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा.
माझ्या आयुष्या मधील सर्व महिला - स्त्री वर्गाला तसेच माझे आयुष्य प्रेमाने फुलवून मायेची , सुरक्षिततेची पांघरण घालून माझेहे आयुष्य सुंदर बनवल्या बद्दल शत्शत् नमन करते........
धन्यवाद माझ्या सर्व महिला भगिनींनो .जय हिंद || जय महाराष्ट्र||
जागतिक महिला दिन भाषण मराठी | mahila din bhashan marathi | महिला दिन निबंध | Jagtik Mahila Din Bhashan Marathi | Intarnational women's day speech in marathi 2022
महिला दिन भाषण
"ज्याला स्त्री 'आई' म्हणून कळली,
तो जिजाऊचा शिवबा झाला,
ज्याला स्त्री 'बहिण म्हणून कळली
तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला,
ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणून कळली,
तो राधेचा श्याम झाला, आणि
ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली,
तो सीतेचा राम झाला !'
प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या स्त्रीशक्तीला प्रथम माझा मानाचा मुजरा !
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ,विचारमंच,गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो !
शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्या मागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणा साठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुखात करतो.
स्त्री म्हणजे वात्सल्य,
स्त्री म्हणजे मांगल्या
स्त्री म्हणजे मातृत्व,
स्त्री म्हणजे कर्तृत्व
8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे. आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच.... कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला जातो, असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात, उत्साहात साजरा केला जातो.
इतिहासाची पाने चाळली तर... मार्च १९०८ रोजी न्युयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रूटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या.
१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी किलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ (मार्च हा 'जागतिक महिला दिन' म्हणून स्विकारावा असा ठराव क्लारा झेटकिन यांनी मांडला, तो पास झाला आणि तेव्हापासून (८ मार्च ) यादिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला.
COVID- 19 साथीच्या काळात आरोग्यसेवा कामगार, इनोव्हेटर इत्यादी म्हणून जगभरातील मुली आणि स्त्रियांचे योगदान अधोरेखित करते.महिलांनी COVID-19च्या या संकटातसुद्धा किलेले कार्य नक्कीच गौरवास्पद आहे, म्हणूनच म्हणावेसे वाटते,
'तुझ्या उत्तुंग भरारी पुढे,
गंगनही ठेंगणे असावे.
तुझ्या विशाल पंखाखाली,
विश्व ते सारे विसावे!"
आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे होय.
आज पुरुषांबरोबर स्त्रियादेखील सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत, परंतु आजदेखील स्त्री सुरक्षित नाही, हे खेदाने बोलावेच लागेन. लैंगिक शोषण, अत्याचार, हुंडाबळी, भृणहत्या या गोष्टींमुळे स्त्रियांच्या मुलींच्या मनात भीतीची, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मुलीचा जन्म झाल्या वर तिचा तिरस्कार केला जातो, स्त्रीयांचा अपमान किला जातो. स्त्री-पुरुष समानता ही आचरणात आणायला हवी, शेवटी एवढेच म्हणेन की,