महापरिनिर्वाण दिन निबंध lभाषण मराठी l Mahaparinirvan Din Marathi Essay
यावर्षी महापरिनिर्वाण दिन हा सोमवार, ६ डिसेंबर २०21 ला साजरा केला जाईल. या दिवशी चैत्यभूमी इथे विशेष व्यवस्था केली जाते. चैत्यभूमी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचे ठिकाण, इथेच बाबासाहेबांचे अंतिम संस्कार झाले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून भारतभरातून लाखो लोक बाबासाहेबांच्या दर्शनासाठी चैत्यभूमी ला भेट देतात. हे स्थान मुंबईमधील दादर याठिकाणी, समुद्रकिनारी आहे.
आम्हाला असे वाटते कि या वर्षी देखील लाखोच्या संख्येने लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी मुंबईमध्ये येतील. तसेच आम्हाला असा अंदाज आहे की, भारतातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा जसेकी निबंध, भाषण स्पर्धा आयोजित केल्या जातील. आपण कदाचित अशाच एका निबंध किंवा भाषण स्पर्धेत भाग घेतला आहात म्हणूनच आपण या ब्लॉग वरती आहात. आम्ही आपणास येथे महापरिनिर्वाण दिन / दिवस विषयी एक नमुना भाषण, निबंध आणि काही माहिती दिली आहे. आपण हि माहिती वाचून एकंदर संदर्भ घेऊ शकता आणि आणि त्याच्यावरून आपलं स्वतःचं भाषण, निबंध लिहू शकता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ मध्ये हे जग सोडले आणि हाच दिवस महापरिनिर्वाण दिन किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतातील अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेल्या त्यांच्या आजीवन प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी भारतभरातून लाखो लोक मुंबईमधील चैत्यभूमीला या दिवशी भेट देतात.
भारतीय राज्यघटनेचे जनक, बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर दलितांच्या हक्कासाठी लढले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच भारतातील दलितांना आरक्षण आणि सामाजिक समानता मिळाली. भारतातीलच नव्हे तर जगभरातील दलित लोक किंवा बुद्ध धर्माचे अनुयायी बाबासाहेबांना एक मसीहा मानतात.