सौ. शिल्पा बळवंत वनमाळी यांचा राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मान

Rajan garud
0

 सौ. शिल्पा बळवंत वनमाळी यांचा राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मान



  दिनांक  30 नोव्हेंबर 2021 रोजी व्हाइट पिकॉक हॉल ,मुंबई येथे  100 शिक्षक क्लब जालना यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय  शिक्षक सेवा गौरव पुरस्कार यावर्षी   पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा आगवन नवासाखरा (ता. डहाणू) शाळेच्या नवोपक्रमशील शिक्षिका सौ.शिल्पा बळवंत वनमाळी यांना  मान. शिक्षक आमदार श्री. विक्रम काळे साहेब व मान. आमदार श्रीम. मनिषाताई चौधरी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम ,साहित्यिक क्षेत्रातील दर्जेदार कथा व कवितांचे लेखन, तसेच  सामाजिक उपक्रमातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सौ. शिल्पा वनमाळी यांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

   याप्रसंगी सुप्रसिध्द अभिनेते श्री. अनिलजी गवस, मा.श्रीम. वैशाली ताई काकडे -विषय सहाय्यक -प्रादेशिक विद्या प्राधिकरण ,मुंबई   तसेच सहपोलीस निरीक्षक श्री. शैलेंद्र औटे साहेब, १००शिक्षक क्लब जालनाचे अध्यक्ष श्री . राजेभाऊ मगर सर, उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय राउतवड सर,  इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)