📝📝 संपत गायकवाड
(माजी सहाय्यक शिक्षण संचालक)
सर्व दागिने विकून वर्ग डिजिटल करणारी महावेडी शिक्षिका अन्नपूर्णा मोहन
(अंगावरील सोन्याचे दागिने विकून डिजिटल वर्गासाठी दोन लाखांपेक्षा अधिक खर्च करणारी देशातील पहिली शिक्षिका )लविल्लुपुरम पंचायत युनियनमधील सरकारी शाळेची प्राथमिक शिक्षिका. डिजिटल क्लासरुम, रंगीत खुर्च्यां, शानदार टेबल, कपाटे, डेस्क यासाठी सर्व दागिने विकले.
( अन्नपूर्णा मोहन ऐवजी "ज्ञानपूर्णा मोहन हे सार्थ नाव)
( मुलांचे इंग्रजी उच्चार सुधारण्यासाठी स्वतः फोनेटिक ब्रिटिश उच्चार शिकल्या. मुलांना सुरवातीला अवघड गेले, पण मुले अस्खलितपणे इंग्रजी बोलतात. अनेक व्हिडिओ शेअर केलेत.)
( अन्नपूर्णा इयत्ता तिसरीच्या शिक्षिका असून मुलांसाठी इंग्रजीची भरपूर पुस्तके खरेदी केली. मुलांसाठी कायमच उपलब्ध होतील अशी व्यवस्था केली.)
(अन्नपूर्णा मोहन सरकारी शाळेतील प्रामाणिक (Honest), समर्पित (Delicated) व सेवाभावी शिक्षिका आहेत.)
[मुलांची जिंदगी बदलण्यासाठी हायटेक एज्युकेशनचा प्रयोग पदरमोड करून सुरू केला.]
चेन्नई ( तामिळनाडू) विल्लुपुरम पंचायत युनियन समितीमधील सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षिका आहेत. इयत्ता तिसरीच्या त्या वर्गशिक्षिका आहेत. सरकारी शाळा असल्याने भौतिक सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत. खाजगी शाळेच्या तुलनेत आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे व विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी म्हणून त्या नेहमी धडपडत असतात. डिजिटल क्लासरुम झाली तर मुलांचे शिक्षण मनोरंजक पद्धतीने होऊन बाह्य जगाशी मुलांना संपर्क साधता येईल या उद्देशाने त्यांनी प्रयत्न सुरु केले. खाजगी (Private) स्कूल सारख्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या
आपला वर्ग डिजिटल व्हावा, फर्निचर बदलावे, रंगरंगोटी करावी व अद्ययावत पुस्तके व ग्रंथ खरेदी करण्यासाठी त्यांनी खर्चाचा हिशेब दोन लाखांपेक्षा जास्त होत आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने विकून आलेल्या पैशातून वर्गासाठी पैसे खर्च केले.
डिजिटल वर्गाबरोबर हजारो रुपये किंमतीची इंग्रजी माध्यमाची विविध पुस्तके व ग्रंथ खरेदी केले. वाचनाची आवड जोपासली. मुलांचे इंग्रजीचे उच्चार योग्य व्हावेत म्हणून स्वतः फोनेटिक ब्रिटिश उच्चार शिकली. त्यासाठी ऑडिओ व व्हिडिओचा वापर केला. त्यामुळे मुलांचे उच्चार सुधारले. मुले अस्खलितपणे इंग्रजी बोलू लागल्यावर त्याचे व्हिडिओ मॅडमनी शेअर केले.
अन्नपूर्णा मोहन यांची इयत्ता तिसरीतील मुले परदेशातील मुलांशी व शिक्षकांशी ग्लोबल स्मार्ट क्लासरूमच्या माध्यमातून संवाद साधतात. मुलांचा उत्साह व गुणवत्ता वेगळ्या उंचीवर मॅडम घेऊन गेल्या आहेत.
अन्नपूर्णा मोहन मॅडम यांच्याशी मिडियाने संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, "माझ्या मुलांची प्रगती व गुणवत्ता पाहून मला माझे दागिने विकल्याचे समाधान वाटते. दागिने परत घेता येतील, पण सरकारी मदतीची वाट पाहत बसले असते तर मुलांचे बौद्धिक नुकसान झाले असते. मुले पुस्तकांमुळे खूप प्रगल्भ झाली आहेत."
अन्नपूर्णा मोहन मॅडम यांचे राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व शिक्षण विभागाने खूप कौतुक केले आहे. मिडियाने मॅडम यांचेवर भरभरुन लिहिले आहे. सर्वस्व समर्पित भावनेने अर्पण करणाऱ्या ऋषिमुनींची आठवण अन्नपूर्णा मोहन मॅडम यांनी करुन दिली असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
अन्नपूर्णा मोहन मॅडम दागिने हे सर्वस्व असताना विकून मुलांना सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्या पायाशी नतमस्तक. आपल्या त्यागामुळे पूज्य सानेगुरूजी, मादाम मॉन्टेसरी, गिजूभाई बधेका, कर्मवीर अण्णा इत्यादींच्या तपस्वी जीवनाची आठवण झाली. आपणास व कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे ही परमेश्वराचे चरणी मनोमन प्रार्थना.