🪔💥 राज्य सरकारकडून दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर; काय आहेत नियम? पहा..💥🪔
💁🏻♂️ अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
🤔 काय आहेत नियम?*
● राज्यातली धार्मिक स्थळे पुन्हा खुली करण्यात आली आहेत. मात्र, तरीदेखील दिपावलीचा उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील, याची दक्षता घेतली जावी.
● दिपावलीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी बाहेर पडणे टाळावे.
● कोरोनामुळे नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भिती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाक्यांऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा.
● दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह अशा माध्यमातून करण्यात यावेत. तसेच कोरोनाच्या सर्व नियमांचं तंतोतंत पालन करावं.
● सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम/रक्तदान शिबिरे आयोजित करून त्यातून आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करावी.
📍 दरम्यान, तिसऱ्या लाटेची भिती आणि गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने दिवाळीसाठी ही नियमावली जाहीर केली आहे.