पालघर वाडा तालुक्यातील सुकन्या तनुजा भोईर या गरीब कुटुंबातील मुलीची " जम्प रोप " स्पर्धेसाठी महाराष्ट्रकडून निवड

Rajan garud
0

 17 th[INDIA] National jump rope championship 2021


पालघर







 राजस्थान येथे रविवार (दिनांक-19/9/2021) पासुन सुरु होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या जम्प रोप स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ रवाना झालेला होता .ही स्पर्धा 21 सप्टेंबर पर्यंत चालू राहिली. या स्पर्धेत 1500 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झालेले होते. या मध्ये महाराष्ट्राकडून पालघर  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील , गोरड या गावाची  कु.तनुजा बाळू भोईर  हिची निवड  झाली होती.ती एका गरीब कुटुंबातील असून तिची आई श्रीमती. रविता बाळू भोईर गोरड गावातील अंगणवाडी  सेविका असून त्यांनी तनुजाला प्रोत्साहन दिले तिचा अकॅडमीचा खर्च केला.त्या स्वतः तिच्या स्पॉन्सर बनल्या तसेच कुटूंबातील सर्व भोईर परिवाराने तिला पाठिंबा दिला. त्यांच्या ह्या मदती मुळे ती महाराष्ट्र राज्या कडून राष्ट्रीय पातळीवर खेळली आणि तिने भारतातून  दुसऱ्यांदा गोल्ड मेडल मिळवले . आणि एकदा सिल्व्हर मेडल मिळवून आपल्या तालुक्याच,जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं नाव मोठं केलं . खरोखरच खूप मोठी कामगिरी तिने बजावली.या आधी सुद्धा तिने  महाराष्ट्र राज्य पातळीवर चार वेळा गोल्ड ,एक वेळा सिल्व्हर पदकाची  कमाई केली आहे.तिच्या या कामगिरी मूळे तिच्यावर सगळी कडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)