आकाशगंगा नावाच्‍या माझ्या घरकुलात - कविता

 


आकाशगंगा नावाच्‍या माझ्या घरकुलात - कविता

आकाशगंगा नावाच्‍या माझ्या घरकुलात

कितीतरी सोबती माझे

तारे अऩ ग्रहांच्‍या गदारोळात

महास्‍फोटांच्‍या नौबती वाजे

ता-यांचे समुह अनेक

अफाट त्‍यांचा विस्‍तार

घराच्‍या केंद्रात गर्दीच त्‍यांची

बाहूत मात्र तुरळक फार

मोठया ता-यांचा आकार केवढा

अन दीपवणारी त्‍यांची दीप्‍ती

खुज्‍यांचा प्रकाश थोडा

परि मृत्‍यू त्‍यांचा लांब किती

धुमकेतूंची त-हाच निराळा

जणू पाहूणे ते घरकुलात

करती ये जा इकडून तिकडे

त्‍यांचा वेग किती भन्‍नाट

ग्रह आणि बटू ग्रह छोटे

सारी शेंडेफळे या घरातली

गुरूत्‍वाकर्षण कमी असल्‍याने

फिरावे लागते ता-याभोवती

आकाशगंगा नावाच्‍या या घरात

सदानकदा विस्‍फोट माजे

तरी माझ्या सा-या भाईबंदांमध्‍ये

आकाशगंगेचे हे घरकुल नांदे.


श्रृती वरोडे - 9 वी गंगा ( अहिल्‍यादेवी हायस्‍कूल, पुणे )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)