कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाला जाण्यापुर्वी हे वाचा.. POSTAL VOTING

Rajan garud
0

 कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाला जाण्यापुर्वी हे  वाचा.. POSTAL VOTING



पोस्टल मतदान कसे करावे व मतदान करतांना कोणत्या चुका टाळाव्यात याबाबत..


देशातील प्रत्येक निवडणूकीत जवळपास 10% ते 15 % कर्मचाऱ्यांचे पोस्टल बेलेट लहान लहान चुकांमुळे दरवर्षी बाद होतात असे निवडणूक आयोगाच्या आकड्यांवर दिसून येते, 

त्यासाठी सर्वप्रथम पोस्टल मतदान प्रक्रिया समजून घ्या व खालील काळजी घ्यावी...

१. आपल्याला पोस्टल मतदानाचे जे किट प्राप्त होईल.. त्यात एक बाह्य लिफाफा ( C)  मिळेल त्याच्या आत 2 गुलाबी रंगाची पाकिटे असतील- एक मोठे पाकिट ( B ) व दुसरे लहान पाकीट (A). 

२. वरच्या बाह्य कव्हर मधून व्यवस्थितपणे त्यातील मोठे पाकीट (B) व लहान पाकीट (A) काढून घ्यावे..

४. मोठ्या पाकीटात  कर्मचाऱ्यांने भरून द्यायचे 'घोषणापत्र' असेल तर लहान पाकीट मध्ये मतपत्रिका असेल..

५. सर्वप्रथम लहान पाकिटातील मतपत्रिका उघडून त्यावरील अनुक्रमांक दिलेल्या घोषणापत्रात नमूद ठिकाणी नोंदवून घ्यावा तसेच पाकिटा वर (पाकीट B वर ) नमूद ठिकाणी तो नोंदवावा.(काही ठिकाणी संबंधीत उपस्थित अधिकारी ते भरून देत आहेत, तरी तो क्रमांक अचूक भरलेला असल्याची खात्री करून घ्यावी..)

६. घोषणपत्रात आपण आपले नाव, पत्ता, स्वाक्षरी , मतपत्रिका अनुक्रमांक, इत्यादी माहिती भरून झाल्यावर सुविधा केंद्रावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून त्या घोषणपत्रास साक्षांकित करून घ्यावे (अधिकाऱ्याचा सही शिक्का घ्यावा)

७. त्यानंतर मतपत्रिकेवर मतदान करावे.. त्यासाठी आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावा समोर दिलेल्या जागेत ✔️ अशी खूण करावी..

8. ही खूण करतांना ती इतर उमेदवारांच्या चौकटीच्या रेषेला टच होणार नाही याची काळजी घ्यावी. 

९. मतपत्रिका लहान पाकिटात(A) टाकून ते डिंक लावून बंद करावे. 

१०. आणि शेवटी मोठ्या पाकिटात (B मध्ये) घोषणापत्र आणि लहान A पाकीट टाकून ते मोठे पाकीट सीलबंद करून( चिकटवून ) तिथे जमा करावयच्या लोखंडी मतदान BOX /पेटी मध्ये जमा करावे.


खालील चुका केल्यास मत बाद होते.


१.जर मतपत्रिकेवर सही केली तर मत बाद होईल.. तसेच मतपत्रिकेवर अन्य काहीही संदेश लिहिल्यास तरी ते मत बाद होईल.


२.लहान पाकिटात (A) मध्ये  घोषणापत्र टाकल्यास मत बाद होईल.. 

(कारण मतमोजणी वेळ मोठे पाकीट (B) उघडले जाते व त्यात वर स्वतंत्र घोषणापत्र व सीलबंद लहान पाकीट (A) शोधले जाते, जर घोषणपत्र दिसले नाही तर मतपत्रिकेचे लहान पाकीट उघडले जाणार नाही, त्यामुळे लहान पाकिटात घोषणापत्र टाकू नये. ते मोठ्या पाकिटात स्वतंत्र टाकावे.


३.तुम्ही जमा केल्या मोठ्या पाकिटावर (B वर) स्वाक्षरी नसेल तर मत बाद होते.. त्यामुळे या पाकिट ( B )वर दिलेल्या ठिकाणी स्वाक्षरी करावी.


४.घोषणापत्रात चुका केल्यास, उदा- आपली स्वाक्षरी नसणे, मतपत्रिका क्र. नोंदवलेले नसणे, व ते अटेस्टड(साक्षांकित) केलेले नसणे, यामुळेही मत बाद होते..


इत्यादी वरील सर्व काळजी घ्या आणि 100% कर्मचाऱ्यांनी आपले मतदान करा.  हे सर्व मतदान गोपनीय पद्धतीने तिथे उभारलेल्या मतदान सुविधा केंद्रात होणार आहे.. जिल्ह्यातील विधानसभा निहाय स्वतंत्र / 2 - 3 विधानसभा मिळून एक असे बूथ असतील..

रांगेत लागून , आपले नाव, मतदार संघ, यादी भाग सांगून आपल्याला मतदान किट मिळेल व शाई लावून वरील प्रकारे मतदान होईल..


      आजपासून राज्यात  कर्मचाऱ्यांचे पोस्टल मतदान सुरू झाले आहे कारण  निवडणूक साठी नेमलेल्या मतदान अधिकारी / कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण जिल्ह्या जिल्ह्यात सुरू झालेले आहेत.


सर्वांना मतदानासाठी खूप खूप शुभेच्छा! सर्वांनी मतदान करा, आपल्या भविष्यासाठी मतदान करा, आपल्या मुद्द्यावर मतदान करा.


टीप- पोस्टल मतदानाला जातांना ओळखपत्र सोबत ठेवा,सोबतच आपला मतदारसंघ अनुक्रमांक, यादीभाग क्र, sr no.माहिती असू द्या.

नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........

या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत .
Pls subscribe for more educational video.
watch more and full videos

join whatsapp group here 👉👉

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)