संकलित चाचणी - १ PAT 2 CHATBOT ऑनलाइन गुण भरण्याची सुविधा उपलब्ध - SCERT च्या अधिकृत सूचना संकलित चाचणी एक चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता सुविधा उपलब्ध !

Rajan garud
0

संकलित चाचणी - १   PAT 2 CHATBOT ऑनलाइन गुण भरण्याची सुविधा उपलब्ध  - 
SCERT च्या अधिकृत सूचना संकलित चाचणी एक चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता सुविधा उपलब्ध ! 



संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.

STARS प्रकल्पामधील SIG-२ Improved Learning Assessment System नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २(PAT-१ ते ३) चे आयोजन करण्यात येणार आहे. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चे आयोजन दि. २२ ते २५ जुलै २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) घेण्यात आलेली आहे. सदर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.


विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन चाचणी-१(PAT -२) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT - २) शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी -१ (PAT -२) थे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शिकारी लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.


१. संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चाटबॉट मार्गदर्शिका लिंक -

https://bit.ly/PATUserManual


तसेच राज्यातील शिक्षकांना संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२) चे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना दि. ११ नोव्हेंबर २०२४ ते २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. करिता गुणनोंद लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे. 


२. संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) गुणांची नोंद करणेसाठी लिंक -


https://bit.ly/PAT-ΜΗ


उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथ/माध्य., शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT - २) घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता तिसरी ते नववीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.gic/9ssWv4bu5QPCq6XHA) प्रतिसाद नोंदवावा.


तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे.




राहूल रेखावार भा.प्र.से.


संचालक


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण


परिषद, महाराष्ट्र, पुणे.





प्रत माहितीस्तव सविनय सादरः-


१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई. २) मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.


प्रत उचित कार्यवाहीस्तव :


३) मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.


१. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. (सर्व).


२. मा. आयुक्त, महानगरपालिका (सर्व).



संपूर्ण आदेश  डाउनलोड करण्यासाठी  Download वर क्लिक करा.


नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........

या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत .
Pls subscribe for more educational video.
watch more and full videos

join whatsapp group here 👉👉




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)