MAHATET Exam 2024 Hall Ticket / Admit Card Download available
28/10/2024 पासून टीईटीचे प्रवेश पत्र डाउनलोड साठी उपलब्ध !
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी दिनांक 28 ऑक्टोबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 दरम्यान प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
mahatet.in
प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थी लॉगिन डायरेक्ट लिंक
वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर आपला युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करात्यावरील हॉल तिकीट वर क्लिक करून आपले हॉल तिकीट डाउनलोड करा प्रिंट करा.दिनांक : 11/10/2024महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - 4महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर - 2024शुद्धीपत्रक. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर २०२४ चे आयोजन दिनांक १०/११/२०२४ रोजी करण्यात आले आहे. सदर दिवशी होणाऱ्या पेपरचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे.
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I१०/११/२०२४स. १०.३० ते दु.०१.००
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II१०/११/२०२४दु. २.३० ते सायं. ०५.००
(अनुराधा ओक) आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ०४
दिनांक: 30/09/2024महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - 4
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - 2024प्रसिद्धीपत्रकमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा सन २०२४ चे आयोजन दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी करण्यात आले आहे. सदर परीक्षेचे आवेदनपत्र दिनांक ०९/०९/२०२४ रोजी सुरु केले असून आवेदनपत्र दिनांक ३०/०९/२०२४ रोजी रात्री ११.५९ पर्यंत भरु शकतात. परंतु परीक्षा शुल्क दिनांक ०३/१०/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यंत करु शकता,(अनुराधा ओक)आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ०४शुद्धिपत्रक महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः बैठक-२०२१/प्र.क्र./१५३/टीएनटी-१ दि.३० जून २०२२ अन्वये राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंबिय यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत देण्यात आले नुसार ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये नवीन TAB उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
२) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन परिपत्रक क्र. दिव्यांग-२०२१/प्र.क्र.५४/दि.क.२ दिनांक-१३ सप्टेंबर २०२२ अन्वये Mental behavior / Mental illness (मानसिक बर्तन/ मानसिक आजार) / Multipal disability (बहुविकलांग) हा टैब ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये उपलब्ध करुन दिला आहे.
३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. आरटीई २०१३/प्र.क्र.९१/प्राशि-१ दिनांक २३ ऑगस्ट २०१३ अन्वये राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करील ती धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षेला बसण्याची मुभा राहील. या मुद्या नुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवेदनपत्रामध्ये नवीन विकल्प दिला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ Maharashtra Teacher Eligibility Test - 2024
कृपया प्रत्येक सूचना वाचून नोंदणीला जा.
सूचना :महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना खाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.
१. पोर्टल लॉगीन,
२. ऑनलाईन नोंदणी.
३. आवेदनपत्र भरणे.
४. अर्जातील माहितीची पडताळणी करणे.
५. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे,
६. आवेदन पत्राची प्रिंट घेणे.
१ ऑनलाईन नोंदणी
अर्ज भरण्याविषयीच्या सूचना www.mahatet.in या संकेतस्थळाच्या Homepage वरील डाव्या बाजूस असलेल्या 'महाटीईटी-२०२४ उपक्रम • मधील लॉगीन या बटणावर क्लिक करून 'उमेदवाराची नवीन नोंदणी या बटनावर क्लिक करा उघडलेल्या पेजवरील अर्ज भरण्याविषयीच्या सूचना काळजीपूर्वक वाचून पानाच्या शेवटी असलेल्या मी वरील सर्व सूचनांचे वाचन केले आहे. आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ साठी अर्ज भरू इच्छितो / इच्छिते, या पर्यायासमोरील चेक बॉक्स सिलेक्ट करा, नोंदणी फॉर्म भरण्यासाठी नवीन नोंदणी या बटनावर क्लिक करा.
नवीन नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.अर्जदाराचे प्रथम युजर नेम /पासवर्ड / नाव/प्रथम नाव/ मधले नाव / आडनाव / ई-मेल आयडी/ मोबईल क्रमांक वरील माहिती अचूक भरून झाल्यावर "Submit" या बटनावर क्लिक करा. नोंदणी. नोंदणीकृत केलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी नवीन युजर नोंदणीसाठी वापरता येईल.
२. पोर्टल, लॉगीन
www.mahatet.in या संकेतस्थळाच्या Homepage वरील डाव्या बाजूस असलेल्या 'महाटीईटी-२०२४ उपक्रम मधील लॉग इन(परीक्षार्थी) या Tab वर क्लिक करा. उघडलेल्या पेजवरील उजव्या बाजूस असलेल्या रकान्यात आपला TET रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड भरून "Submit" या बटनावर क्लिक करा. पासवर्ड विसरला असल्यास "फॉरगॉट पासवर्ड" या पर्यायाचा वापर करा.आवेदनपत्र भरणे
प्राप्त झालेल्या TET युजरनेम आणि पासवर्ड द्वारे Login करून अर्ज भरण्याच्या पुढील टप्प्यावर, जा, लॉगीन केल्यानंतर आवेदनपत्र भरण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.
i) अर्जदारा विषयी माहिती -
एस.एस.सी. प्रमाणपत्रा प्रमाणे अर्जदाराचे प्रथमनाव, वडिलांचे / पतीचे नाव, आडनाव भरा. जर नावात कोणता बदल असेल तर बदलेल्या नावाची माहित दया.
अर्जदार पुरुष, स्त्री अथवा ट्रान्सजेन्डर आहे हे ते अचूकपणे निवडा.
एस.एस.सी. प्रमाणपत्रानुसार जन्म दिनांक, एस.एस.सी. प्रमाणपत्र क्रमांक, उत्तीर्णतिचे वर्ष, महिना व बैठक क्रमांक अचूकपाने भरा. आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक यापैकी एक पर्याय निवडून उघडलेल्या चौकटीत संबंधीत क्रमांक अचूक नमूद करा.राष्ट्रीयत्व भरा आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्यास 'होय' अथवा नसल्यास 'नाही' वर क्लिक करा.
ii) अर्जदाराच्या संपर्काविषयी माहिती-यामध्ये सर्व्हे क्रमांक, घर क्रमांक, गल्ली क्रमांक, शहराचे / गावाचे पोस्ट (असल्यास) ठिकाण टाईप करावे. जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडावे iii) अर्जदाराच्या जातीचा प्रवर्ग आणि इतर माहिती-जातीचा प्रवर्ग Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.दिव्यांग असल्यास होय' अथवा नसल्यास नाही पर्याय निवडा. होय पर्यायावर क्लिक केल्यास दिव्यांगत्वाचा प्रकार, दिव्यांगत्वाची टक्केवारी, प्रमाणपत्र क्रमांक, लेखनिक हवा की नाही याची माहिती अचूकपणे नोंदवा (दिव्यांग व्यक्तींना लेखनिक पुरविण्याबाबत तसेच अनुग्रह कालावधीबाबत अनुज्ञेयता मार्गदर्शक सूचना www.mahatet.in या संकेतस्थळावर तपासून पहाव्यात.)
iv) अर्जाचा स्तर (पेपर । / पेपर ।।) -
ज्या वर्गासाठी (स्तरासाठी) शिक्षक पात्रता परीक्षा द्यावयाची आहे ते Dropdwon लिस्ट मधून अचूकपणे निवडा. इयत्ता 1 ली ते 5 वी (पेपर १) आणि इयत्ता ६ वी ते ८ वी (पेपर २) साठी अर्जदार पात्र असल्यास आणि दोन्ही परीक्षेस बसण्यास इच्छुक असल्यास 'Both / दोन्ही साठी हा पर्याय निवडा. (दोन्ही पेपरसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
v) परीक्षा माध्यम आणि केंद्राविषयी माहिती-अर्जदाराने परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यसाठी जे माध्यम निवडलेले असेल ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरले जाईल. द्वितीय भाषा अचूकपणे निवडा. यापरीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य असेल. प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी अनिवार्य असेल. तसेच प्रथम भाषा (उर्दू बंगाली/गुजराती/तेलगु/सिंधी/कन्नडा/हिंदी) निवडल्यास द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल.
उर्दू माध्यम निवडले असल्यास, दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी (non-language sections) उर्दू आणि इंग्रजी भाषेत (द्विभाषिक) प्रश्न असतील.जर मराठी / इंग्रजी किंवा इतर माध्यम (जर की कन्नडा, तेलगु, गुजराती, हिंदी, सिंधी आणि बंगाली) निवडलेले असल्यास दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी (non-language sections) मराठी आणि इंग्रजीभाषेत (द्विभाषिक) प्रश्न असतील. guage अर्जदार ज्या जिल्हा केंद्रावर परीक्षा देणार आहे. है. तो जिल्हा Dropdown लिस्ट मधून अचूकपने निवडा.
vi ) शैक्षणिक पात्रता-
शैक्षणिक पात्रता या मुद्यामध्ये पेपर १ (कनिष्ठ प्राथमिक स्तर) या साठी एस.एस.सी. पात्रतेविषयी माहिती भरावी तसेच एच.एस.सी. ची, पदवी, पदव्युतर पदवी आणि इतर शैक्षणिक पात्रता (असल्यास) त्याची माहिती, कोर्स, बोर्ड / विद्यापीठ, उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुण, टक्केवारी/ श्रेणी व शततमक/श्रेणी याबाबत अचूकपणे नोंद करावी. पेपर २ (वरिष्ठ प्राथमिक स्तर) या साठी एस.एस. सी. आणि पदवीची पात्रतेविषयी माहिती भरावी, तसेच एच.एस.सी. पदव्युतर पदवी आणि इतरशैक्षणिक पात्रता (असल्यास) त्याची माहिती, कोर्स, बोर्ड / विद्यापीठ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्तगुण, एकूण गुण, टक्केवारी / श्रेणी व शततमक / श्रेणी याबबात अचूकपणे नोंदकरावी.
vii) व्यावसायिक पात्रता-
व्यावसायिक पात्रता मध्ये शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड. किंवा समकक्ष) अथवा शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड. किंवा समकक्ष) बाबतची माहिती पदवी / पदविकेचे नाव, विद्यापीठ / परीक्षा मंडळ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी, शततमक / श्रेणी अचूकपणेनोंदवा. अर्जेदार शिक्षणशास्त्र पदवी किंवा शिक्षणशास्त्र पदविका दोन्ही उत्तीर्ण असल्यास दोन्हींची माहिती अचूकपणे नोंदवा. पदव्युतर शिक्षणशास्त्र पदवी (असल्यास) त्याविषयीची माहिती नोंदवा.
TET Updateअर्जदाराने परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडलेले असेल ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरले जाईल.द्वितीय भाषा अचूकपणे निवडा.या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य असेल. प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी अनिवार्य असेल. तसेच प्रथम भाषा (उर्दू / बंगाली / गुजराती / तेलगू / सिंधी / कन्नड / हिंदी) निवडल्यास द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल.उर्दू माध्यम निवडले असल्यास, दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी (non-language sections) उर्दू आणि इंग्रजी भाषेत (द्विभाषिक) प्रश्न असतील.जर मराठी / इंग्रजी किंवा इतर माध्यम (जसे की कन्नड, तेलगु, गुजराती, हिंदी, सिंधी आणि बंगाली) निवडलेले असल्यास दोन्ही पेपर करित्ता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी (non-language sections) मराठी आणि इंग्रजीभाषेत (द्विभाषिक) प्रश्न असतील
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4 कार्यालयातून निर्गमित दिनांक 9 सप्टेंबर 2018 24 रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा बाबत प्रसिद्ध पत्रकार नुसार ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४ या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHATET २०२४) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक-१०/११/२०२४ रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे.
इ. १ली ते ५वी व इ.६ वी ते इ.८वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक - ०९/०९/२०२४ पासून सुरु होत असुन दिनांक ३०/०९/२०२४ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. संबंधितांनी याची नोंद घ्यावी. ही विनंती.
दिनांक व कालावधी
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी०९/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढुन घेणे२८/१०/२०२४ ते १०/११/२०२४
३. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक व वेळ
दि.१०/११/२०२४ वेळ १०.३० AM ते १३.०० PM
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दिनांक व वेळ
दि.१०/११/२०२४ वेळ १४.०० PM ते १६.३० PM
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४
नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........
नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........
या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत . Pls subscribe for more educational video. watch more and full videos
join whatsapp group here 👉👉
join whatsapp group here 👉👉