विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान केंद्राध्यक्ष दिवसभरात भरायचे विविध फॉर्म मतदान केंद्राध्यक्षाने दिवसभरात सुरुवातीपासून शेवटपर्यंत करावयाची कामे.

Rajan garud
0

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 


 मतदान केंद्राध्यक्ष दिवसभरात भरायचे विविध फॉर्म
मतदान  केंद्राध्यक्षाने दिवसभरात सुरुवातीपासून शेवटपर्यंत करावयाची कामे. 




🍀सुचना :


1] तुमचे काम सहज व सुलभ होण्यासाठी जोडपत्रे व फॉर्म भरण्याचा जो क्रम दिला आहे त्यानुसारच सर्व जोडपत्रे व फॉर्म दिवसभर भरत रहा.


2] तुमच्या टेबल वर सर्व पाकिटे वेगवेगळ्या कप्प्यात दिसतील अशा रितिने मांडून ठेवा


3] सर्व जोडपत्रे व फॉर्म त्या-त्या पाकिटात अगोदरच टाकून ठेवा.


4] सर्व जोडपत्रे व पाकिटांवर तुमचे मतदान केंद्र क्रमांक, मतदार संघाचे नाव, दिनांक, तुमची स्वाक्षरी तसेच आवश्यकतेनुसार तिन्ही मतदान यंत्रांचे क्रमांक, सर्व सील चे क्रमांक, प्रदत्त मतपत्रिकेचे क्रमांक मतदान प्रतिनिधींची नावे, उमेदवारांची नावे या सर्व बाबी अगोदरच नोंद करुन ठेवा. संध्याकाळी मतदान संपल्यानंतर फक्त मतदान यंत्रावर नोंदवण्यात आलेल्या एकूण मतांची संख्या हेच आकडे टाकयचे आहेत व अर्ध्या तासात आपले काम संपवायचे आहे.


5] जी जोडपत्रे भरली गेली नसतील त्यावर मोठ्या अक्षरात "निरंक" लिहा व त्या-त्या पाकिटात भरा. 


 🍀 मतदानाच्या दिवशी सकाळी हाताशी ठेवायची प्रमाणपत्रे / घोषणापत्रे / पाकीटे सकाळची तयारी


1] मॉक पोल प्रमाणपत्र (3 प्रती) पाकीट 1(2)
2] मतदान सुरू करण्यापूर्वीचे घोषणापत्र: पाकीट 4(4)
 3] मतदान सुरू झाल्यानंतर CU च्या डिसप्ले वरील Poll Start Time याची नोंद
घेणे -: यासाठी या पुस्तिकेतील Poll Start Time चा रकाना हाताशी ठेवा. 

4] मतदार यादीला चिन्हांकीत प्रत म्हणून वापरण्यासंदर्भात प्रमाणपत्र: जोडपत्र- 4

🍀 मतदान केंद्राध्यक्ष दिवसभरात भरायचे विविध फॉर्म व घोषणापत्रे व नोंदी 


1] जोडपत्र- 5 : मतदान केंद्राध्यक्षांचे अहवाल भाग 2 नियंत्रण युनिट मधिल बॅटरी बदलणे (अभिरुप मतदानादरम्यान / प्रत्यक्ष मतदानादरम्यान / मतदान पूर्ण झाल्यानंतर)
जर अभिरुप मतदानादरम्यान किंवा प्रत्यक्ष मतदानादरम्यान नियंत्रण युनिटची बॅटरी बदलावी लागत असेल तर जोडपत्र - 5 : मतदान केंद्राध्यक्षांचे अहवाल भाग 2 भरा किंवा "निरंक" भरा. 


2] जोडपत्र- 5 : मतदान केंद्राध्यक्षांचे अहवाल भाग 4 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र / व्हीव्हीपॅट बदलणे (अभिरुप मतदानादरम्यान) जर अभिरुप मतदानादरम्यान मतदान यंत्र किंवा व्हीव्हीपॅट यात बिघाड झाल्याने बदलावे लागत असेल तर ते बदला व जोडपत्र 5 मतदान केंद्राध्यक्षंचे अहवाल भाग 4 भरा.

जर मतदान यंत्र किंवा व्हिव्हीपॅट मध्ये कोणतिही बिघाड झाली नसेल तर "निरंक" भरा.
3 ] मॉकपोल सर्टिफिकेट तयार करा जोडपत्र 5: भाग-1
मॉकपोल झाल्यानंतर ताबडतोब मॉकपोल सर्टिफिकेट तयार करा. 

3 प्रतीत बनवा

1] झोनल ऑफिसर साठी  2) साहित्य वितरणाच्या वेळी  3] स्वतःकडे जादा म्हणून


4] मतदान सुरू झाल्यानंतर CU च्या डिसप्ले वरील Poll Start Time याची नोंद घेणे -:


5] मतदार यादीला चिन्हांकीत प्रत म्हणून वापरण्यासंदर्भात प्रमाणपत्र: जोडपत्र- 4
मतदान सुरू करण्यापूर्वी उपस्थित मतदान प्रतिनिधी यांना मतदारांची चिन्हांकित प्रत दाखवून त्यामध्ये PB, EDC व DELETED याव्यतिरिक्त कुठलिही खूण नाही हे दाखवुन द्यावे. व जोडपत्र 4 भरा.


6] मतदाराची नोंदवही नमुना 17A मध्ये पहिला मतदार स्वाक्षरी करण्यापूर्वी करायची नोंद-:
मतदारांची नोंदवही नमुना 17A मध्ये प्रथम मतदार स्वाक्षरी करण्यापूर्वी मतदान अधिकारी व मतदान केंद्राध्यक्ष नोंदवही नमुना 17A तपासून त्यात पुढिल नोंद शाईने करतील व केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी । सही करतील प्रत्यक्ष मतदान सुरु होण्यापूर्वी नियंत्रण युनिट तपासणी केली आहे व एकूण [0] असल्याचे आढळले आहे.
नमुना 17A : मतदान अधिकारी 2 यांच्याकडील नोंदवही


मतदाराचा मतदार ओळखपत्र मतदाराने स्वतःची ओळख मतदाराची
यादीतील अनुक्रमांक पटवण्यासाठी सादर केलेला पुरावा सही अंगठा 
प्रत्यक्ष मतदान सूरू होण्यापूर्वी मतदान यंत्रांत (0) मते असल्याची खात्री करण्यात आली. 


7] मतदान सुरु होण्यापूर्वी केंद्राध्यक्षांचे घोषणापत्र तयार करणे जोडपत्र 6 केंद्राध्यक्षाद्वारे घोषणापत्र
: भाग 1
मतदान प्रारंभ करताना मतदान केंद्राध्यक्ष यांनी प्रतिज्ञापत्र जोडपत्र 6 भाग 1 उपस्थित असणाऱ्या व्यक्तींना मोठ्याने वाचून दाखवावे व त्यावर सही करावी व उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या सह्या घ्याव्यात.


8] कोणतेही पर्यायी मतदान यंत्र वापरल्यास त्यावेळी केंद्राध्यक्षाद्वारे केले जाणारे घोषणापत्र जोडपत्र -
6 : भाग - 2
जर मतदान युनिट / नियंत्रण युनिट / व्हीव्हीपॅट यासह संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बदलण्यात आले तर
केंद्राध्यक्षाचे घोषणापत्र -6: भाग - 2 भरा.


9] Visit Sheet भरा जोडपत्र 7 : मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी अनुक्रमांक 19 - ब भरा मॉकपोल करण्यापासून ते दिवसभरात कधिही मतदानावेळी मतदान केंद्राला भेट देणारे निरिक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी, सुक्ष्म निरिक्षक, उमेदवार व त्याचा निवडणूक प्रतिनिधि, झोनल दंडाधिकारी, हे तुमच्या मतदान केंद्रावर भेटीला आले
असता त्यांची Visit Sheet मध्ये नोंद घेण्यात यावी. जोडपत्र 7 मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी अनुक्रमांक 19 - ब मध्ये त्याचा तपशील देण्यात यावा.

10] जोडपत्र 12 मतदान प्रतिनिधी यांना द्यायचा प्रवेशपत्राचा नमुना भरा.


11] जोडपत्र 11 मतदान प्रतिनिधी / कार्यमोचक प्रतिनिधी यांचे ये-जा नोंदपत्रक भरा


12] जोडपत्र 13 मतदान प्रतिनिधींना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रांचा हिशोब भरा


13] जोडपत्र- 9: मतदान केंद्राध्यक्षाने विविध टप्यांवर पार पाडायच्या कामांची रुपरेषा वेळोवेळी पहा


14] जोडपत्र 10 मतदान केंद्राध्यक्षासाठी तपासणी ज्ञापन भरा.


15] जोडपत्र 7 केंद्राध्यक्षाची दैनंदिनी
जोडपत्र 7 केंद्राध्यक्षाची दैनंदिनी याचा अभ्यास करा व सकाळपासूनच ती भरायला घ्या. त्यातील आवश्यक
 बाबींची नोंद दिवसभर करत रहा. आवश्यकतेनुसार दिवसभर केंद्राध्यक्षाची दैनंदिनी भरत रहा केंद्राध्यक्षाची दैनंदिनी 3 प्रतीत बनवा 1] झोनल अधिकारी यांच्यासाठी 2] साहित्य वितरणाच्या वेळेस 3] स्वतःकडे जादा म्हणून


16] जोडपत्र 8: नमुना 17क भाग 1 नोंदवलेल्या मतांचा हिशोब वास्तविक जोडपत्र - 8 : नमुना 17क मतदान समाप्तीनंतर बनवायचे असते. नोंदवलेल्या मतांचा हिशोब या बाबी वगळता त्यातील आवश्यक इतर बाबी अगोदरच भरुन घ्या. अवश्यकतेनुसार दिवसभर त्या बाबी भरत रहा. जोडपत्र 8 नमुना 17 क किती प्रतीत बनवायचा तुमच्या मतदान केंद्रात जेवढे मतदान प्रतिनिधी असतील तेवढे + 3 जादा एवढ्या प्रती बनवा.


14 ] जोडपत्र 14: अनुपस्थित, स्थलांतरीत, मृत मतदारांच्या यादीमध्ये नाव असलेल्या मतदारांनी करायच्या घोषणापत्राचा नमुना
जोडपत्र -


 15 ] : अनुपस्थित, स्थलांतरीत, मृत मतदारांच्या यादीमध्ये नाव असलेल्या मतदारांनी करायच्या घोषणापत्राचा नमुना याचा अभ्यास करा व त्या प्रकारचे मतदार आले तर ते घोषणापत्र भरुन घ्या.


16] जोडपत्र- 15 : मतदारांकडून घ्यायच्या वयाबाबतच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना भरले नसेल तर "निरंक" लिहा


17] जोडपत्र 16 कमी वय असलेल्या मतदारांची यादी
भाग 1 : ज्या मतदारांकडून त्यांच्या वयासंदर्भात प्रतिज्ञापत्रे घेण्यात आली आहेत त्या मतदारांची यादी भाग 2 : ज्यामतदारांनी वयाच्या संदर्भात प्रतिज्ञापत्र देण्याचे नाकारले त्या मतदारांचःइ यादी.
भरले नसेल तर "निरंक" लिहा


18] जोडपत्र 18 अंध व दिव्यांग मतदाराच्या सोबत्याचे प्रतिज्ञापत्र आवश्यकतेनुसार अंध, दिव्यांग मतदाराच्या सोबत्याचे प्रतिज्ञापत्र घ्या. नसेल तर "निरंक" लिहा.


19] जोडपत्र 19 पावती पुस्तक
आक्षेपित मत / Challenge Vote संदर्भात मतदान प्रतिनिधी यांच्या कडून रु.2/- च्या अनामत रक्कम साठी हे जोडपत्र 19 पावती पुस्तक आहे. जर पावती फाडली असेल तर रक्कम दिलेल्या पाकिटात ठेवा. नसेल तर "निरंक" लिहा.


20] प्रदत्त मत / Tender Vote

1] जर तुमच्या मतदान केंद्रात प्रदत्त मतदान झाले असेल तर अशा प्रदत्त मतदारांची संपूर्ण नोंद तुम्हाला फॉर्म 17B मध्ये ठेवायची आहे. तुम्ही मतदारांना प्रदत्त मतपत्रिका देण्याआधी त्या फॉर्मच्या स्तंभ -5 मध्ये त्या मतदारांची सही अथवा अंगठ्याचा ठसा घ्यावा
2] जर प्रदत्त मतपत्रिकेचा वापर झाला नसेल तर "निरंक" लिहा.
3] मिळालेल्या मतपत्रिका, मतदारांना देण्यात आलेल्या मतपत्रिका व न वापरता परत केलेल्या मतपत्रिका या सर्व मतपत्रिकेचा बिनचूक हिशोब फॉर्म 17C च्या भाग 1 च्या अनुक्रमांक 9 मध्ये ठेवायची आहे.


21] जोडपत्र 17: नियम 49MA अन्वये मतदाराने चाचणी मत करण्यापूर्वी भरायच्या 
प्रतिज्ञापत्राचा नमुना जर मतदाराने व्हीव्हीपॅट च्या पावतीबद्दल तक्रार केली तर अगोदर जोडपत्र-17 नियम 49MA प्रतिज्ञापत्र भरुन घ्या व नंतर पुढिल कार्यवाही करा. नसेल तर "निरंक" लिहा.


22] साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी द्यायच्या महत्वाच्या 6 नमुन्याचे बुकलेट -:

1] जर तुमच्या झोनल ऑफिसर यांनी साहित्य जमा करायच्या ठिकाणी द्यायच्या सहा नमुन्याचे बुकलेट जर तुम्हाला दिले असेल तर ते ताबडतोब भरायला घ्या.
2] किती कॉपी बनवायच्या 3 प्रती बनवा.
1] झोनल ऑफीसर
2] साहित्य जमा करायच्या ठिकाणी
3] तुमच्याकडे जादा कॉपी.

🍀 6 नमुन्याच्या बुकलेट मध्ये समाविष्ट बाबी
1] फॉर्म 17C : भाग - 1
2] मतदान आकडेवारी तक्ता
3] नमुना 17A तपासणीसाठी 19 मुद्यांचा अहवाल
4] जोडपत्र 12 : मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी
5] मतदान केंद्राध्यक्षाने द्यावयाचा अतिरीक्त 16 मुद्यांचा अहवाल
6] अंध मतदारांसाठी असलेले डमी ब्रेल बॅलेट शीट वापराबद्दल तक्ता.


23] जोडपत्र 5: मतदान केंद्राध्यक्षांचे अहवाल भाग 3 मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर क्लोज CLOSE बटण दाबणे. 
संध्याकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही क्लोज CLOSE बटण दाबल्यावर जोडपत्र - 5 : मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 3 हे जोडपत्र भरा.


24] मतदान संपल्यावर CU च्या डिसप्ले वरील Poll End Time याची नोंद घेणे -:


25] जोडपत्र 6 केंद्राध्यक्षाद्वारे घोषणापत्र भाग 3 मतदान प्रक्रिया समाप्त होण्याच्या वेळी करायचे घोषणापत्र
मतदान प्रक्रिया समाप्त होण्याच्या वेळेस मतदान केंद्रात उपस्थित असणाऱ्या व यात सही करणाऱ्या मतदान प्रतिनिधींना नमुना 17C मध्ये नोंदवलेल्या मतांचा हिशोब भाग 1 मधील प्रत्येक नाँधीची साक्षांकीत प्रत सुपुर्द केली असल्याबबत्च घोषणापत्र मतदान केंद्राध्यक्षाने करायचे आहे.


26] जोडपत्र - 6: केंद्राध्यक्षाद्वारे घोषणापत्र भाग 4 मतदानयंत्र मोहोरबंद केल्यानंतरचे घोषणापत्र मतदान संपल्यानंतर मतदान यंत्राची मतदान युनिटे व नियंत्रण युनिटे यावर मतदान केंद्राध्यक्षाने मोहोर उमटवल्याचे व मतदान प्रक्रिया समाप्तीच्या वेळेस मतदान केंद्रावर उपस्थित असणाऱ्या मतदान प्रतिनिधींना आपली मोहोर उमटवण्याची परवानगी दिल्याबाबतचे घोषणापत्र मतदान केंद्राध्यक्षाने करायचे आहे.

नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........

या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत .
Pls subscribe for more educational video.
watch more and full videos

join whatsapp group here 👉👉

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)