शिष्यवृत्ती परीक्षा 2025 शाळा नोंदणी व विद्यार्थी फॉर्म भरणे सुरु Scholarship Exam 2025 School Registration and Student Application all process

Rajan garud
0

 शिष्यवृत्ती परीक्षा 2025 शाळा नोंदणी व विद्यार्थी फॉर्म भरणे सुरु
Scholarship Exam 2025 School Registration and Student
Application all process



5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 शाळा नोंदणी व विद्यार्थी फॉर्म भरणे सुरु झाले आहे. या परीक्षेला विद्याथ्यांचे फॉर्मभरण्यासाठी प्रथम शाळा नोंदणी कटणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती परीक्षा 2025 साठी शाळा  नोंदणी कशी करावी? व  विद्यार्थी फॉर्म कसे भरावेत? सर्व टप्पे माहिती पाहूया.

5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 या परीक्षेला विद्याथ्यांचे फॉर्म भरणे 17 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आले आहे.
विद्यार्थी फॉर्म भरण्यापूर्वी शाळा नोंदणी करणे आवश्यक आहे. शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदन पत्र खालील दिलेल्या
स्टेप्स प्रमाणे पूर्ण करा.

शिष्यवृत्ती परीक्षा 2025 शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्रे भरणे बाबत परीक्षा परिषदेचे परिपत्रक पहा.

Click Here


मुदतवाढ -शिष्यवृत्ती परीक्षा शाळा नोंदणी, विद्यार्थी आवेदनपत्रे व शुल्क भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक


अंतिम मुदत - 30 नोव्हेंबर 2024
विलंब शुल्कासह - 15 डिसेंबर 2024
अतिविलंब शुल्कासह - 23 डिसेंबर 2024
परीक्षा दिनांक - 09 फेब्रुवारी 2025



पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) फेब्रुवारी 2025 शाळा नोंदणी कशी करावी ????
Scholarship Exam 2025 School Registration  Steps







शिष्यवृत्ती परीक्षेचा इ. 5वी व इ. 8वी विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा

1. Google मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा असे सर्च करा. त्यानंतर खालीलप्रमाणे पहिली लिंक येईल. त्यावर टच करा.

शिष्यवृत्ती परीक्षा 2025 शाळा रजिस्ट्रेशन लिंक - Click Here
Scholarship Exam 2025 Registration Link - Click Here



2 -. शिष्यवृत्ती परीक्षा 2025 साठी शाळा नोंदणी येथे टच करा. / पर्याय निवडा.


शिष्यवृत्ती परीक्षा 2025 शाळा रजिस्ट्रेशन डायरेक्ट लिंक- Click Here




3 - शाळा नोंदणी School Registration

त्यानंतर शाळा नोंदणी येथे टच केल्यानंतर शाळेचा U-DISE नंबर टाका. U-DISE नंबर टाकल्यानंतर शाळेचे नाव येईल. बरोबर
असल्यास YES निवडा.

4 - त्यानंतर शाळेची माहिती भरा.

यामध्ये शाळा व्यवस्थापन प्रकार, शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम, शाळेचे माध्यम, शाळेचा प्रकार, शाळेचे क्षेत्र निवडून दोन वेळा इमेल टाका. त्यानंतर शाळेत इंटरनेट सुविधा आहे की नाही ते निवडा.

 5 - शाळेचा पत्ता

यामध्ये शाळेचा पत्ता सविस्तर लिहा. सर्वे नंबर, गल्ली, रस्ता, क्रमांक नमूद करा. पोस्ट, तालुका, जिल्हा निवडा. शाळेचा दूरध्वनी
क्रमांक टाका. नसल्यास 7 वेळा शून्य लिहा.

6 - मुख्याध्यापकाची माहिती

कार्यरत मुख्याध्यापकाची माहिती भरा. यामध्ये मोबाईल नंबर व ईमेल आयडी काळजीपूर्वक भरा. कारण याच नंबरवर/ ईमेल
वर पासवर्ड पाठविला जातो.

 7 - Submit

सर्व माहिती पुन्हा एकदा पडताळणी करुन सबमिट या बटणावर टच करा. Pop up window येईल तेथे Yes करा.


Step 8 - Login ID d Password

Yes केल्यानंतर Login ID व Password तुमच्या मोबाईल व ईमेल वर पाठविला जाईल. तो आलेला पासवर्ड टाकून तुम्ही लॉगीन करता येईल.

 9 - Login करा.

लॉगीन केल्यानतर फॉर्म भरण्याबाबत सूचना वाचले तेथील चेक बॉक्स ला टिक करा. व continue येथे टच करा.

10 - Upload Photo and signature of Head Master

त्यानंतर शाळा नोंदणी केलेला प्रोफाईल फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्म मध्ये दुसरा वैकल्पिक नंबर टाकून मुख्याध्यापकाचा फोटो व
सही एकत्रित असलेली इमेज अपलोड करा. इमेज 100 kb पेक्षा कमी असते.

शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी आवेदनपत्रे भरणे. 

Student Application / Registration

शाळा नोंदणी केल्यानंतर पुन्हा शाळा लॉगिन करावे. शाळा लॉगिन केल्यानंतर इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी
शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी डाव्या बाजूकडील रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडावा व पुढील ओपन झालेला फॉर्म भरून सबमिट करावा. त्यानंतर डॅशबोर्ड ला जाऊन पेमेंट हा पर्याय निवडन पेमेंट करावे. पेमेंट शाळा नोंदणी फी व विद्यार्थी फी मिळून एकत्रित येईल ते भरावे. त्यानंतरही काही विद्याथ्यांचे फॉर्म भरायचे असल्यास ते फॉर्म भरु शकता. काही जिल्हा परिषद मध्ये शाळा व विद्यार्थी नोंदणी फी स्वतः जिल्हा परिषदेने भरल्या असल्यामुळे त्यांना  पेमेंट हा ऑप्शन येणार नाही.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)