यशवंतराव चव्हाण सेंटर या वर्षीचा डॉ. कुमुद बंसल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2024 नामांकन नोंदणी सुरू

Rajan garud
0

 यशवंतराव चव्हाण सेंटर  

 या वर्षीचा डॉ. कुमुद बंसल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2024 नामांकन नोंदणी सुरू 

 यशवंतराव चव्हाण सेंटर द्वारे यावर्षीपासून राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे.



 दिनांक 20 सप्टेंबर 2024 ते 28 सप्टेंबर 2024 दरम्यान नामांकन करता येणार आहे.

विशेष निवेदन -


 शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आयुष्यभर कार्यरत असणाऱ्या देशाच्या माजी शिक्षण सचिव, शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या संस्थापक मुख्य संयोजक डाॅ.कुमुद बन्सल यांच्या प्रेरणादायी स्मृती जपाव्यात म्हणून "डाॅ.कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार" देण्याचा निर्णय यशवंतराव चव्हाण सेंटरने घेतला आहे.


या पुरस्कारासाठी शिक्षकांचे नामांकन करू इच्छिणाऱ्या मान्यवरांनी अथवा संस्थांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून मगच गुगल फॉर्म भरावा.

या पुरस्कारासाठी नामांकन करू इच्छिणाऱ्या मान्यवरांसाठी अथवा संस्थांसाठी २८ सप्टेंबर २०२४ पर्यंतच हा फॉर्म खुला राहील याची नोंद घ्यावी.


डाॅ.कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार -२०२४

या पुरस्कारासाठी नामांकन करू इच्छिणाऱ्या मान्यवरांनी अथवा संस्थांनी घ्यावयाची दक्षता:- 


१) पुरस्कारासाठी  शिक्षकाने स्वतः अर्ज करण्याची आवश्यकता नाही अर्थात शिक्षकांनी स्वतःची शिफारस करू नये. मात्र नामांकन मिळालेल्या शिक्षकानी मुलाखत देणे, शाळा दाखवणे या बाबी आवश्यक राहिल.

२) ज्या शिक्षकांना राज्य, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, अशा शिक्षकांचा विचार या पुरस्कारासाठी करण्यात येऊ नये.


३) शिक्षकाला  किमान १० वर्षे  अध्यापनाचा अनुभव असावा.


४) कमाल वयोमर्यादा ५५ असावी.


५) इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत अध्यापन करणाऱ्या कोणत्याही माध्यमाच्या शिक्षकांचा या पुरस्कारासाठी विचार जावा.


६) प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकाचा पुरस्कारासाठी विचार करू नये.


७) सर्व प्रकारच्या उदा. जि.प. शाळा, नगर पालिका व महानगर पालिका शाळा, खाजगी अनुदानित, विनानुदानित, एक शिक्षकी, दोन शिक्षकी, शासकीय आदिवासी (भटक्या-विमुक्त)आश्रमशाळा यातील सर्व शिक्षकांचा या पुरस्कारासाठी विचार करता येईल.

८) एक पुरूष शिक्षक, एक महिला शिक्षिका असे दोन राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. मान्यवर अथवा संस्था एकच नामांकन करू शकते याची कृपया नोंद घ्यावी.


९) नामांकन करताना संबंधित शिक्षकाची शाळेतील उपस्थिती, उपक्रमातील सहभाग, त्याचा विद्यार्थ्यांवर झालेला परिणाम, विद्यार्थीप्रिय कामे, पालकांचा प्रतिसाद आदी बाबींची नोंद घेतली जावी.


१०) जे मान्यवर अथवा संस्था शिक्षकांचे नामांकन करण्यास इच्छुक आहेत केवळ त्यांनीच पुढील गुगल फॉर्म भरावा.


https://forms.gle/VWcSKaD8EDJYKUvm8





 डाॅ. वसंत काळपांडे ,
मुख्य संयोजक,
शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई.


 नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........

या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत .
Pls subscribe for more educational video.
watch more and full videos

join whatsapp group here 👉👉





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)