शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू. शरद पवार इन्सपायर फेलोशिप : शिक्षण sharad pawar fellowship 2024

Rajan garud
0

 शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू.
शरद पवार इन्सपायर फेलोशिप : शिक्षण

शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे हे शिक्षणातून अपेक्षित असते. शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा घ्यावा-द्यावा आणि आजन्म शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण. शिकता-शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करते, उद्याच्या संधींचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण.

शिक्षण क्षेत्रात नवे काही करु पाहणाऱ्या, ध्येयाने झपाटलेल्या व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या होतकरु गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्याना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण काम व्हावे तसेच मुलभूत संशोधनास वाव मिळावा हा या फेलोशीपचा हेतू आहे.यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने २० प्राथमिक शिक्षक आणि १० माध्यमिक शिक्षकांना ही फेलोशिप दिली जाणार आहे. सदर फेलोशिपची रक्कम साठ हजार असेल.  

आज घडीला शालेय शिक्षणाच्या मुलभूत पुनर्रचनेची नितांत आवश्यकता वाटते आहे. यावर्षी (२०२४ -२५) महाराष्ट्रातील २०  प्राथमिक आणि १० माध्यमिक शिक्षकांना आणि १० एकात्मिक बी. एड. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप देण्यात आली. या फेलोशिप अंतर्गत भारतीय संविधानाच्या तरतुदींच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजविणे, स्वयंअध्ययन आणि सहअध्ययन यांचा अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रियेत प्रभावी वापर, कला व खेळ यांच्याशी समन्वय साधून विद्यार्थ्यांचे आकलन वाढविणे, वाचन आणि आकलन वाढवण्यासाठीचे उपक्रम, पालक आणि स्थानिक समाज यांचा शालेय कामकाजात आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सहभाग, शाळेची इमारत आणि परिसर यांचा शैक्षणिक साधन म्हणून वापर, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत डिजिटल लर्निंगचा प्रभावी वापर, असे उपक्रम या वर्षीच्या फेलोशिप प्राप्त शिक्षकांनी निवडले आहेत.

ही केवळ उदाहरणे म्हणून दिली आहेत, तरी परंतु आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजा  लक्षात घेऊन, कोणते उपक्रम निवडावे याचे संपूर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना असेल. २०२५- २६ च्या फेलोशिपसाठीची अर्ज प्रक्रिया १८ जुलै २०२४ पासून होत आहे. तरी इच्छुक शिक्षकांनी दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ अखेर 

https://apply.sharadpawarfellowship.com

 या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.

टीप : प्रस्ताव लेखन कसे करावे? याकरिता हा खालील व्हिडिओ पाहवा- 

https://youtu.be/agPkuW4MnVI?si=RWZFv8OU3_FRbDKl

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई.

द्वारा शरद पवार इन्स्पायर फेलोशिप दरवर्षी दिली जाते.

यावर्षीच्या शरद पवार इन्स्पायर फिल्म एज्युकेशन म्हणजेच शिक्षण क्षेत्रातील फेलोशिप साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

25 ऑगस्ट 2023 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत ऑनलाइन अर्ज स्वीकारली जाणार आहेत.

शिक्षण क्षेत्रातील नवीन प्रयोगासाठी एक लाख रुपयाची फेलोशिप यशवंतराव चव्हाण सेंटर द्वारे दिली जाते.
Themes

a) Teachers who involved in Scout Guide (स्कॉऊट गाइड)

b)   Climate Change (हवामान बदल)

c)   Special Education (विशेष शिक्षण)

d)   Children’s Health (Mental and Physical) (मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य)

e)   Sports (खेळ)

f)   Nature’s friend (निसर्ग मित्र, पर्यावरण रक्षक)

g)  Performing Arts (कला)

h)  Crafts and Culture (संस्कृती आणि हस्तकला)

i) Gender Equity (लिंग समभाव)

j) Promoting Scientific Temper (वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवणे)

k) Inculcating Values of Indian Constitution (संविधानिक मूल्ये रुजवणे)

l) Reading Comprehensive (वाचन संस्कृति)

आणि या व्यतिरिक्त नावीन्य पूर्ण उपक्रम असतील तरीही आपण अप्लाय करू शकतो

फेलोशिपसाठी नियमावली

१) आपण ज्या संस्थेत काम करीत आहात त्या संस्थेचे ‘नवोपक्रम’ करण्यासाठी तुम्हाला परवानगी दिल्याचे पत्र सुरुवातीसच द्यावे लागेल.

२) आपण जो नवोपक्रम हाती घेणार आहात तो यापूर्वी केलेला नसावा. मात्र पूर्वी केलेल्या प्रयोगाचे विस्तारीकरण (Extension ) करता येईल.

३) आपण करीत असलेला नवोपक्रम इतर कोणत्याही संस्थेत सादर केलेला नसावा तसेच पुढेही तो सादर करता येणार नाही.

४ ) आपण घेतलेला उपक्रम कोणाचीही कॉपी असू नये. जर दुसऱ्याची एखादी कल्पना घेवून काम करणार असाल तर तशी त्या व्यक्तीची पूर्वपरवानगी घेतलेली असावी.

५ ) यशवंतराव चव्हाण सेंटर, ज्या ज्या वेळी यासंबंधीची प्रशिक्षणे किंवा बैठका घेईल त्यावेळी अशा बैठकास किंवा प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक राहील. अपरिहार्य अडचण असेल तर तशी कल्पना यशवंतराव चव्हाण सेंटरला देवून परवानगी घ्यावी.

६ ) यशवंतराव चव्हाण सेंटरनी दिलेल्या वेळेतच आपला उपक्रम पूर्ण करणे अपेक्षित आहे. उपक्रमास उशीर झाला तर आपल्या फेलोशिपबाबतचा अंतिम निर्णय चव्हाण सेंटरला असेल.

७ ) आपला उपक्रम चालू असताना यशवंतराव चव्हाण सेंटरचे प्रतिनिधी कधीही तरीही पूर्व कल्पना देवून भेट देण्यास येतील. त्यावेळी त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. जर या प्रतिनिधिंना कामाबाबत चुकीच्या गोष्टी ध्यानात आल्या तर फेलोशिप संबंधी यशवंतराव चव्हाण सेंटर निर्णय घेईल.

८) नवोपक्रम अंतिम अहवाल सादर करताना आपल्या संस्था प्रमुखाचे पत्र जोडणे आवश्यक आहे.

 नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........

या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत .
Pls subscribe for more educational video.
watch more and full videos

join whatsapp group here 👉👉

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)