महावाचन उत्सव 2024 लेखन स्पर्धेसाठी मुदतवाढ! Mahavachan Utsav 2024 Update

Rajan garud
0

महावाचन उत्सव 2024 लेखन स्पर्धेसाठी मुदतवाढ!
 Mahavachan Utsav 2024 Update 



महावाचन उत्सव 2024 - लेखन स्पर्धेसाठी दिनांक 14 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे तरी कृपया सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत इयत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखन स्पर्धा घ्यावी आणि निबंध वेबसाईटवर अपलोड करावेत.


अत्यंत महत्त्वाचे व कालमर्यादित. 


प्रति,
 प्राचार्य व मुख्याध्यापक,
 सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यम,


 विषय -  
 उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते, की महावाचन उत्सव 2024 मध्ये आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे किंवा शाळेचे अद्याप रजिस्ट्रेशन झाले नसेल तर त्वरित करून घ्यावे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी फक्त एक ते दोन मिनिटे लागतात.
 त्यानंतर आपल्या विद्यालयातील इयत्ता तिसरी  ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महावाचन लेखनस्पर्धा घ्यायची आहे. संबंधित इयत्ता च्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे कोणतेही पुस्तक घरी किंवा शाळेत वाचावे. यासाठी संबंधित सर्व वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहकार्य करावे. शाळेतील ग्रंथालयातील किंवा पालकांच्या घरून विद्यार्थ्यांना पुस्तक वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यावे. सदर पुस्तकाबाबतचे आपले अभिप्राय / मनोगत याबाबत विद्यार्थ्यांनी दिलेल्या शब्द मर्यादेत लेखन करायचे आहे. सदर लेखन स्पर्धा आपण आपल्या शाळेमध्येच घ्यायची आहे. तसेच विद्यार्थ्यांचे गटानुसार सर्व लेखन तपासून त्यांना गुणदान करायचे आहे. विद्यार्थ्यांचे लेखन दिलेल्या वेबसाईटवर अपलोड करायचे आहे ऑनलाइन गुणदान करायचे आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांमधून गटनिहाय

 अ गट  इयत्ता तिसरी ते पाचवी

 ब गट इयत्ता सहावी ते आठवी 

 क गट इयत्ता नववी ते बारावी 
 
शब्द मर्यादा 
 
गट अ 50 ते 60 शब्द 
 
गट ब  60 ते 100 शब्द 
 
गट क 100 ते 150 शब्द 

 या शब्द मर्यादेत विद्यार्थ्यांकडून वाचलेल्या आवडत्या पुस्तकाविषयी अभिप्राय लेखन करून घ्यावे. सदर लेखन केलेला पेपर व्यवस्थित स्कॅन करून वेबसाईटवर अपलोड करावा. शाळेतील शिक्षकांनी गुणदान करायचे आहे.

 आपल्या शाळेतून गटनिहाय प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचे नंबर काढून आपले गटशिक्षणाधिकारी यांचेकडे पंचायत समितीमध्ये पाठवावेत. इतर सर्व लेखन केलेले व वेबसाईटवर अपलोड केलेले पेपर शाळेतच ठेवावेत.


तालुकास्तरावर किंवा महानगरपालिका स्तरावर सर्व शाळांनी यात सहभाग घ्यावा . लेखन स्पर्धा केवळ मराठीतच आहे याची कृपया नोंद घ्यावी. तालुकास्तरावर प्रत्येक शाळेतून गटनिहाय   प्राप्त झालेल्या प्रथम तीन क्रमांकामधून तपासणी करून नंबर काढण्यात येतील. तालुकास्तरावर निवडलेल्या क्रमांकांना  प्रशस्तीपत्र व पुस्तक स्वरूपातील  बक्षिसे देण्यात येतील.


 सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभागाचे  ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त होईल.


 तरी आपल्या शाळेतील इयत्ता तिसरी ते बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना या लेखन स्पर्धेमध्ये कृपया सहभागी करून घ्यावे.


 तसेच वाचलेल्या पुस्तकाविषयी अभिप्राय देतानाचा विद्यार्थ्यांचा  एक मिनिटाचा व्हिडिओ देखील आपण वेबसाईटवर अपलोड करू शकता. स्पर्धा लेखनाविषयीची आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांचे लेखन वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.


 याशिवाय तालुकास्तर व जिल्हास्तरावर ग्रंथ मेळावे देखील पंचायत समिती यांचे मार्फत होणार आहेत सदर ग्रंथ मेळाव्यांना देखील आपण भेट द्यावी.


एकूणच विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या वाचनाची गोडी निर्माण करणे, व्यक्तिमत्व विकसित करणे, हा या वाचन लेखन स्पर्धेचा उद्देश आहे.


 इंग्रजी हिंदी उर्दू गुजराती व इतरही सर्व माध्यमाच्या शाळांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा आणि मराठीतून लेखन करावे.


 सोबत मार्गदर्शनपर पत्र जोडले आहे.



 महावाचन उत्सव 2024 टीम,MPSP, समग्र शिक्षा चर्नी रोड मुंबई


राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव - २०२४ हा उपक्रम राबविण्याबाबत MPSP चे निर्देश. वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते, विचारांची क्षितिजे विस्तारित होतात, आणि व्यक्तीमध्ये सर्जनशीलता वाढते. विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे, आणि शैक्षणिक पुस्तकांचे वाचन करुन व्यक्ती नवीन माहिती आणि दृष्टिकोन प्राप्त करते. वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्ये सुधारतात, आणि व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते. वाचन केल्याने तणाव कमी होतो आणि मेंदूला चालना मिळतो. तसेच, वाचनामुळे आत्मविश्वास वाढतो. वाचन हे एक आवश्यक भाषिक कौशल्य आहे. त्यासाठीच व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजविणे आवश्यक आहे.


शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीत वाढ होते. वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात भर पडते. तसेच वाचनामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते.


सन २०२३-२४ मध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये 'महाराष्ट्र वाचन चळवळ' हा उपक्रम राबविण्याबाबतचा निर्णय दिनांक २२ नोव्हेंबर, २०२३ रोजीच्या संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. मा. राज्यपाल महोदय यांच्या हस्ते व मा. मुख्यमंत्री, मा. शालेय शिक्षण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ५ डिसेंबर, २०२३ रोजी सदर उपक्रमास सुरुवात करण्यात आला. सदर उपक्रमामध्ये सहभागी विद्यार्थ्याचे त्रयस्थ कंपनीकडून तपासणी केली असता सदर कंपनीच्या अहवालानुसार एकूण ७४,१०२ शाळा मधील ५२,८६, १८९ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. सदर उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. हे सर्व वाचनाची अभिरुची असल्यामुळेच झाल्याचे दिसून आले आहे. तसेच आपल्या सर्वांच्या सहकायनि शक्य झाले आहे.


विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद व मुलांमधील वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी सन २०२४-२५ या वर्षात देखील राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव २०२४ रिड
इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्यास शापनाने मान्यता दिली आहे. या उपक्रमाकरीता ज्येष्ठ अभिनेते श्री. अमिताभ बच्चन यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.


उपरोक्त संदर्भिय क्र. २ अन्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'महावाचन उत्सव - २०२४' हा उपक्रम राबविण्याबाबत शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने महाबाचन उत्सव २०२४ च्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे.


१. उपक्रमाची व्याप्ती :-
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ३री ते १२वी या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. यासाठी गट अ इयत्ता ३री ते ५वी, गट-ब-इयत्ता ६वी ते ८वी व गट-क-इयत्ता ९वी ते १२वी असे तीन गट निश्चित करण्यात येत आहेत.


२. उपक्रमाची उद्दिष्टे :-


I. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे.


II. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे,III. मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे.

IV. दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करुन देणे,


V. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासास चालना देणे.


VI. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे.


३. उपक्रमाचा कालावधी :-


दिनांक १६ ऑगस्ट, २०२४ ते दि. ३१ ऑगस्ट, २०२४ या कालावधीत 'महावाचन उत्सव-२०२४' हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी राबवावयाचा आहे.उपरोक्त तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे १० च्या मर्यादित शाळेच्याच शिक्षकांनी गुणदान करावे. शिक्षकांच्या केलेल्या गुणदानानंतर नियुक्त केलेल्या समितीकडून तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर गुणांकन करण्यात यावे. 

शाळांनी आपल्यास्तरवरील प्रथम, द्वितीय, तृतीय विदयार्थीची निवड करावी. प्रत्येक शाळेने
फक्त प्रथम तीन क्रमांकाच्या विदयार्थ्यांची नावे तालुकास्तरावर पाठवावी.
प्रत्येक तालुक्यातील निवड करण्यात आलेले प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक जिल्हयास कळविण्यात यावे. 
तालुक्यातून पात्र विदयार्थ्यांच्या यादीतून जिल्हास्तरावर (मनपासह) प्रथम, द्वितीय, तृतीय विदयार्थ्यांची निवड करण्यात यावी. जिल्हयांकडून पात्र विदयार्थ्यांमधून राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय विदयार्थ्यांची निवड करण्यात यावी.


५. उपक्रमाचे स्वरुप :-


५.१ या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी https://mahavachanutsav.org या नावाने web application विकसित करण्यात आले आहे. राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाच्या नोंदणीकरिता ही प्रणाली उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

५.२ या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य जगातील नावाजलेल्या साहित्यकांचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे इ. साहित्याची निवड करुन वाचन करतील.

५.३ सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरुपात शाळांमार्फत https://mahavachanutsav.org च्या web application वर अपलोड करतील, यासाठी गट अ-इयत्ता ३री ते ५ वी करिता ५० ते ६० शब्द, गट ब- इयत्ता ६वी ते ८वी करिता ६० ते १०० शब्द व गट क इयत्ता ९वी ते १२वी करिता १०० ते १५० शब्दांची मर्यादा आहे. 

५.४ सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारा एका मिनिटाचा व्हिडिओ/ऑडिओ क्लिप तयार करतील या व्हिडिओ/ऑडिओ ची तपासणी
करुन हे व्हिडीओ/ऑडिओ https://mahavachanutsav.org च्या web application वर मुख्याधापकांनी अपलोड करावे. अपलोड करावयाचे व्हिडिओ/ऑडिओ महाबाचन 
उत्सवाशी संबंधित असल्याची खात्री मुख्याध्यापकांनी करणे आवश्यक राहील.

५.६ वाचनीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावे दि.२६/०८/२०२४ ते दि. ०४/०९/२०२४ या कालावधीत भरविण्याची जबाबदारी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर अनुक्रमे गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांची आहे. यासाठी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय/खाजगी ग्रंथालयाची मदत घ्यावी.

कार्यक्षेत्रातील अधिकाअधिक शिक्षक, पालक व विदयार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी. यासाठी लागणारी तरतुद उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


एकूण तरतूद रु. ६१,२०,०००


१. तालुकास्तर ग्रंथालय प्रदर्शन रु. ) (४०८४१५,०००
१५,०००/-
रु.५०,०००/-
रु. १८,००,०००/
२. जिल्हास्तर (मनपासह) ग्रंथालय
प्रदर्शन (३६५५०,०००)
एकूण
रु. ७९,२०,०००/-

५.६.१ उपरोक्त तरतुद जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर उपलब्ध करुन देण्यात 
येत आहे.


५.६.२ जिल्हयातील शासकीय ग्रंथालय, खाजगी ग्रंथालय, प्रकाशकांना तसेच शासकीय प्रकाशकांना/ वितरकांना आमंत्रित करुन ग्रंथ प्रदर्शन / मेळावा आयोजित करावा.


५.६.३ विदयार्थ्यांना वाचनासाठी क्यानुरुप विविध प्रेरणादायी पुस्तके, कथा, कविता, कांदब-या, आत्मचरित्र, प्रवास वर्णन इ. प्रदर्शनात / मेळाव्यात असावेत, ५.६.४ ग्रंथ प्रदर्शन / मेळावे सर्वांसाठी सोयीचे ठिकाणी भरवावेत.


६. अंमलबजावणी करणारी यंत्रणा :-


सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीकरिता शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राबाबत ही जबाबदारी संबंधित समकक्ष अधिकाऱ्यांची असेल. तालुकास्तरावर गट शिक्षणाधिकारी यांच्या अधिनस्त सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सहभागी करुन घ्यावे त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.

 ७. परिक्षण व पारितोषिके :-


उपक्रमासाठी तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक अनुज्ञेय असेल. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राचा दर्जा स्वतंत्र शैक्षणिक विभागाप्रमाणे असेल. प्रत्येक स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावरील विद्यार्थ्यांची निवड तीन गटांमध्ये स्वतंत्रपणे करावी.



महावाचन उत्सव-२४ या उपक्रमाची अंमलबजावणी ही सर्व माध्यमांच्या सर्व शाळामध्ये राबविण्यात येणार असल्याने या उपक्रमात सहभागी विदयाथ्याँचे लेखन/व्हिडीओ अपलोड केल्यानंतर सहभाग प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येईल.


महावाचन उत्सव-२४ या उपक्रमाकरिता उपलब्ध करुन दिलेले web application वापरासबंधीची काही अडचणी असल्यास admin@mahavachanutsav.org या mail करावा तसेच तांत्रिक सहाय्य मिळण्याकरिता संपर्क क्र. ९१३६३८२३५५ यावर संपर्क करावा,
प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना जिल्हास्तर व गट शिक्षणाधिकारी यांना तालुकास्तरकरीता नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. या उपक्रमात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सहभागी होतील याची दक्षता घ्यावी. शिक्षणाधिकारी / गट शिक्षणाधिकारी यांनी वेळोवेळी आढावा घेऊन उपक्रम यशस्वी करावा.


सोबत :- प्रणाली हस्तपुस्तिका (Manual).


(आर विमला भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक, 
म.प्रा.शि.प., मुंबई
महवाचन उस्तव २०२४
 अंतर्गत आपल्याला 

https://mahavachanutsav.org

या वेब एप्लिकेशन्स वर आपली शाळांनी माहिती भरायची आहे. 
याकरिता 1. शाळांनी त्यावर लॉगिन करून आपली प्राथमिक माहिती भरावी. 
2. यात शाळांनी आपले user id तयार करायचा आहे. 
3. त्या युजर id आपले विद्यार्थ्याची माहिती अपलोड करायचा आहे. त्यामुळे शाळांनी आपला युजर आयडी नीट तयार करावयाचा आहे. तसेच त्यांचा पासवर्ड ही लक्षात ठेवायचं आहे. 
4. तालुका, जिल्हा, विभागीय, तसेच राज्यस्तर असे रिपोर्ट तयार होतील. त्यावरून आपल्या अधिनास्त कोण किती काम झाले याचा मागोवा घेऊन आपले काम करता पूर्ण करता येईल.

https://mahavachanutsav.org

या लिंकवर प्रत्येक शाळेने नोंदणी करावयाची आहे.


महावाचन उत्सव' या उपक्रमाबाबत Google link भरुन पाठविण्याबाबत MPSP चे दिनांक २ Feb २०२४ रोजी चे निर्देश पुढील प्रमाणे. 
महावाचन उत्सवाच्या कार्यवाहीबाबत संदर्भीय पत्र क्र. १ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तसेच संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये महावाचन उत्सव या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेला आहेत.

राज्यातील सर्व शाळांमध्ये "महावाचन उत्सव" हा उपक्रमांतर्गत विषय / थिम राबविण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण यांचा समावेश करण्याबाबतची थिम सर्व जिल्हा व महानगरपालिकांमध्ये राबविण्याबाबत संदर्भीय पत्र क्र.३ अन्वये अवगत करण्यात आले होते.

https://forms.gle/Na7J4UFsYqhmSh9b6

त्या अनुषंगाने सदर थिम आपल्या जिल्ह्यात राबविताना आपल्या जिल्ह्यातील एकूण शाळा संख्या, एकूण विद्यार्थी संख्या आणि सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या याचा तपशिल या कार्यालयास उलट टपाली कळविण्यात यावा. तसेच या सोबत https://forms.gle/Na7J4UFsYqhmSh9b6 Google link देण्यात येत आहे. यात अचूक माहिती भरुन दि. ०८/०२/२०२४ पर्यंत पाठविण्यात यावी.


(संजय डोर्लीकर)
उप संचालक (प्रकल्प /प्रशासन) म.प्रा.शि.प., मुंबई.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 
Download

नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........

या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत .
Pls subscribe for more educational video.
watch more and full videos

join whatsapp group here 👉👉


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)