शिक्षण सप्ताह - पाचवा दिवस दि. २६ जुलै २०२४ रोजी इयत्ता निहाय घ्यावयाचे उपक्रम
परिशिष्ट क्र. ५ अ
शिक्षण सप्ताह
दिवस पाचवा
शुक्रवार दि. २६ जुलै २०२४
कौशल्य दिवस
"सक्षम आणि स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य शिक्षण "
प्रस्तावना
शिक्षणाबद्दल जागृती व महत्व अधोरेखित करण्यासाठी शिक्षा सप्ताह हा कार्यक्रम या वर्षी भारतात साजरा करण्यात येत आहे.देशाच्या सर्वांगीणविकासात कौशल्य शिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी या आठवड्यात एक दिवस कौशल्य शिक्षणाबाबत विविध उपक्रम घ्यावयाचे आहे.
या उपक्रमांतर्गत एक दिवस कौशल्य आणि डीजीटल शिक्षण यांतर्गत विविध उपक्रमाद्वारे २१ व्या शतकातील क्षमता व कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये साध्य करून त्यांना सक्षम करू शकतो.
कौशल्य शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यामध्ये रोजगारक्षमता वाढते,व्यक्तिमत्व विकास होतो व आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यामध्ये कौशल्य निर्मिती अभ्यासक्रमामुळे त्यांना नेमके काय करायचे आहे याची दिशा मिळते,त्यांच्या करिअर मध्ये प्रगती करण्यास सहाय्य मिळते, उद्योजकीय कौशल्य निर्माण होऊन रोजगार निर्मिती करता येते. यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत प्रत्येक विद्यार्थी योगदान देऊ शकतो. विद्यार्थ्यामधील क्षमता व आवडीनुसार त्यांच्यामध्ये कौशल्य निर्मिती केल्यास व्यवसाय शिक्षणाचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात साध्य होऊ शकतात.
पार्श्वभूमी
भारताची तरुण व उत्पादक वर्गातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यांना भविष्यवेधी कौशल्यासंबंधी सक्षम करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ ,शैक्षणिक धोरण २०२०,राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२३ यामध्ये शिक्षणासोबत कौशल्य विकसनाच्या महत्वावर भर देण्यात आलेला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी या कार्यक्रमातील एक दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन विशेषत्वाने करायचे आहे.यामुळे विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांची ओळख करून देऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चे सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल.
याची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत :
१) जागृकता वाढविणे : यांतर्गत विद्यार्थ्यांना विविध उपलब्ध कौशल्ये याबाबत माहिती द्यावयाची आहे.
२) सेतू निर्माण करणे - शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम यातील अंतर कमी करण्यासाठी तज्ञ प्रशिक्षक, संस्था आणि नियोक्ते याबाबत माहिती उपलब्ध करून देणे यात अपेक्षित आहे
३) आवड निर्माण करणे -पारंपारिक व्यवसायाच्या पलीकडले व्यवसायाचे मार्ग शोधण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करणे यात अभिप्रेत आहे.
४) यशोगाथा - कौशल्य शिक्षणातून समाजात यशस्वी योगदान देणान्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथेचा प्रसार यातून केला जाणार आहे.
कौशल्य दिवस या उपक्रमांतर्गत खालील उपक्रमाचे शाळेत अयोजन करता येईल. खाली दिलेल्या उपक्रमाचे आयोजन करताना कोणत्या विद्यार्थीकृतीचा समावेश करता येईल याबाबत सविस्तर वर्णन करण्यात आले आहे.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य प्राप्तीसाठी उपक्रमाचे आधीच नियोजन करणे शक्य होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती करण्यासाठी खालील उपक्रमांतर्गत अधिकच्या कृतींचा समावेश करता येऊ शकेल.
१) संवाद कौशल्य,विक्री कौशल्य व विपणन कौशल्य (marketing) यांची ओळख-
उपक्रम - भूमिकाभिनय
विद्यार्थी कृती: यांतर्गत विद्यार्थी संवाद कौशल्य, विक्री कौशल्य संबंधित विविध तंत्रे आणि विपणन धोरण यासंदर्भात कौशल्य विकसित करण्यासाठी भूमिकाभिनय या उपक्रमात सहभागी होतील.
ग्राहक प्रतिबद्धता व उत्पादन सादरीकरण
१) यात अभिरूप वातावरणात विद्यार्थी ग्राहकांना सेवा उपलब्धतेबबात माहिती सांगतील
२) सेवा व उत्पादने याबाबत ग्राहकांना प्रभावीपणे माहिती देतील.
३) ग्राहकांच्या गरजेनुरूप सेवा व उत्पादनाचे वैशिट्य सांगतील\आक्षेप हाताळणे व विक्रीबाबत योग्य निवड उपलब्ध करून देणे -
१) विद्यार्थी ग्राहकांचे आक्षेप अभिरूप वातावरणात आत्मविश्वासपूर्वक हाताळतील
२) ग्राहकांना खरेदीचा योग्य निर्णय घेण्यासाठी मन वळवण्याच्या तंत्राचा वापर करून विक्रीसाठी उपलब्ध पर्याय सांगतील.
*ग्राहक ओळख व निश्चितीकरण व बाजार संशोधन
१) विद्यार्थी लोकसंख्याशास्त्र ,मानसशास्त्र,वर्तनावर आधारित वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा लक्ष्य गट निश्चित करतील
२) विद्यार्थी ग्राहकांची प्राधान्ये ,स्पर्धकांचे विश्लेषण समजून घेण्यासाठी बाजार संशोधन करतील मॉक मार्केटिंग कॅम्पेन डेवलपमेंट
१) विद्यार्थी शाळेतील उपक्रम ,कार्यक्रम याबाबत माहिती देण्यासाठी मॉक मार्केटिंग मोहिमेत सहभागी होतील
२) पोस्टर्स ,फ्लायर्स,मिडिया पोस्ट्स यासारखी प्रचारात्मक सामग्री विद्यार्थी तयार करतील
३) लक्ष्यगट ग्राहकांना आकर्षित करण्यास व खरेदीप्रक्रियेत गुंतवून ठेवण्यास आकर्षक जाहिराती व विविध धोरणाची आखणी विद्यार्थी करतील
२) सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती
उपक्रम -ऐतिहासिक स्थळाला भेट
कौशल्य-ऐतिहासिक जागृती, सांस्कृतिक समज,निरीक्षण व विश्लेषण
विद्यार्थी कृती:
१) या उपक्रमातून विद्यार्थी एखाद्या ऐतिहासिक वास्तुबद्दलचा संपन्न वारसा ,व विशिष्ट संसृतिक महत्व याब्त माहिती घेतील
२) विद्यार्थी ऐतिहासिक स्थळ तज्ञ किंवा गाईड यांच्या मदतीने वस्तूबाबत माहिती घेतील.
३) यात विद्यार्थी त्या वास्तूचा इतिहास ,ऐतिहासिक पात्र वास्तुशिल्प वैशिष्ट्ये याबाबत माहिती घेतील
४) विद्यार्थी यात वास्तुशिल्प अभ्यास,संदर्भ साहित्य अभ्यास आणि सदर वस्तूचा स्थानिक क्षेत्रातील इतिहास व वारसा यावर होणान्या परिणामाबाबत चर्चा करतील
५) ऐतिहासिक वारसाच्या जतन व संरक्षणाचे महत्व ,त्यांचे भूतकाळातील संस्कृती समजून घेण्यात त्यांचे महत्व,समकालीन समाजावर त्याचा होणारा परिणाम याबाबत चर्चा करतील
६) विद्यार्थी विविध गोळा केलेल्या ऐतिहासिक कलाकृती व वस्तू यांच्या संग्रहातून शाळेमध्ये ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचे प्रदर्शन करू शकतील
७) विद्यार्थी ऐतिहासिक व्यक्तींचे योगदान याबाबत त्यांच्या उपलब्ध स्मारकातून माहिती गोळा करतील
८) स्थानिक इतिहासातील महत्वाच्या व्यक्तीचे त्यांचे समाजातील योगदान,त्यांचे कार्य यावर चर्चा करतील व त्यांच्या सन्मानाचे महत्व समजून घेतील
९) इतिहासात योगदान देणान्या व्यक्ती व वास्तूच्या माहितीतून विद्यार्थी मुल्ये व समाजातील योगदान याबाबत माहिती जाणून घेतील
३) निसर्ग व शेतीतून अध्ययन
उपक्रम- सेंद्रिय शेती, बागायती रोपवाटिका, कृशिबजार, दुग्ध संकलन केंद्र, पशुपालन प्रशिक्षण केंद्र, सहकारी संस्था, उद्याने, वने, बाग, तळे यांना भेट याउपक्रमांचा समावेश यात करता येईल.
कौशल्य : पर्यावरणीय जागरूकता, शोध, सर्जनशीलता
विद्यार्थी कृती:
१) विद्यार्थी या उपक्रमांतर्गत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्ट पूर्तीसाठी भेट देतील
२) विविध वनस्पती, प्राणी, विविधता, सातत्य, नैसर्गिक प्रक्रिया यांचे मुद्देनिहाय निरीक्षण करतील
३) विद्यार्थी सजीवांच्या प्रकारांचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्तन, प्राण्यांची राहण्याची ठिकाणे याबाबत निरीक्षण करतील .
४) फायदेशीर कीटक व हानिकारक कीटक यांचे वर्गीकरण करतील
४) घरगुती कामातून शिकणे
उपक्रम - स्वयंपाक, स्वच्छता, बागकाम
कौशल्य -नियोजन, मोजमाप, वेळेचे व्यवस्थापन, संयम आणि पर्यावरणाची समज स्वयंपाक
१) विद्यार्थी स्वयंपाकातील एखादा खाद्य घटक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, पाक कृती, त्यादरम्यान आवश्यक सुरक्षितता नियम, स्वच्छता याबाबत माहिती सांगतील.
२) साफसफाई व स्वच्छता - विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व विशद करतील, याबाबत शालेय, वर्ग स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतील.
३) बागकाम -विद्यार्थी, विविध वृक्षांची लागवड,त्याची काळजी, संगोपन, पर्यावरणीय घटकांचा वनस्पतीवर होणारा परिणाम याबाबत उपक्रम राबवतील
५) हॅकेथॉन- उपक्रम-कोडींग स्पर्धा
कौशल्य-समस्या निराकरण, प्रोग्रामिंग, संगणीकरण
विद्यार्थी कृती:
१) विद्यार्थी गटामध्ये कोडींग स्पर्धा किंवा अप्लिकेशन तयार करण्यासाठी कार्य
करतील.
२) प्रकल्पाचे सादरीकरण करतील
६) प्रसार माध्यम आणि करमणूक
उपक्रम- अॅनिमेशन आणि डिजिटली कथा सांगणे.
कौशल्य- संगणकीय विचार, कथा सांगणे, डीजीटल साक्षरता
विद्यार्थी कृती:
१) विद्यार्थी स्क्रँच या अप्लीकेशनच्या माध्यमातून कथा तयार करतील.
२) या उपक्रमातून विद्यार्थी कोडींग व अॅनिमेशनचे मुलभूत घटक शिकतील
७) डिझाईन
उपक्रम-डिझाईन थिंकिंग कार्यशाळा
कौशल्य-सहानुभूती, सर्जनशील विचार, समस्या निराकरण
विद्यार्थी कृती:
१) या उपक्रमातून विद्यार्थी वर्गाचा नकाशा तयार करतील आणि त्याचा उपयोग
इतर उपक्रम राबविण्यासाठी कसा उपयोग होईल याचा विचार करतील.
२) शालेय उपहार गृहातील कचरा कमी करून तेथील जागेचा जास्तीत जास्त
उपयोग कसा करता येईल याचा आराखडा विकसित करतील.
३) यांसारख्या उपक्रमाचा यात सहभाग करता येईल.
(विद्यार्थी आनंद वर्गाची भन्नाट कल्पना , सुधा मूर्ती यांची पुस्तके,रीडर्स
डायजेस्ट इ. यासारख्या पुस्तकांचे वाचन करून out of box विचार करू
शकतील).
८) मातीकाम कौशल्य
उपक्रम-मातकामातील विविध कौशल्याची माहिती देणे.
कौशल्य- शारीरिक कौशल्य, सर्जनशीलता, कारक कौशल्य इत्यादी.
विद्यार्थी कृती:
१) विद्यार्थी एक कला प्रकार म्हणून मातीच्या वस्तू तयार करणे याचा इतिहास
व महत्व याची माहिती घेतील.
२) मातीपासून विविध वस्तू उदा. वाट्या, फुलदाणी तयार करतील.
९) बांबू कला कार्यशाळा-
उपक्रम-बांबू हस्तकला
कौशल्य- शारीरिक कौशल्य, सर्जनशीलता, कारक कौशल्य, पर्यावरण
जागरूकता इत्यादी.
विद्यार्थी कृती:
A)बांबू क्राफ्ट तंत्र
१)) आयोजित कार्यशाळेमध्ये बांबू कापणे, आकार देणे आणि जोडणे यांच्या
पारंपारिक पद्धतीचा वापर करावयास शिकतील
२) यासाठी चाकू किंवा करवत याचा वापर व त्या दरम्यानची सुरक्षितता यांचे
पालन करतील.
३) बांबूच्या वस्तू तयार करण्यासाठी विविध पद्धती शिकतील.
B) बांबू हस्तकला प्रकल्प
१) यामध्ये विद्यार्थी बांबूपासून बास्केट, फुलदाण्या, पेन स्टँड यासारख्या वस्तू
तयार करतील.
२) या वस्तूंना आकर्षक करण्यासाठी रंगवणे, सजवणे इत्यादीसारख्या विविध
तंत्राचा शोध घेतील.
३) बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनात सहभाग घेतील.
१०) पिशवी निर्मिती कार्यशाळा-
उपक्रम-चिंध्या पासून पिशव्या बनवणे.
कौशल्य- शिवणकाम, कारक कौशल्य, सर्जनशीलता.
विद्यार्थी कृती:
१) या कार्याशाळेमध्ये विद्यार्थ्यांना निरोपयोगी कपड्यांपासून पिशव्या तयार
करणेबाबत माहिती दिली जाईल.
२) या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पिशव्या तयार करण्यासाठी लागणारे साहित्य,
तंत्र, विविध प्रकारच्या पिशव्यांचे उपयोग माहिती होईल.
३) विद्यार्थी स्वतः उपलब्ध साधनातून पिशवी तयार करतील.
११) सुरक्षित पाणी
उपक्रम-पाणी चाचणी कार्यशाळा.
कौशल्य- वैद्यानिक दृष्टीकोन, निरीक्षण, विश्लेषणात्मक विचार.
विद्यार्थी कृती:
२) या उपक्रमातून विद्यार्थी पाण्याची गुणवत्ता तपासण्याची वैद्यानिक पद्धती
शिकतील.
२) विविध स्त्रोतातून पाण्याचे नमुने गोळा करून पाण्याची गुणवत्ता तपासतील.
३) विद्यार्थी विविध चाचणी पद्धती, स्वच्छ पाण्याचे महत्व आणि पाणी
चाचणीसाठी लागणारे साहित्य याबाबत माहिती घेतील.४) जवळच्या जलस्त्रोतातील पाणी दुषित करणारे घटक आणि त्यांच्या
आरोग्यावरील परिणामांबद्दल माहिती घेतील.
५)या कार्यशाळेत पाणी शुद्धीकरण पद्धतीचे प्रात्यक्षिक याचे निरीक्षण
करतील.
१२) मातीची सुपीकता
उपक्रम - माती परीक्षण कार्यशाळा.
कौशल्य -वैद्यानिक निरीक्षण, माहिती संकलन, विश्लेषण
विद्यार्थी कृती:
१) या कार्यशाळेत विद्यार्थी मातीच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्याच्या पद्धती
जाणून घेतील.
२) कार्यशाळेसाठी विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणातून मातीचे नमुने गोळा करून
आणतील
३) माती परीक्षण कीट वापरून मातीचा पोत, PH पातळी, पोषक घटक यांचे
विश्लेषण करतील.
१३) व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट
उपक्रम - व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट
कौशल्य-व्यवसाय मार्गदर्शन, सहयोग
विद्यार्थी कृती:
१) शालेय अथवा वर्गस्तरावर यशस्वी व्यावसयिक किंवा उद्योजक यांच्या
व्याख्यानातून त्यांचा व्यवसायाचा प्रवास जाणून घेतील.
२) व्यावसायिकांच्या व्यवसाया दरम्यान आलेले अडथळे व त्यावर केलेली
मात, टिकवलेले सातत्य याबाबत माहिती घेतील.
३) यशस्वी व्यवसायासाठी आवश्यक कौशल्यांची माहिती घेतील.
१४) प्रथमोपचार कार्यशाळाउपक्रम- प्रथमोपचार कार्यशाळा
कौशल्य-गट कार्य, आरोग्य रक्षण, चिकित्सक विचार
विद्यार्थी कृती:
१) विद्यार्थी प्रथमोपचार कार्यशालेमध्ये एखादा अपघात झाल्यास उदा.
गुदमरणे, बेशुद्ध होणे कोणता प्रथमोपचार करावा याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण
घेतील.
२) विद्यार्थी प्रथमोपचार तंत्राचा वापर करण्यासाठी वैद्यकीय तज्ञाद्वारे माहिती
घेतील व पुतळ्यावर त्याचे प्रत्यक्षिक करून बघतील.
• कौशल्य शिक्षण दिवस उपक्रमांतर्गत खालील घटकांचा सहभाग
घेण्यात यावा.
२) इयत्ता ६ वी ते १२ वी चे विद्यार्थी
२) पालक आणि शिक्षक
३) व्यावसायिक समुपदेशक
४) उद्योग प्रतिनिधी
५) शालेय प्रशासनातील घटक
६) शालेय शिक्षणाशी संबंधित व्यक्ती
• सदर कौशल्य विषयक उपक्रम राबवण्यासाठी खालील संस्थांचे
सहकार्य घेता येईल.
१) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ
२) राष्ट्रीय व्यावसयिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद
३) PSS सेन्ट्रल इंस्तीत्युट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन
४) सेक्टर स्कील कौन्शील
५) स्थानिक उद्योग संस्था
६) संबंधित शिक्षण संस्था.
· संबधित उपक्रमांचा प्रसार :-शाळा, समाज माध्यम, स्थानिक प्रसार माध्यम द्वारे संबधित
उपक्रमांचा प्रसार करण्यात यावा.
· अध्ययन निष्पत्ती :-
१) विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमध्ये कौशल्य शिक्षणाबाबत
जागरुकता आणि आवड निर्माण होईल.
२) व्यावसायिक व कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून विविध उपलब्ध
व्यवसायांची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.
३) शैक्षणीक संस्था, उद्योग संस्था, व्यवसाय शिक्षण संस्था यातील
साहचर्य वाढीस लागेल.
४) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा २०२० चे कौशल्य शिक्षणाचा मुख्य
शिक्षणाच्या प्रवाहात समावेश करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.
कौशल्य दिवस हा उपक्रम राबविण्यासाठी वरील उपक्रमांचा समावेश
करता येईल. याशिवाय उपलब्ध व स्थानिक परिस्थितीनुसार खालील उपक्रमांचा
समावेश देखील करता येईल.
वरील उपक्रमांचे शालेय स्तरावर विद्यार्थी संख्या व स्थानिक परिस्थिती लक्षात
घेऊन अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. उपक्रमाचा हेतू विद्यार्थ्यांना कौशल्य
प्राप्ती हा असावा.
नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........