शिक्षण सप्ताह - दुसरा दिवस दि. २३ जुलै २०२४ रोजी इयत्ता निहाय घ्यावयाचे उपक्रम

Rajan garud
0

शिक्षण सप्ताह - दुसरा दिवस दि. २३  जुलै २०२४  रोजी इयत्ता निहाय घ्यावयाचे उपक्रम



परिशिष्ट क्र.२ शिक्षा सप्ताह दिवस दुसरा मंगळवार दि.२३ जुलै २०२४ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान :

समुदायाचा सहभाग :

- शाळांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले माता पालक गटांचा शाळेतील सदर उपक्रमात सक्रीय सहभाग घेण्यात यावा.

- उपरोक्त नमूद मुद्दा क्रमांक ८,११ यामध्ये नमूद बाबीनुसार उपक्रमाचे आयोजन करून पालक व समुदायाचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये प्राथमिक स्तरावर सन २०२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. सदर धोरणातील महत्वपूर्ण कार्यनिती पुढीलप्रमाणेः

१) पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण (ECCE) याला प्राधान्यक्रम

२) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या राष्ट्रीय अभियानाची निपुण भारत अभियान म्हणून अंमलबजावणी (शासननिर्णय २७ ऑक्टोबर २०२१)

३) उच्च दर्जाच्या वैविध्यपूर्ण अध्ययन व अध्यापन साहित्य। चे विकसन

४) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान गतिमान करण्यासाठी नियमित मूल्यांकन

५) बालकांच्या घरातील अध्ययनाकरिता पालकांचा व समुदायाचा सक्रीय सहभाग

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचे महत्व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता २ री च्या अखेरीस आकलनासह वाचन व मुलभूत गणितीय क्रिया करण्याची क्षमता प्राप्त करणे होय. संबंधित कौशल्ये ही पुढील बाबीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतात.

बोधात्मक विकास व सर्व अध्ययन क्षमतांचे विकसन

अध्ययनासाठी सकारात्मक दृष्टीकोन व आत्मविश्वास निर्मिती

समतामूलक शिक्षणाची खात्री व अध्ययन अंतर कमी करणे.

शिक्षणाच्या विविध स्तरावर विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी सक्षम करणे.

सप्ताहाचा दुसरा दिवस हा पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात यावा.

उदिष्टे :

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या दृष्टीने जाणीव जागृती निर्माण करणे.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक यशस्वी उपक्रम व कृती कार्यक्रम यांचे प्रदर्शन करणे.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाण- घेवाण करणे.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये शिक्षण तज्ञ, पालक व समुदाय यांचा सक्रीय सहभाग घेणे.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवसाकरीता आयोजित करावयाचे उपक्रम :

कार्यशाळा व परिसंवाद आयोजन: पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि आनंददायी अध्ययनासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाच्या संदर्भाने शाळेमध्ये शिक्षकांनी कार्यशाळा/परिसंवाद यासारख्या आंतरक्रियात्मक सत्राचे आयोजन करावे.

बालकांसाठी आंतरक्रियात्मक अध्ययन सत्राचे आयोजन :

1. शालेय परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा घेण्यात यावी.



२. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान संबंधित कौशल्याच्या विकसनाकरिता राज्याद्वारे विकसित व वितरीत करण्यात आलेल्या भाषिक खेळ पुस्तिका (मराठी, इंग्रजी, उर्दू) व जादुई गणित यामध्ये दिलेले भाषिक व गणितीय खेळ घेतले जावू शकतात. शाळेच्या सकाळच्या सत्रातील ३० मिनिटे भाषेचे तसेच ३० मिनिटे गणिताचे खेळ घेतले जावू शकतात.

३. वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता कथाकथनाचे व गणित तज्ञाच्या गोष्टीचे सत्र आयोजित करता येतील व संख्याज्ञानाची आवड निर्माण करण्याकरिता शालेय स्तरावर गणित अभ्यास मंडळ तयार करता येईल.

४. जादुई पिटारा/PSE कीट : शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले PSE कीट / महाराष्ट्र शासनाचा जादुई पिटारा यामधील साहित्याच्या माध्यमातून पूर्वप्राथमिक स्तरावर लेखनपूर्व व गणनपूर्व कृत्ती करून घेण्यात याव्यात.

५. वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता गोष्टीचा शनिवार या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावरील संपर्क अधिकारी (नोडल अधिकारी) हे शात्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे सत्र घेवू शकतात.

६. विद्यार्थ्यांना वर्गात, शाळेमध्ये समुदायाद्वारे विविध गोष्टीचे ऐकवाव्यात तसेच त्याचे वाचन करावयास लावाये व विद्यार्थ्यांना त्या गोष्टीवर आधारित वेविध प्रकारे अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन देता येईल.

७. राज्याद्वारे पुरविण्यात आलेल्या विविध अध्ययन साहित्याच्या माध्यमातून (जादुई पिटारा, पीएसइ संच) खेळाधारित अध्ययन / उपक्रम घेण्यात यावे तसेच बाहुलीनाट्थाचे सत्र आयोजित करता येईल.

८. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित भूमिका अभिनय, नृत्याचे कार्यक्रम तसेच मुळाक्षराची व अंकांची गाणी, विविध मुळाक्षराच्या व भौमितिक आकृत्याच्या रांगोळ्या, भाषा व गणित विषयातील संकल्पनेवर आधारित वर्ग सजायटी, पोस्टर निर्मिती यासारख्या कला व हस्तकौशल्य निगडीत कृतीचे प्रदर्शन भरविण्यात यावे व याबाबत पालकांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कला व हस्तकौशल्याचा समावेश का करण्यात आला आहे या संदर्भाने जाणीव जागृती करता येवू शकते.

९. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याची उदिष्टे, महत्य व जाणीव जागृती या अनुषंगाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित खालील लिंक वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या चित्र फितीचे प्रक्षेपण करण्यात यावे.




१०. शाळेमधील ग्रंथालयातील पुस्तके स्तरनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात यावीत व शाळेच्या सकाळच्या सत्रामध्ये घड्याळी एक तास वाचन तासिका घेण्यात यावी.

११. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या संदर्भाने निर्माण केलेले साहित्य व तदनुषंगिक बाबीच्या साह्याने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे.

१२. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या अभियानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी निपुणोस्तव कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रस्तुत कार्यालयातील गणित या विभागामार्फत दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र यामधील उपक्रमांचा देखील समावेश करता येईल.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र ने दिनांक 16 जुलै 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत.. दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक, सर्व प्रशासन अधिकारी, नपा/ नप/मनपा, सर्व शिक्षण निरीक्षक, (दक्षिण, पश्चिम व उत्तर) यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

संदर्भ: १. मा. सचिव, भारत सरकार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.D.O. No. ०२-०५/२०२४-IS.१४, दिनांक ०९ जुलै, २०२४. २. मा. उपसचिव शालेय शिक्षण विभाग यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२२८/ एस.डी. ४, दिनांक १२ जुलै, २०२४

महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शिक्षण घोरण२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भ क्र. १ नुसार कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.

शिक्षण सप्ताहामध्ये खालीलप्रमाणे उपक्रम रावण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहे.

मंगळवार, दि.२३ जुलै, २०२४
मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस (FLN Day) (परिशिष्ट २)

बुधवार, दि. २४ जुलै, २०२४
क्रीडा दिवस (Sports Day) (परिशिष्ट ३)

गुरुवार, दि. २५ जुलै, २०२४
सांस्कृतिक दिवस (Cultural Day) (परिशिष्ट ४)

शुक्रवार, दि. २६ जुलै, २०२४
कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस (Skilling and Digital Initiatives Day) (परिशिष्ट - ५अ ५ व)

शनिवार, दि.२७ जुलै, २०२४
मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम / शालेय पोषण दिवस (Eco Clubs for Mission LIFE/ School Nutrition Day) (परिशिष्ट ६)

रविवार, दि. २८ जुलै, २०२४
समुदाय सहभाग दिवस (Community involvement Day) (परिशिष्ट ७)

संदर्भ क्र. १ तसेच सोबतच्या परिशिष्ट १ ते ७ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार शिक्षण सप्ताहामधील उपरोक्त तक्त्यातील उपक्रमांची अंमलबजावणी नेमून दिलेल्या कालावधीत आपण पूर्ण करावी.
शिक्षण सप्ताहादरम्यान आयोजित उपक्रमांची छायाचित्रे व माहिती Tracker वर upload करणेबाबत दिलेल्या विहीत नमुन्यामध्ये माहिती जतन करून ठेवावी व मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी.

16/07/24

(राहूल रेखावार)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र, पुणे.


परिपत्रकासाठी डाऊनलोड करा. 

नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........

या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत .
Pls subscribe for more educational video.
watch more and full videos

join whatsapp group here 👉👉




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)