सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2023- 24 State Ideal Teacher Award लिंक व वेळापत्रक जाहीर

Rajan garud
0

 

सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 
 State Ideal Teacher Award


२०२३-२४आवेदने ऑनलाईन अर्ज लिंक वेळापत्रक सूचना




शिक्षण संचालक माध्यमिक यांनी दिनांक 21 जून 2024 रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते.



शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार वेबलिंकवर
 
या लिंकवर आपली आवेदने दिनांक २५ जून, २०२४ रोजी पासून दिनांक ०५जुलै, २०२४ रोजी पर्यंत सादर करावीत. सोबत पुरस्काराचे वेळापत्रक जोडले आहे. त्याप्रमाणे आपल्या स्तरावरील कालमर्यादित कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदर वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत आपणांस संचालनालय स्तरावरुन अवगत करण्यात येईल.


सदरील बाबत आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देखील स्वतंत्रपणे सूचना/लेखी आदेश निर्गमित करुन सर्व संबंधित शिक्षकांपर्यंत माहिती पोहचेल असे पाहावे.



(महेश पालकर)

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे १.



१) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई ४०० ०३२ माहितीसाठी सविनय सादर

२) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मुंबई ४०० ०३२ माहितीसाठी सविनय सादर


३) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे ४११००१ माहितीस्तव सविनय सादर.


Pdf डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.



नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........
या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत .
Pls subscribe for more educational video.
watch more and full videos

join whatsapp group here 👉👉

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)