इयत्ता 5 वी व 8 वीचा निकाल शैक्षणिक सत्र 2023- 24 कसा तयार करावा ? जाणून घेऊया ...
नवीन नियमावली शासन निर्णयानुसार
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 29 मे 2023 व शासन निर्णय दिनांक 7 डिसेंबर 2023 नुसार इयत्ता पाचवी व आठवीसाठी नापास करण्याचे धोरण जाहीर केले आहे सदर आदेशानुसार इयत्ता पाचवी व आठवी साठी निकालासाठी नवीन नियमावली पुढील प्रमाणे.
इ. ५ वी ८ वी प्रथम सत्र सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन.
- द्वितीय सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन. वार्षिक परीक्षा द्वितीय सत्र अभ्यासक्रमावर आधारित.
- इ. ५ वी - मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित व परिसर अभ्यास १-२ लेखी परीक्षा ४० गुण तोंडी परीक्षा १० गुण एकूण ५० गुण
- इ.८ वी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र लेखी परीक्षा ५० गुण तोंडी १० गुण एकूण ६० गुण
- इयत्ता ५ वी व ८ वी कार्यानुभव, चित्रकला, शारीरिक शिक्षण प्रचलित सर्वकाश मूल्यमापन श्रेणी देणे
- इयत्ता ५ वी सर्व विषय ५० प्रमाणे एकूण २५० गुण.
- उत्तीर्ण गुण प्रत्येक विषय ३५% प्रमाणे १८ गुण.
- सवलतीचे गुण १० तीन विषयात सवलत. ५ गुण जास्तीत जास्त एका विषयात
- इ. ८ वी सर्व विषय मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र
- एकूण गुण ६०×६ = ३६०
- सवलतीचे गुण १० तीन विषयात ५ गुण जास्तीत जास्त एका विषयात
- प्रगती पुस्तक नाही - कार्ड देणे
- वर्णनात्मक नोंदी करू नये.
- शेरे- उत्तीर्ण / उत्तारीत / अनुत्तीर्ण / पुनर्रपरीक्षेक पात्र.
- परीक्षेस गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यात येईल.
- पुनर्रपरीक्षा अनुत्तीर्ण विषयाची पुनर्रपरीक्षा कार्या, शा. शि, चित्रकला पुनर्रपरीक्षा नाही. पुनर्रपरीक्षा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ३ दिवस आधी जाहीर करणे. पुनर्रपरीक्षेस सवलतीचे गुण ग्राह्य धरणे. फेरपरीक्षेक गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यास येईल.
वर्ग पाचवी व आठवीच्या सुधारित
नवीन निर्देशानुसार नमुना गुणपत्रिका.