सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी बालकाचे वय
शासन परिपत्रक
प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयातून निर्गमित दिनांक 22 फेब्रुवारी 2014 रोजीच्या परिपत्रकानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत परिपत्रक पुढील प्रमाणे.
शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या श निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्ष नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनां डिसेंबर २०२४ अखेर पुढील प्रमाणे राहील.
सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय,
नर्सरी मध्ये प्रवेश घेण्यासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत बालकाचे वय तीन वर्षे पूर्ण असावे.
ज्युनिअर केजी मध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकाची वय 31 डिसेंबर 2024 पर्यंत चार वर्ष पूर्ण असावे.
सिनियर केजी मध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकाचे वय दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत पाच वर्षे पूर्ण असावे.
तर इयत्ता म्हणजेच वर्ग पहिली मध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकाचे वय दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत सहा वर्षे पूर्ण असावे.
प्राथमिक शिक्षण संचालक माननीय शरद गोसावी यांचे सहिनिशी सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेली आहे.
महत्वाच्या अपडेट साठी 7875313385 हा माझा whatsapp नंबर तुमच्या जिल्ह्यातील शैक्षणिक ग्रुप वर अॅड करा.
Google search
Youtube link 👉👉 https://www.youtube.com/channel/UCl2goxlFKgiGGgkzWnrpI_Q