MDM Portal वर शाळा लॉगिन वरून back dated माहिती भरण्यासाठी आता सुविधा उपलब्ध
माहे एप्रिल 2023 ते माहे फेब्रुवारी 2024 या कालावधीतील Back dated daily attendance data entry सुविधा MDM PORTAL मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.......
सदर सुविधा दिनांक 27/02/2024 ते दिनांक 06/03/2024 या कालावधीत उपलब्ध असेल याची नोंद घ्यावी.....
कृपया आपल्या अधिनस्त सर्व शाळांना आवश्यक ते निर्देश देवून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी ही विनंती....
सदर संधी अंतिम असेल याची नोंद घ्यावी....
✍️ MDM Portal वर शाळा लॉगिन वरून back dated माहिती भरण्यासाठी सुविधा उपलब्ध झालेली आहे.
➡️ लॉगिन केल्यावर daily attendance मध्ये मागील महिना निवडून आपल्याला पाहिजे ती तारीख निवडून माहिती भरू शकता.
वरील लिंक ओपन केल्यास लॉगिन विंडो एईल User ID म्हणजेच शाळेचा UDise code व Password टाकून लॉगिन करा.
Daily Attendance मधे मागील महिना निवडा शाळेचे कामाचे दिवस तपासा ज्या दिवशी कामाचा दिवस असून देखिल माहिती भरली नाही तो दिनांक निवडा प्रत्येक वर्गाची उपस्थिती नोंदवा.
माहिती सेव करा तपासून घ्या Final करा.
पुन्हा वरील प्रक्रिया करा.
काही अडचन आल्यास आपल्या तालुका MDM कक्ष सोबत सम्पर्क साधा.
महत्वाची सूचना ....
*MDM डिसेंबर महिना बॅकडेटेड माहिती भरणे सुरू झाले आहे . तरी सर्वांनी शाळा MDM लॉगिन करून भरावी .
👉👉👉*गुगल क्रोम वर MDM लॉगिन सर्च करावे.
- सर्वप्रथम शाळा MDM लॉगिन करावी. यू डायस नंबर टाका. लॉगीन ID म्हणुन तोच आहे.
- शाळेचा एमडीएम पासवर्ड व कॅपच्या कोड टाकावा.
- लॉगीन झाल्यावर सबमिट बटन क्लिक करा.
- कॅलेंडर येईल. निळ्या रंगाची दिनांक माहिती भरलेली आहे. डिसेंबर महिना 23 साल निवडून तिथेही कोणत्या दिवसाची माहिती राहिली आहे ते पाहावे.आलेले कॅलेंडर घालवावे.
- MDM daily attendance टच करावे.
- दिनांक टच करावे.
- 2024 ऐवजी 2023 साल निवडावे.
- डिसेंबर महिन्याचे कॅलेंडर ओपन होईल.
- या तारखेची एमडी माहिती राहिली आहे ती तारीख टच करावी.
- माहिती भरली नसेल तर कोरी माहिती दिसते त्या ठिकाणी इयत्तावार उपस्थिती व ताटांची संख्या टाकावी.
- त्या दिवशीचा धान्यादी माल निवडावा.
- update या बटनावर क्लिक करा.
- माहिती भरलेली successfuly हा मेसेज येईल.
याप्रमाणे डिसेंबर महिन्याची राहिलेली सर्व माहिती भरावी.