नवतरुण मित्र मंडळ माळकरीपाडा, सफाळे येथे "नृत्य जल्लोष नवतरुणचा २०२३" हा पालघर जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात
सफाळे,माळकरी पाडा दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ मंगळवार रोजी नवतरुण मित्र मंडळ माळकरीपाडा, सफाळे येथे "नृत्य जल्लोष नवतरुणचा २०२३" हा पालघर जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. गेल्या नऊ दिवसापासून नवतरुण मित्रमंडळ माळकरी पाडा, सफाळे येथे ''नवरात्रौत्सव 2023'' मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. अगदी शांततेत नऊ दिवस उत्कृष्ट रास गरबा नृत्य करणाऱ्यांना बक्षिसे वाटपाची खैरात पाहण्यास मिळाली. वेशभूषा स्पर्धा सुद्धा अतुलनीय स्वरूपात झाल्या. महिला मंडळ यांची हळदीकुंकू कार्यक्रम जल्लोषात साजरा झाला.
"नृत्य जल्लोष नवतरुणचा २०२३" चे आकर्षण ठरले ते समूह नृत्य स्पर्धा या स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, सातपाटी, वसरे, पालघर आणि डहाणू येथील नृत्य कलाकारांचे गट आले होते. प्रत्येक नृत्यात एकीचा, समतेचा संदेश, देवीला साकडे घातलेले दिसले, सांस्कृतिक आदिवासी नृत्य, धनगर नृत्य, रीमिक्स साँग, शिवरायांच्या जीवनावरील मावळ्यांची कहाणी, तृतीय पंथी यांच्या भाव भावनांना चिरणारा नृत्य प्रकार बघण्यास मिळाला. सदर कार्यक्रमासाठी श्री. करण राबडे सर व श्री.मोहन लाखात सर हे परीक्षक म्हणून उपस्थित होते. तसेच श्रीम.वंदना ताई शेट्टी, श्री.गौरव बांगारा साहेब, श्री.प्रकाश काळे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. मंडळातील प्रत्येक पदाधिकारी, सल्लागार मंडळी व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमात गावातील एकीचे दर्शन पाहायला मिळाले. महिला मंडळ व लहान मुलांसाठी अनेकविध कार्यक्रम करण्यास नवतरुण मित्र मंडळ सदैव सक्षम आहेत.