एक राज्य एक गणवेश योजना; राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश मिळणार

Rajan garud
0

 एक राज्य एक गणवेश योजना; राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश मिळणार 




या वर्षाच्या सुरुवातीलाच शासनाने राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना दोन ड्रेस शासन पातळीवरूनच मोफत पुरवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, बऱ्याच शाळांनी स्थानिक पातळीवर गणवेश खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली होती. या कारणामुळे शासनाने घुमजाव करत एक हा निर्णय काही अंशी मागे घेतला होता. आता, मात्र पुढच्या वर्षी सन 2024-25 असा प्रकार होऊ नये म्हणून शासनाने आतापासूनच पाऊल उचललेले आहे. आजच्या (18/10/2024) शासन निर्णयात शासनाने पुढील वर्षी गणवेश प्रक्रिया कशी राबवणार आहे याबाबत खुलासा केला आहे.


एक राज्य एक गणवेश योजना, काय आहे निर्णय ?

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. १ ली ते इ.८ वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जगाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची गुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. तसेच, सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांनादेखील देण्याबाबतचा शासन निर्णय दि.०६ जुलै २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.


सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्याबाबत दि.०८ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे. समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या गोफत गणवेश योजनेंतर्गत सर्व पात्र शाळांतील इ. १ ली ते इ.८ वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून एक समान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरुन उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

 शासन निर्णय -

१) सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकसमान एक रंगाच्या दोन गणवेशांचा लाभ महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत देण्यात यावा.


2) सदर गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरूप (मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पैंट / पॅट तसेच, मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची) अशा स्वरूपात गणवेशाची रचना असावी. त्यापैकी एका गणवेशाला विद्यार्थ्याच्या शर्टवरती शोल्डर स्ट्रिप (Shoulder Strip) व दोन खिसे (Double Pocket) असणे आवश्यक आहे.  


३) प्रस्तुत योजनेंतर्गत राज्यातील पात्र असलेल्या सर्व विद्याथ्र्यांना एक रंग, एक दर्जा असलेला सारख्याच गणदेशाचा लाभ देण्याच्या दृष्टीने कापड खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रियेचा मसुदा तयार करणे, त्यासाठी आवश्यक त्या विभागांचे मार्गदर्शन घेणे, ई निविदा प्रक्रिया राबविणे, सर्व संबंधितांचा समन्वय राखणे याकरीता उपाययोजना करणे आदीबाबतची कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत करण्यात यावी.


४) सदर गणवेशाच्या शिलाईचे काम स्थानिक महिला बचत गटामार्फत करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने आवश्यक ती कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयाने करावी.


५) प्रस्तुत योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व विद्याथ्र्यांना शासनामार्फत समान रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने मोफत गणवेश योजनेबाबत संबंधित शाळा तसेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये.


६) सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षापासून सर्व पात्र विद्यार्थ्याना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळण्याच्या अनुषंगाने शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आवश्यक ती सर्व कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत करण्यात यावी. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१०१८१८०४५७३७२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)