शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ आता १५ नोव्हेंबर पर्यन्त मुदतवाढ
महाराष्ट्र शासनशालेय शिक्षण व क्रीडा विभागराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रसिद्धी निवेदन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक ११ मे २०२३ नुसार शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक-प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षक प्रशिक्षक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुली स्पर्धा २०२३-२४ चे शासनामार्फत आयोजन करण्यात येत आहे. सदरच्या स्पर्धेचे नामांकन प्रक्रिया दिनांक ०१ ऑगस्ट, २०२३ पासून सुरु झालेली आहे..
सदरच्या चळवळीच्या माध्यमातून संकलित करण्यात येणारे ई-साहित्य हे राज्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचे साठी संदर्भीय तसेच अध्ययन पूरक ठरणार आहेत. सदरच्या खुल्या स्पर्धेचे निकष, गटनिहाय विषय व पारितोषिकाबाबत सविस्तर तपशील.
https://tinyurl.com/bfvwia5d
या दि. ११/०५/२०२३ चे शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे. दिनांक १५ नोव्हेंबर, २०२३ पर्यंत https://scertmaha.ac.in/vcomp2023/ या लिंकवर क्लिक करून सदरच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांना या प्रणालीवर आपले नामांकन करता येईल तसेच या प्रणालीवर स्पर्धेबाबतचा सर्व तपशील व निकष उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपामध्ये; तर विजेत्या उमेदवारांना शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे पारितोषिके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या स्पर्धेबाबतच्या सविस्तर निकष देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत लवकरच निर्गमित केले जातील. तरी जास्तीत जास्त शिक्षक / मुख्याध्यापक/ शिक्षक प्रशिक्षक यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.(स्वाक्षरीत) संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
महाराष्ट्र शासनशालेय शिक्षण व क्रीडा विभागराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
उपरोक्त संदर्भीय १ शासन निर्णयान्वये राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा
स्पर्धा २०२३ आयोजनाची जबाबदारी मा. संचालक, प्रस्तुत कार्यालय यांना सोपविण्यात आलेली आहे. याबाबत संदर्भ क्र. २ अन्वये राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ आयोजनासाठी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना कळविण्यात आले असून वेळोवेळी बैठकांचेही आयोजन करण्यात आलेले आहे. संदर्भ क्र. २ अन्वये राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ नावनोंदणीसाठी
https://scertmaha.ac.in/vcomp
२०२३ या लिंक वर दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ अखेर अंतिम मुदत देण्यात • आलेली होती. संदर्भ क्र. ४ अखेर ३०/०९/२०२३ तर संदर्भ क्र. ५ अखेर दिनांक १५/१०/२०२३ अखेर वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली होती.२. दिनांक १३/१०/२०२३ दुपारी ०४.०० मि. अखेर एकूण ६९२२ शिक्षकांनी नोंदणी केलेली आहे. राज्यामधील शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही चळवळ अधिक सक्रीय होऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचेमार्फत राज्यातील २,८९,५६० शिक्षक हे तंत्रस्नेही झाल्याचे आढळून आले आहे. कोविड १९ मध्ये ऑनलाईन शिक्षण, दीक्षा ॲप तसेच विविध स्तरावरील शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर पाहता राज्यात तंत्रस्नेही शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे. राज्यातील अंदाजे १.१० लाख शाळा, ५.५० लाख शिक्षक तसेच तंत्रस्नेही शिक्षकांची मोठी संख्या पाहता ६९२२ नोंदणी फारच कमी असून यात वाढ होणे गरजेचे आहे.
उपरोक्त बाबींचे अवलोकन करता प्रस्तुत स्पर्धेत शिक्षकांचे नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी आपण आपल्या कार्यक्षेत्रातील गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांना तालुका नोडल अधिकारी म्हणून आदेशित करून संबंधितांना खालीलप्रमाणे कार्ययोजना (action plan) अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना आपल्या स्तरावरून द्याव्यात.
- जबाबदार अधिकारी
१ . गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी२. विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख३. गटशिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी
- तपशील/ कामाचे स्वरूप
• तालुका / गट येथील सर्व क्षेत्रीय यंत्रणेच्या बैठका घेवून स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात येवून विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांना त्यांचे कार्यक्षेत्रात प्रस्तुत स्पर्धेसाठी नोडलअधिकारी म्हणून जबाबदारी देणे. स्पर्धा नोंदणीची सद्यस्थिती दाखवून चर्चा करणे.• प्रस्तुत स्पर्धेसाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमाच्या / व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापक / शिक्षकांच्या बैठका घेवून स्पर्धेची माहिती देणे.• आलेल्या मुख्याध्यापक/ शिक्षकांना गटनिहाय/ इयत्तानिहाय नोंदणीसाठी नियोजन करून देणे.• आपल्या कार्यक्षेत्रातील तंत्रस्नेही शिक्षक/ तज्ज्ञांचे इयत्तावर / विषयवार गट करणे.
४. गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी
• आपल्या कार्यक्षेत्रातील तंत्रस्नेही शिक्षक/ तज्ज्ञांच्या मदतीने तालुका/ बीट / केंद्र स्तरावर व्हिडिओ निर्मिती व एडिटिंग बाबत कार्यशाळांचे आयोजन करणे.५. गटशिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख
• तालुक्यातील एकूण शाळा संख्येच्या प्रमाणात ३०% शिक्षक नावनोंदणीचा आढावा दररोज प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना कळविणे.
कालावधी
माध्यम
ऑनलाईन/ ऑफलाईन
दिनांक १६ व १७ ऑक्टोबर, २०२३
दिनांक १८ व १९ ऑक्टोबर, २०२३
ऑफलाईन
दिनांक २० ते २३ ऑक्टोबर, २०२३
ऑफलाईन
दिनांक २५ ते २८ ऑक्टोबर, २०२३
ऑफलाईन
दिनांक १६ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर, २०२३
ऑनलाईन/ ऑफलाईन
प्रस्तुत स्पर्धेतील अटींमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत असून उर्वरित अटी जश्याच्या तश्याच लागू राहतील,
१. स्पर्धेमध्ये भाग घेण्याची (व्हिडीओसह नावनोंदणी) मुदत दिनांक १५/११/२०२३ पर्यंत वाढविण्यात येत आहे.
२. उमेदवार एकापेक्षा अधिक गटासाठी / इयत्तेसाठी नावनोंदणी करून भाग घेता येईल. उदा. प्राथमिक स्तरावरील उमेदवार माध्यमिक/ उच्च माध्यमिक / अध्यापक विद्यालय स्तरावर ही अर्ज सादर करू शकतात.
३. राज्यातील सर्व शिक्षण मंडळाचे (State Board/ CBSE/ICSE / IB / other ), सर्व व्यवस्थापनाचे (जि. प./म.न.पा./न.पा./शासकीय/अनुदानित/विनानुदानित/कायम विनानुदानित / स्वयंअर्थसाहाय्यीत) / सर्व माध्यमाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक प्रस्तुत स्पर्धेत भाग घेवू शकतात.
संदर्भ क्र. ३ नुसार अनेक शिक्षक, शिक्षक संघटना या विभागाशी दूरध्वनी वरून प्रस्तुत स्पर्धांचे नावनोंदणीसाठी मुदतवाढ देण्यासाठी विनंती करत आहे. सबब राज्यातील सर्व शिक्षकांची संख्या विचारात घेता अजून नोंदणी वाढविणे आवश्यक आहे. काही जिल्हे आदिवासी बहुल असल्याने, काही शिक्षकांना जिल्हास्तर क्षेत्रीय अधिकारी यांचेकडून कोणताही संपर्क न झाल्याने प्रस्तुत स्पर्धेचे नावनोंदणी बाबत माहिती नव्हती. यास्तव स्पर्धेचा लाभ मिळावा यासाठी https://scertmaha.ac.in/vcomp२०२३ या लिंक वर शिक्षकांनी गट इयत्ता, व्हिडिओ प्रकारानुसार नावनोंदणी करण्यासाठी दिनांक १५/११/२०२३ अखेर मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच विविध स्तरावरील मुल्यमापनाचा सुधारित कालावधी खालीलप्रमाणे,राज्यातील जास्तीत जास्त शिक्षकांना यातपशील / प्रमुख
सुधारित कालावधीतालुका
ऑनलाई नामांकननोंदणी वव्हिडिओदि. १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंतअपलोड करणे...
तालुकास्तरनिवड गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी१ सप्टेंबर २०२३ ते २०प्रक्रिया (BRC /URC)
जिल्हास्तरनिवडउपसंचालक,प्रादेशिकविद्या २१ नोव्हेंबर २०२३ ते ३०प्रक्रिया
प्राधिकरण/प्राचार्य, जिल्हा जिल्हा प्रशिक्षण संस्थाशिक्षण वनोव्हेंबर २०२३राज्यस्तरनिवडसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
१ ते १५ डिसेंबर २०२३प्रक्रियापरिषद, महाराष्ट्र, पुणेराज्यस्तरसमितीमार्फतपडताळणीअंतीउत्कृष्ट
माहे डिसेंबर २०२३ पर्यंतउमेदवारांची शासनास शिफारसराज्यस्तरमाहे जानेवारी २०२४ पर्यंत
पुरस्कार वितरण
उपरोक्त सुधारणा व्यतिरिक्त स्पर्धेचे इतर सर्व नियम या कार्यालयाच्या उपरोक्त संदर्भ क्रमांक २ च्या पत्रानुसार लागू असतील. करिता आपल्या क्षेत्रातील जास्तीत जास्त शिक्षकांना प्रस्तुत स्पर्धेसाठी नावनोंदणी करणेस आपल्या स्तरावरून आदेशित करण्यात यावे.
(अमोल येडगे भा.प्र.से.)संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद.महाराष्ट्र, पुणेप्रत माहितीस्तव -१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.२) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.३) शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. ४) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.E-mail: itdept@maa.ac.inदिनांक- १३/१०/२०२३.
महाराष्ट्र शासनशालेय शिक्षण व क्रीडा विभागराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणेप्रसिद्धी निवेदन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक ११ मे २०२३ नुसार शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक-प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षक प्रशिक्षक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुली स्पर्धा २०२३-२४ चे शासनामार्फत आयोजन करण्यात येत आहे. सदरच्या स्पर्धेचे नामांकन प्रक्रिया दिनांक ०१ ऑगस्ट, २०२३ पासून सुरु झालेली आहे..
सदरच्या चळवळीच्या माध्यमातून संकलित करण्यात येणारे ई-साहित्य हे राज्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचे साठी संदर्भीय तसेच अध्ययन पूरक ठरणार आहेत. सदरच्या खुल्या स्पर्धेचे निकष, गटनिहाय विषय व पारितोषिकाबाबत सविस्तर तपशील https://tinyurl.com/bfvwia5d या दि. ११/०५/२०२३ चे शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे. दिनांक १५ नोव्हेंबर, २०२३ पर्यंत https://scertmaha.ac.in/vcomp2023/ या लिंकवर क्लिक करून सदरच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांना या प्रणालीवर आपले नामांकन करता येईल तसेच या प्रणालीवर स्पर्धेबाबतचा सर्व तपशील व निकष उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपामध्ये; तर विजेत्या उमेदवारांना शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे पारितोषिके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या स्पर्धेबाबतच्या सविस्तर निकष देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत लवकरच निर्गमित केले जातील. तरी जास्तीत जास्त शिक्षक / मुख्याध्यापक/ शिक्षक प्रशिक्षक यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.(स्वाक्षरीत) संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
- जबाबदार अधिकारी
- तपशील/ कामाचे स्वरूप