सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्यांबाबत वेळापत्रक

Rajan garud
0

सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्यांबाबत वेळापत्रक ग्रामविकास विभागाचा आजचा शासन आदेश.


   



महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अंतर जिल्हा बदलांबाबत वेळापत्रक संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना शासन निर्णय निर्गमित करून पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.  


जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भाधीन दि.०७/०४/२०२१ व दि.२३/०५/२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या सन २०२२ मधील बदल्या संगणक प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या आहेत.


२. शालेय शिक्षण विभागाने संदर्भाधीन दि. २१/०६/२०२३ च्या शासन निर्णयान्वये, सन-२०२२ मधील विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निदेश आहेत. त्यानुषंगाने सन-२०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते मात्र रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती, फक्त अशाच सन-२०२२ च्या बदलीप्रक्रीयेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्याच्या अनुषंगाने आपल्या जिल्हयातील बिंदुनामावली तयार करण्याची प्रक्रीया पुर्ण करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याबाबत दि.०९.१०.२०२३ रोजी झालेल्या Video Confrance मध्ये संचालक शालेय शिक्षण यांनी आदेशीत केले होते. त्यानुसार सदर बिंदुनामावली पूर्ण करुन मंजूर करण्यात आलेली बिंदुनामावली बदली पोर्टल वर अपलोड करण्याची कार्यवाही सर्व जिल्हा परिषदा यांनी कोणत्याही परिस्थीतीत दि.२८/१०/२०२३ ते दि.२९/१०/२०२३ या कालावधीमध्ये पूर्ण करावी. याबाबत काही प्रश्न उदभवल्यास Vinsys IT Services या कंपनीशी संपर्क साधवा ही विनंती.


(पो.द. देशमुख)


उप सचिव, महाराष्ट्र शासन 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)