बदली अपडेट 2023 - लवकरच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू होणार! वाचूया शासन आदेश

Rajan garud
0

बदली अपडेट 2023 - लवकरच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू होणार! वाचूया  शासन आदेश


 

दि.१३/०९/२०२३ च्या शासनपत्रान्वये, सन-२०२२ मध्ये आंतरजिल्हा प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते. नात्र, रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती. अशा सन-२०२२ च्या बदलीप्रक्रीयेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे आंतरजिल्हा बदल्यांची कार्यवाही सुरु करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.



२. शालेय शिक्षण विभागाने संदर्भाधीन दि.२१/०६/२०२३ च्या शासन निर्णयान्वये, सन-२०२२ मधील विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निदेश आहेत. त्यानुषंगाने सन-२०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकानी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते मात्र रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती, फक्त अशाच सन-२०२२ च्या बदलीप्रक्रीयेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्याच्या अनुषंगाने बिंदुनामावली तयार करण्याची प्रक्रीया पुर्ण करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याबाबत दि.०९.१०.२०२३ रोजी झालेल्या Video Confrance मध्ये संचालक शालेय शिक्षण यांनी सर्व जिल्हा परिषदा यांना आदेशीत केले आहे. त्यानुसार सदर बिंदुनामावली पूर्ण करुन मंजूर करण्यात आलेली बिंदुनामावली बदली पोर्टल वर अपलोड करण्याची कार्यवाही सर्व जिल्हा परिषदा यांनी कोणत्याही परिस्थीतीत दि.२८/१०/२०२३ ते दि.२९/१०/२०२३ या कालावधीमध्ये पूर्ण करावी, अशा सुचना दि. २७.१०.२०२३ च्या पत्रान्वये सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. तरी त्या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषदांनी बिंदुनामावली विहीत मुदतीत अपलोड केल्याची खात्री करुन सन २०२२ ची जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही दि.०१.११.२०२३ पासुन सुरु करण्यात यावी ही विनंती.



आपला, (पो.द. देशमुख) उप सचिव, महाराष्ट्र शासन. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)