UDISE पोर्टल वर विद्यार्थी दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत कसे घ्यावे ? विद्यार्थी नॅशनल आयडी / कोड कसा शोधायचा ?

Rajan garud
0

UDISE  पोर्टल वर विद्यार्थी दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत कसे घ्यावे ? 
विद्यार्थी नॅशनल आयडी / कोड कसा शोधायचा ?



या अगोदर आपण विद्यार्थी यु-डायस पोर्टलवर प्रमोट कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप समजून घेतले आहे.


आता या अगोदर दुसऱ्या शाळेत असलेला विद्यार्थी आपल्या शाळेत आलेला असेल तर तो आपल्या लॉगिन वर कसा ट्रान्सफर करून घ्यायचा हे स्क्रीन शॉट च्या मदतीने स्टेप बाय स्टेप समजून घेऊया.


स्टुडन्ट पोर्टल वर लॉगिन केल्यानंतर आपण प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी प्रोग्रेशन मॉडेल मध्ये विद्यार्थी ंना प्रमोशन केले त्या बाजूलाच इम्पोर्ट मॉडेल अशी पुढील दिलेल्या स्क्रीन शॉट प्रमाणे आपल्याला दिसून येते त्या मधील गो बटनवर क्लिक करा.


आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होते त्यामध्ये सर्च स्टुडन्ट बाय नॅशनल कोड असे ऑप्शन येते परंतु जर आपल्याकडे नॅशनल कोड नसेल तर त्यावर गेट नॅशनल कोड अशी अक्षरे लिहून दिसतात त्यावर क्लिक करून आपण विद्यार्थ्यांचा नॅशनल कोड मिळू शकतो..

वरील विंडो मधील गेट नॅशनल कोड वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होते ज्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची जन्मतारीख जन्म वर्ष व आधार कार्ड वरील आधार नंबर टाकून सर्च करावे लागते अचूक माहिती भरल्यानंतर सर्च बटन खाली आपल्याला विद्यार्थ्यांचा नॅशनल कोड मिळतो.


वरील विंडोमध्ये विद्यार्थ्यांचे आधार नंबर व जन्म तारखेची वर्ष अचूक नोंदवल्यानंतर सर्च बटन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील विंडोत दिल्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा नॅशनल कोड मिळतो तो कॉपी करून घ्यावा..


वरील नॅशनल कोड कॉपी केल्यानंतर ती विंडो बंद करावी व आपल्याला या अगोदर ओपन असलेली विंडो ज्यामध्ये नॅशनल कोड व विद्यार्थ्यांची जन्मतारीख टाकण्याची सुविधा उपलब्ध असते त्यामध्ये कॉपी केलेला नॅशनल कोड पेस्ट करावा व विद्यार्थ्यांची जन्मतारीख अचूक नोंदवावी व जन्मतारखे समोरील गो बटन वर क्लिक करावे.


नॅशनल कोड व विद्यार्थ्यांची जन्मतारीख अचूक नोंदवल्यानंतर त्या समोरील बटन वर क्लिक केल्यावर पुढील प्रमाणे विंडो ओपन होते ज्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती दिसून येते. पुढील विंडोमध्ये दिल्याप्रमाणे विद्यार्थ्या ंना प्रमोट त्याची पर्सेंटेज व हजर दिवस आपल्याला दिसून येतात त्यानंतर आपल्याला वर्ग निवडावा लागतो व र्गाची तुकडी देखील निवडावी लागते विद्यार्थी आपल्या शाळेत दाखल झाल्याची दिनांक देखील नोंदवावी लागते व त्यानंतर सर्वात शेवटी दिलेल्या निळ्या रंगाच्या इम्पोर्ट बटन वर क्लिक करावे लागते.


वरील विंडो मधील इम्पोर्ट बटन वर क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स ओपन होतो ज्यामध्ये विद्यार्थ्यांची माहिती वाचून जर ती अचूक असेल तर कन्फर्म या निळा बटनवर क्लिक करावे लागते.

माहिती अचूक असल्यावर व कन्फर्म बटन वर क्लिक केल्यावर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होते ज्यामध्ये आपल्याला स्टुडन्ट सक्सेसफुली इम्पोर्टेड असा मेसेज दिसून येतो याचा अर्थ विद्यार्थी आपल्या शाळेत ट्रान्सफर झालेला आहे.

वरील प्रमाणे एक एक करून जी विद्यार्थी आपल्या शाळेत नवीन प्रवेशित आहे असे विद्यार्थी आपण आपल्या शाळेत यु-डायस स्टुडन्ट पोर्टलवर ट्रान्सफर करून घेऊ शकतो.

पहिल्या वर्गात नवीन विद्यार्थी घेण्यासाठी आपल्या शाळेत मागील वर्षात असलेले विद्यार्थी सर्व प्रमुख करून सर्व माहिती फायनल करावी लागते त्यानंतर आपल्याला पहिल्या वर्गाची विद्यार्थी नवीन यु-डायस पोर्टलवर घेता येतात.

धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)