Udise Plus 2023-24 Update - सन २०२३ २४ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीद्वारे माहिती संगणकीकृत करणेबाबत मार्गदर्शक सूचना
सन २०२३-२४ या वर्षामध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती दि. ३१ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत संगणकीकृत करून अंतिम करण्याकरिता केंद्र शासनाकडून कळविण्यात आले आहे. संदर्भिय पत्र क्र. २ नुसार राज्य शासनाकडून समग्र शिक्षा या योजनेच्या सन २०२४-२५ व २०२५-२६ वार्षिक नियोजन व अंदाजपत्रकांचा आराखडा तयार करून माहे डिसेंबर, २०२३ पर्यंत शासनास सादर करणेबाबत कळविले आहे. या पत्रानुसार आराखडा तयार करताना सन २०२३-२४ यु-डायस प्रणालीमधील माहितीवर आधारित तयार करण्यासाठी नमूद केले आहे.
यु-डायस प्रणालीमध्ये सन २०२२-२३ या वर्षामध्ये १,०८, ४५१ शाळांची, २,११,५०,०६६ विद्यार्थ्यांची व ७,४२,३१६ शिक्षकांची माहिती संगणकीकृत करून अंतिम करण्यात आली आहे. संगणकीकृत केलेल्या माहितीनुसार ९७.२७% विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झाली असून त्यापैकी ६९.५१% विद्यार्थ्यांचे आधार Validation शाळांकडून पूर्ण झाले आहे आणि ८८.९% शिक्षकांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे व त्यापैकी ६७.७% शाळांच्या लॉगिनमधून आधार Validation पूर्ण झाले आहे.
याबाबत आपणास कळविण्यात येते की, सन २०२३ २४ यु-डायस प्लस प्रणाली केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांचेकडून शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती नोंदविण्याकरिता प्रणाली सुरू केली आहे. त्याअनुषंगाने आपल्या स्तरावरून जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांची व विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अचूक भरण्याकरिता मुख्याध्यापकांना आदेशित करणे आवश्यक आहे.
यु-डायस प्लस प्रणालीमधील माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून Samagra Shiksha, STARS, PM-Shri या योजनेच्या वार्षिक नियोजन व अंदाजपत्रकामध्ये पुढील बाबींसाठी अनुदान मंजूर करण्यात येते मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता सोयी सुविधा, स्वच्छतागृह, रॅम्प, आयसीटी लॅब, वर्ग खोली, स्मार्ट क्लास रूम, English Language Lab याशिवाय २५% RTE प्रवेश, व्यवसायिक शिक्षण, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, नेताजी सुभाषचंद्र बोस अवासिय विद्यालय इ. उपक्रमांसाठी अनुदान प्राप्त होते.
यासाठी यु-डायस प्लस प्रणालीमार्फत संकलित करण्यात येणारी माहिती वस्तुनिष्ठ असणे आवश्यक आहे. त्याकरिता पुढील नियोजनाप्रमाणे कार्यवाही करावी.
जिल्हास्तर प्रशिक्षण जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये गटशिक्षणाधिकारी, डाटा ऑपरेटर, एमआयएस कॉ- ओडिनेटर, तालुक्यातील अभियंता, गटसमन्वयक यांची कार्यशाळा दि. १८ सप्टेंबर, २०२३ रोजी आयोजित करावी. कार्यशाळेमध्ये सन २०२३-२४ यु-डायस प्रपत्र व प्रणालीबाबत प्रशिक्षण दयावे.
• तालुकास्तर प्रशिक्षण तालुका स्तरावर एमआयएस कॉ-ऑडिनेटर यांनी तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख यांची कार्यशाळा दि. २० सप्टेंबर, २०२३ रोजी आयोजित करून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षण दयावे. यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आधार Validation चे काम पूर्ण करण्यासाठी सूचना दयाव्यात.
. केंद्रस्तर प्रशिक्षण केंद्र स्तरावर केंद्र प्रमुखांनी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक यांची कार्यशाळा दि. २२ सप्टेंबर, २०२३ रोजी आयोजित करून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात यावे. यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आधार Validation चे काम पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात याव्या आणि शाळेची वस्तुनिष्ठ माहिती अचूक भरण्यासाठी सूचना दयाव्यात
.
जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर व तालुक्यास्तरावरील MIS-Coordinator यांनी यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सर्व शाळांची माहिती अंतिम करण्यापूर्वी समग्र शिक्षा योजनेतून देण्यात येणारे लाभ उदा. मोफत पाठ्यपुस्तके, गणेश, दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणारे साहित्य, आयसीटी लॅब, स्मार्ट क्लासरूम, डिजिटल लायब्ररी, Tinkering Lab, रॉबोटिक्स लॅब, सैनिटरी फंड व पेंडिंग मशिन, मुलींना देण्यात येणाऱ्या आत्मरक्षा प्रशिक्षण, बांधकामाच्या बाबीं, शिक्षकांना उपलब्ध करून दिलेले टॅबलेट इ. बाबींची नोंदणी पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर माहिती अंतिम करावी जेणे करून जिल्हा व राज्याच्या शैक्षणिक निर्देशांकांमध्ये वाढ होण्यास मदत होईल.
दि. ३१ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत यु-डायस प्लस सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांमधील माहिती अचूक भरण्याच्या अनुषंगाने वरील प्रमाणे नियोजन करण्यात यावे आणि १००% विद्यार्थी व शिक्षकांचे आधार Validation पूर्ण करण्यात यावे. शैक्षणिक निर्देशांकाच्या (PGI) अनुषंगाने मुद्यांची माहिती अचूक मरून घेण्यात यावी, जेणेकरून राज्याच्या शैक्षणिक निर्देशांकामध्ये वाढ होईल. सोबत भारत सरकारकडील पत्र, सन २०२३-२४ चे यु-डायस प्रपत्र व सूचना.