घराघरात तिरंगा l हर घर तिरंगा संपूर्ण माहिती व प्रमाणपत्र लिंक
‘हर घर तिरंगा’ ही आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत एक मोहीम आहे ज्यामुळे लोकांना तिरंगा घरी आणण्यासाठी आणि भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्षाच्या निमित्ताने तो फडकावण्यासाठी प्रोत्साहित केले जाते आहे. ध्वजाशी आमचे नाते नेहमीच वैयक्तिक असण्यापेक्षा औपचारिक आणि संस्थात्मकच अधिक राहिले आहे. स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्षी राष्ट्र म्हणून एकत्रितपणे राष्ट्रध्वज घरी आणणे हे केवळ तिरंग्याशी वैयक्तिक संबंधाचेच नव्हे तर राष्ट्र उभारणीसाठीच्या आपल्या वचनबद्धतेचेही प्रतीक आहे. लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे ही या उपक्रमामागील संकल्पना आहे.
In continuation to last year’s resounding celebrations, you are encouraged to hoist the flag in your homes for a second edition of Har Ghar Tiranga from 13th to 15th August 2023.
Click here to upload your selfie with the Tiranga
Click here to upload your selfie with the Tiranga
भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs).
Q1. राष्ट्रध्वजाचा वापर, प्रदर्शन आणि तो फडकविण्यासाठी व्यापक निर्देशांद्वारे मार्गदर्शन केले जाते का?
होय- 'Flag Code of India 2002' आणि "The Prevention of Insults to National Honour Act, 1971".
Q2. Flag Code of India काय आहे?
'Flag Code of India' राष्ट्रध्वजाच्या प्रदर्शनासाठी सर्व कायदे, प्रघात, पद्धती आणि सूचना एकत्र आणते आणि खाजगी, सार्वजनिक आणि सरकारी संस्थांद्वारे राष्ट्रीय ध्वजाचे प्रदर्शन नियंत्रित करते. 26 जानेवारी 2002 रोजी 'Flag Code of India' लागू झाला.
Q3. राष्ट्रध्वज तयार करण्यासाठी कोणती सामग्री वापरली जाऊ शकते?
30 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार 'Flag Code of India 2002' मध्ये सुधारणा करण्यात आली आणि पॉलिस्टर किंवा मशीनपासून बनवलेल्या राष्ट्रीय ध्वजांना परवानगी देण्यात आली. आता, राष्ट्रध्वज हाताने बनवलेला आणि हाताने विणलेला किंवा मशीनने बनलेला, कापूस/पॉलिस्टर/लोकर/रेशीम/खादीचा असेल.
Q4. राष्ट्रध्वजाचा आकार आणि गुणोत्तर किती आहे?
'Flag Code of India' परिच्छेद 1.3 आणि 1.4 नुसार, राष्ट्रीय ध्वज आयताकृती असेल. ध्वज कोणत्याही आकाराचा असू शकतो परंतु राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि उंचीचे (रुंदी) गुणोत्तर 3:2 असावे.
Q5. मी माझ्या घरी राष्ट्रध्वज प्रदर्शित करू शकतो का?
'Flag Code of India' परिच्छेद २.२ नुसार, सार्वजनिक सदस्य, खाजगी संस्था किंवा शैक्षणिक संस्था राष्ट्रध्वजाच्या प्रतिष्ठा आणि सन्मानानुसार सर्व दिवस किंवा सर्व प्रसंगी राष्ट्रध्वज फडकावू शकतात/प्रदर्शन करू शकतात.
Q6. बाहेर/घरात राष्ट्रध्वज फडकवण्याची वेळ काय आहे?
'Flag Code of India, 2002' मध्ये 20 जुलै 2022 च्या आदेशानुसार सुधारणा करण्यात आली आणि 'Flag Code of India' भाग-II च्या परिच्छेद 2.2 चे खंड (xi) खालील कलमाने बदलण्यात आले:-
"जेथे ध्वज बाहेर किंवा समाजातील सदस्याच्या घरावर प्रदर्शित केला जातो, तो रात्रंदिवस फडकता ठेवला जाऊ शकतो;"
Q7. माझ्या घरी राष्ट्रध्वज प्रदर्शित करताना मी काय लक्षात ठेवले पाहिजे?
जेव्हा जेव्हा राष्ट्रध्वज प्रदर्शित केला जातो तेव्हा तो सन्मानाचे स्थान व्यापलेला असावा आणि तो स्पष्टपणे लावला गेला पाहिजे. खराब झालेला किंवा विस्कटलेला राष्ट्रध्वज प्रदर्शित करू नये.
Q8. राष्ट्रध्वजाचे चुकीचे प्रदर्शन टाळण्यासाठी मी काय लक्षात ठेवले पाहिजे?
राष्ट्रध्वज उलटा प्रदर्शित करू नये; म्हणजे; भगवी पट्टी तळाशी असता कामा नये.
खराब झालेला किंवा विस्कटलेला राष्ट्रध्वज प्रदर्शित केला जाऊ नये
राष्ट्रध्वज कोणत्याही व्यक्ती किंवा वस्तूसमोर झुकलेला असू नये
इतर कोणताही ध्वज किंवा कापड राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा वर किंवा शेजारी ठेवू नये; किंवा ज्या काठी किंवा खांबावरून राष्ट्रध्वज फडकवला जातो त्यावर फुले किंवा हार किंवा कोणतीही वस्तू ठेवता येणार नाही. याशिवाय त्यावर कुठले चिन्हदेखील मुद्रित झालेले असू नये.
राष्ट्रध्वजाचा वापर कोणत्याही प्रकारे सजावटीसाठी केला जाऊ नये.
राष्ट्रध्वजाचा स्पर्श जमिनीला होता कामा नये.
राष्ट्रध्वजाची हानी होईल अशा प्रकारे तो प्रदर्शित किंवा बांधला जाऊ नये
ज्या काठी किंवा खांबावरून राष्ट्रध्वज फडकविला जात आहे त्याच काठी किंवा खांबावरून इतर कोणताही ध्वज फडकवू नये.
राष्ट्रध्वजाचा वापर वक्त्याचे लेकटर्न झाकण्यासाठी केला जाणार नाही किंवा तो वक्त्याच्या व्यासपीठावर अंथरलेला असणार नाही.
राष्ट्रध्वाचा वापर पोशाखाचा किंवा गणवेशाचा भाग म्हणून करता येणार नाही. तसेच कमरेखाली नेसावयाच्या कपड्यांवरच्या काही विवरण असलेल्या पट्ट्यांचा भाग म्हणून वापर करता येणार नाही. त्याशिवाय उशांवर, लहान रुमालांवर, अंतर्वस्त्रांवर किंवा आपल्या कुठल्याही वस्त्रांवर राष्ट्रध्वज छापलेला असू नये किंवा त्याचे भरतकाम असू नये.
Q9. भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान रोखण्यासाठी काही नियम आहेत का?
होय. “द प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ऍक्ट, 1971” च्या कलम 2 च्या स्पष्टीकरण 4 नुसार, खालील गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत:
राष्ट्रीय ध्वजाचा वापर कशावरही अंथरण्यासाठी केला जाऊ नये. तसेच खाजगी अंत्यसंस्कारांमध्येही कोणत्याही स्वरूपात केला जाऊ नये.
राष्ट्रध्वजाचा वापर पोशाखाचा किंवा गणवेशाचा भाग म्हणून करता येणार नाही. तसेच कमरेखाली नेसावयाच्या कपड्यांवरच्या काही विवरण असलेल्या पट्ट्यांचा भाग म्हणून वापर करता येणार नाही. त्याशिवाय उशांवर, लहान रुमालांवर, अंतर्वस्त्रांवर किंवा आपल्या कुठल्याही वस्त्रांवर राष्ट्रध्वज छापलेला असू नये किंवा त्याचे भरतकाम असू नये.
राष्ट्रध्वजावर काहीही लिहिलेले असू नये.
आपण प्राप्त करीत असलेल्या किंवा वितरित करीत असलेल्या वस्तूंच्या वेष्टनासाठी राष्ट्रध्वजाचा वापर केला जाणार नाही.
राष्ट्रीय ध्वज कोणत्याही वाहनाच्या बाजू, पाठीमागे आणि वरच्या बाजूला झाकण्यासाठी वापरला जाणार नाही.
Q10. राष्ट्रध्वज मोकळ्या जागेत/सार्वजनिक इमारतींवर प्रदर्शित करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे?
जेव्हा राष्ट्रध्वज भिंतीवर सपाट आणि आडवा प्रदर्शित केला जातो तेव्हा भगवी पट्टी सर्वात वर असावी आणि जेव्हा उभा प्रदर्शित केला जातो तेव्हा भगवी पट्टी राष्ट्रध्वजाच्या संदर्भात उजवीकडे असावी म्हणजेच ती समोर उभ्या असणाऱ्या व्यक्तीच्या डावीकडे असावी.
राष्ट्रध्वज जेव्हा एखाद्या काठीच्या आधारे आडवा किंवा खिडकीच्या कोनातून, बाल्कनीतून किंवा इमारतीच्या समोर प्रदर्शित केला जातो, तेव्हा भगवी पट्टी त्या आधारकाठीच्या दूरच्या टोकाला असावी.
Q11. राष्ट्रध्वज फडकताना आधारकाठीच्या मधोमध बांधलेला असावा काय ?
भारत सरकारच्या निर्देशांशिवाय राष्ट्रध्वज आधारकाठीच्या मधोमध बांधून फडकवता येणार नाही. आधारकाठीच्या अर्ध्यावर फडकल्यावर, राष्ट्रध्वज प्रथम आधारकाठीच्या शिखरावर फडकवला जाईल, नंतर मध्यापर्यंत खाली केला जाईल. एखाद्या विशेष दिवसासाठी राष्ट्रध्वज खाली करण्यापूर्वी, तो पुन्हा आधारकाठीच्या शिखरावर चढवला पाहिजे.
Q12. मी माझ्या कारवर राष्ट्रध्वज प्रदर्शित करू शकतो का?
The Flag Code of India, 2002 च्या परिच्छेद 3.44 नुसार मोटर कारवर राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा विशेषाधिकार फक्त खालील व्यक्तींसाठी मर्यादित आहे :
राष्ट्रपती
उपराष्ट्रपती
राज्यपाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर
भारतीय मिशन/पोस्टचे प्रमुख
पंतप्रधान
कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि केंद्राचे उपमंत्री
राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री
लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपाध्यक्ष, लोकसभेचे उपसभापती, राज्यांमधील विधानपरिषदांचे अध्यक्ष, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विधानसभेचे सभापती, राज्यांमधील विधान परिषदेचे उपाध्यक्ष, विधानसभेचे उपसभापती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश
भारताचे सरन्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश
उच्च न्यायालयांचे न्यायाधीश
Q13. इतर राष्ट्रांच्या ध्वजांसह आपण भारतीय राष्ट्रध्वज कसा प्रदर्शित करू शकतो?
भारतीय ध्वज संहितेच्या परिच्छेद 3.32 नुसार, जेव्हा राष्ट्रीय ध्वज इतर देशांच्या ध्वजांसह एका सरळ रेषेत प्रदर्शित केला जातो, तेव्हा भारतीय राष्ट्रध्वज अगदी उजवीकडे असेल. इतर राष्ट्रांचे ध्वज राष्ट्रांच्या नावांच्या इंग्रजी वर्णमालेच्या क्रमाने येतील.
हे ध्वज वर्तुळाकारात फडकवल्यास, भारतीय राष्ट्रध्वज प्रथम फडकवला जाईल आणि त्यानंतर घडाळ्यातील आकड्यांच्या क्रमानुसार इतर राष्ट्रांचे ध्वज फडकवले जातील.
भारतीय राष्ट्रध्वज अन्य कुठल्या ध्वजाबरोबर फुलीच्या आकारात भिंतीवर लावायचा असेल तर भारतीय राष्ट्रध्वज उजव्या बाजूला असायला हवा आणि त्याची आधारकाठी ही दुसऱ्या ध्वजाच्या आधारकाठीच्या वर असायला हवी.
जेव्हा राष्ट्रध्वज इतर राष्ट्रांच्या ध्वजांसह फडकावला जाईल तेव्हा ध्वजांच्या आधारकाठ्या ह्या समान आकाराच्या असाव्यात.
Q14. फाटलेल्या किंवा खराब झालेल्या राष्ट्रध्वजाचे काय करावे ?
भारतीय ध्वज संहितेच्या परिच्छेद २.२ नुसार, राष्ट्रध्वजाची हानी झाल्यास, राष्ट्रीय ध्वजाच्या प्रतिष्ठेचा विचार करून, तो शक्यतो जाळून किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे, एकांतात संपूर्णपणे नष्ट केला जावा.
कागदापासून तयार केलेला राष्ट्रध्वज सर्वसामान्य जनतेने फडकवला तर हे ध्वज जमिनीवर टाकून देऊ नयेत. राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा लक्षात घेऊन हे खाजगीत नाहीसे करावेत.
फ्लॅग कोड ऑफ इंडिया, 2002 ची ठळक वैशिष्ट्ये
भारतीय राष्ट्रध्वज भारतातील लोकांच्या आशा आणि आकांक्षा दर्शवतो. हे आपल्या राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे आणि राष्ट्रध्वजाबद्दल सर्वत्र आपुलकी, आदर आणि निष्ठा आहे. भारतीय लोकांच्या भावना आणि मानसिकतेमध्ये आपल्या राष्ट्रध्वजाने एक अद्वितीय आणि विशेष स्थान व्यापलेले आहे.
भारतीय राष्ट्रध्वज फडकवणे/वापरणे/प्रदर्शित करणे हे prevention of insults to national honour act, 1971 आणि भारतीय ध्वज संहिता, 2002 द्वारे शासित आहे. भारतीय ध्वज संहिता, 2002 ची काही ठळक वैशिष्ट्ये जनतेच्या माहितीस्तव खाली सूचीबद्ध आहेत :-
30 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार भारतीय ध्वज संहिता, 2002, मध्ये सुधारणा करण्यात आली आणि पॉलिस्टर किंवा मशीनपासून बनवलेल्या राष्ट्रध्वजाला परवानगी देण्यात आली. आता, राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा यंत्राने बनवलेल्या, कापूस/पॉलिस्टर/ लोकर/रेशीम खादी कापडाचा असेल.
सार्वजनिक, खाजगी संस्था किंवा शैक्षणिक संस्थेचा सदस्य सर्व दिवस आणि प्रसंगी, औपचारिक किंवा अन्यथा, राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि प्रतिष्ठा ध्यानी ठेवून राष्ट्रध्वज फडकावू शकतो/ प्रदर्शन करू शकतो.
19 जुलै 2022 च्या आदेशानुसार भारतीय ध्वज संहिता, 2002, मध्ये सुधारणा करण्यात आली आणि भारतीय ध्वज संहितेच्या भाग-II च्या परिच्छेद 2.2 चे खंड (xi) खालील कलमाने बदलण्यात आले:-
(xi) "जेथे ध्वज मोकळ्या जागेत प्रदर्शित केला जातो किंवा सार्वजनिक सदस्याच्या घरावर प्रदर्शित केला जातो, तो रात्रंदिवस फडकता ठेवता येईल;"
राष्ट्रध्वज आयताकृती असावा. ध्वज कोणत्याही आकाराचा असू शकतो परंतु ध्वजाची लांबी आणि उंची (रुंदी) यांचे गुणोत्तर 3:2 असावे.
जेव्हा जेव्हा राष्ट्रध्वज प्रदर्शित केला जातो तेव्हा तो सन्मानाचे स्थान व्यापलेला असावा आणि तो स्पष्टपणे लावला गेला पाहिजे.
खराब झालेला किंवा विस्कटलेला राष्ट्रध्वज प्रदर्शित केला जाऊ नये.
राष्ट्रध्वज एकाच आधारकाठीवर इतर कोणत्याही ध्वज किंवा ध्वजांसह एकाच वेळी फडकवू नये.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल इत्यादी ध्वज संहितेच्या भाग III च्या कलम IX मध्ये नमूद केलेल्या मान्यवरांशिवाय कोणाच्याही वाहनावर ध्वज फडकवू नये.
इतर कोणताही ध्वज किंवा कापड राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा वर किंवा बाजूला ठेवू नये.