संच मान्यता 2022-23 नुसार shalarth postmapping करणे बाबत शिक्षण संचालकांचे निर्देश

Rajan garud
0

 संच मान्यता 2022-23 नुसार shalarth  postmapping करणे बाबत शिक्षण संचालकांचे निर्देश


आता संच मान्यता 2022-23 मध्ये जेवढी पदे शाळेवर मंजूर आहेत तेवढ्याच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार निघणार! 

शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित केल्या परिपत्रकानुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद सर्व प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद सर्व अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी प्राथमिक व माध्यमिक सर्व यांना संच मान्यतेप्रमाणे शालार्थ प्रणाली मध्ये पोस्टमॅपिंग तात्काळ पूर्ण करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

संचमान्यतेच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या शेवटच्या वर्षाच्या संचमान्यतेप्रमाणे मंजूर असलेल्या पदानुसार शालार्थ प्रणालीतील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे Post Mapping करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली होती. सदर सुविधेनुसार Post Mapping ची कार्यवाही शालार्थ मध्ये तातडीने पूर्ण करणेबाबत आपणास संदर्भिय पत्रान्वये कळविण्यात आले होते. परंतु अद्यापही शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यतेनुसार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे Post Mapping पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब प्रशासकीयदृष्टया योग्य नाही.
तरी संदर्भिय पत्रान्वये दिलेल्या सूचनेनुसार आपल्या जिल्हयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे संचमान्यतेप्रमाणे मंजूर असलेल्या पदानुसार शालार्थ प्रणालीमध्ये Post Mapping तात्काळ पूर्ण करण्यात यावे. याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व यांनी आपलेस्तरावरून संबंधित कार्यालयास सूचित करावे.



शालार्थ प्रणालीमध्ये Post Mapping पुर्ण केल्याशिवाय सप्टेंबर २०२३ चे वेतन देयक (बिल) शालार्थ प्रणालीमध्ये जनरेट होणार नाही याची सर्व संबंधित कार्यालयांनी नोंद घ्यावी.

मा. शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक) यांचे मान्यतेने



(देविदास कुलाळ)


शिक्षण उपसंचालक (प्राथमिक, शिक्षण संचालनालय) महाराष्ट्र राज्य, पुणे- ०१


(दिपक चवणे)


शिक्षण उपसंचालक


(अंदाज व नियोजन) (माध्यमिक व उच्च माध्यमिक)



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)