आता शाळेची खाते HDFC बँकेत उघडावे लागणार - राज्य प्रकल्प संचालक MPSP.

Rajan garud
0

 आता  शाळेची खाते  HDFC  बँकेत उघडावे लागणार

  राज्य प्रकल्प संचालक MPSP.



महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई चे राज्य प्रकल्प संचालक यांच्या दिनांक 27 जुलै 2023 रोजी च्या परिपत्रकानुसार शाळा स्तरावर पी एफ एम एस प्रणाली करिता समग्र शिक्षा चे एचडीएफसी बँकेचे खाते कार्यान्वित करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

सद्यस्थितीत राज्यस्तरावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयाचे समग्र शिक्षा करिता एचडीएफसी बँकेचे खाते कार्यान्वित आहे व त्या अनुषंगाने इम्प्लिमेंटिंग एजन्सी जिल्हा परिषद महानगरपालिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व तालुका स्तरापर्यंत एचडीएफसी बँकेचे झिरो बॅलन्स अकाउंट खाते कार्यान्वित आहे आता संपूर्ण शाळा घरापर्यंत पीएसएमएस प्रणालीद्वारे निधीचे वितरण करणे विचारातून असल्याने शाळा स्तरापर्यंत खाते उघडण्याची कार्यवाही संबंधित जिल्हा परिषद महानगरपालिका तालुका शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी यांनी कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.

शाळा निहाय प्राप्त झालेल्या चेकर मेकर तपशीलानुसार प्राधिकृत वापर करता यांची शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी किंवा प्रशासनाधिकारी यांनी खतर जमा करून केवायसी आधारे उपरोक्त खाते कार्यान्वित करणे आवश्यक आहे याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी यांची व्यक्तिशः राहील तसेच केलेली केवायसी ही जिल्हा परिषद महानगरपालिका शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी गटशिक्षणाधिकारी यांनी शाळा निहाय दिलेली यादी योग्य असल्याची खातर जमा एचडीएफसी बँक यांचे संबंधित प्रतिनिधी यांनी देखील खातर जमा करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर केवायसी केल्यानंतर खाते पी एफ एम एस प्रणालीशी कार्यान्वित करून निधी वितरणाची कार्यवाही जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर तालुका स्तरावरून शाळा स्तरावर करणे आवश्यक राहील.

यानुसार शाळा स्तरापर्यंत खाते उघडण्याची कार्यवाही करण्याकरिता एचडीएफसी बँक यांनी आपल्या स्तरावरून आपल्याशी संबंधित अधिकारी कर्मचारी यांना सूचना द्याव्यात शाळा स्तरापर्यंत खाते उघडण्याची व कार्यान्वित करण्याची कार्यवाही करण्याकरिता शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी गटशिक्षणाधिकारी यांनी एचडीएफसी बँक यांचे प्रतिनिधी यांचेश समन्वय साधून योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी असे निर्देश माननीय कैलास पगारे राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)