सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करणेबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांचे परिपत्रक जाहीर

Rajan garud
0

 सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात  शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करणेबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांचे  परिपत्रक जाहीर 



दिनांक 1 मार्च 2023 पासून आरटीई 25% प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार सन 2023 24 या शैक्षणिक क्षेत्रात आरटीई पंचवीस टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


पुढील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे बालकाचे प्रवेशासाठी वय निश्चित करण्यात आलेले आहे.


शासन निर्णयानुसार सन 2023 24 या शैक्षणिक क्षेत्रात आर टी 25% शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे.

शाळा प्रवेशासाठी बालकाची किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी च्या शासन निर्णयान्वये मानवी व दिनांक हा 31 डिसेंबर करण्यात आला आहे शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतु कमाल वयोमर्यादा नाही. मानवी दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन 2023 24 साठी आर टी इ 25% प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक 31 डिसेंबर 2023 अखेर पुढील प्रमाणे राहील.

सन सन 2023 24 या शैक्षणिक क्षेत्रात आर टी 25% प्रवेशासाठी बालकाचे वय. 

प्ले ग्रुप किंवा नर्सरी मध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकाचा जन्म एक जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या दरम्यान जन्मलेले बालके पात्र असतील म्हणजेच कमीत कमी तीन वर्ष व जास्तीत जास्त चार वर्ष पाच महिने 30 दिवस एवढ्या वयाचा बालक प्ले ग्रुप किंवा नर्सरी मध्ये ऍडमिशन घेण्यास पात्र असेल.

जुनिअर केजी वर्गात प्रवेशासाठी जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 या दरम्यान ज्या बालकांचा जन्म झाला आहे अशी किमान चार वर्ष व कमाल चार वर्ष पाच महिने तीन दिवस एवढ्या वयाची बालके प्रवेश घेण्यास पात्र आहेत.

सिनियर केजी मध्ये प्रवेश घेण्यासाठी एक जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये जन्म घेतलेली बालके ज्यांचे किमान वय पाच वर्ष व कमाल वय सहा वर्ष पाच महिने 30 दिवस एवढे असेल अशी बालके सिनियर केजी मध्ये प्रवेश घेण्यास पात्र असतील.

इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेण्यासाठी ज्या बालकांचा जन्म एक जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधी दरम्यान झालेला आहे व ज्यांचे वय कमीत कमी सहा वर्ष व जास्तीत जास्त सात वर्ष पाच महिने 30 दिवस एवढे आहे अशी बालके इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्यास पात्र असतील.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)