RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता मुदतवाढ !!! मा. शिक्षण संचालकांचे आदेश

Rajan garud
0

RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता मुदतवाढ !!!

मा. शिक्षण संचालकांचे आदेश


 

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशाकरीता अंतिम मुदतवाढ देणेबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया संपुर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२३ २४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडत (लॉटरी) बुधवार दिनांक ०५/०४/२०२३ रोजी काढण्यात आली असून निवड यादीतील बालकांचे प्रवेश मुदत दिनांक १३ / ०४ / २०२३ ते ०८/०५/२०२३ पर्यंत आहे.

सन २०२३ - २४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील बालकांच्या कागदपत्रांची तपासणी करुन प्रवेश निश्चित करण्यासाठी व बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी दिनांक १५/०५/२०२३ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे.

तरी आपल्यास्तरावर प्रलंबित असलेल्या प्रवेशाबाबतच्या तक्रारी व अपील अर्जाबाबत सुनावणी घेवून दिनांक १५/०५/२०२३ पूर्वी निकाली काढण्यात यावीत.

तद्नंतर सन २०२३ २४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. तरी याबाबत आपल्यास्तरावरुन मोफत प्रसिध्दी देण्यात यावी.

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, पुणे १.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)