जूनपर्यंत नवीन शिक्षक शाळांत येणार; ३३ हजार जागांसाठी तब्बल पाच लाख अर्ज

Rajan garud
0

 जूनपर्यंत नवीन शिक्षक शाळांत येणार; 
३३ हजार जागांसाठी तब्बल पाच लाख अर्ज 




 आनंदाची बाब म्हणजे एका बकुळ नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असताना रिक्त असलेल्या राज्यातील ३३ हजार शिक्षकांच्या जागा जूनपर्यंत भरल्या जातील, असे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे; तर नव्या शैक्षणिक धोरणात प्राथमिक शाळांच्या सक्षमीकरणाची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.


महाराष्ट्रात बऱ्याच शाळांचे शिक्षक व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड ऑनलाईन लिंक न झाल्यामुळे ६०० शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले होते. मात्र आधार कार्ड लिंक न होण्याचे कारण शिक्षण विभागाची वेबसाईट कार्यरत नसल्याचे सांगितले जात आहे. आजही काही शाळांच्या आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड लिंक झालेले नाही. त्यामुळे शिक्षक भरतीसमोर प्रश्नचिन्ह उभे आहे. तथापि भरती प्रक्रिया गतिमान केल्यामुळे जूनच्या नवीन शैक्षणिक वर्षात नवे शिक्षक मिळतील असे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे. शिक्षकांची सर्वाधिक पदे ही ग्रामीण भागात रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जवळपास ३ हजार शाळा एकशिक्षकी आहेत. २० पटसंख्येच्या राज्यात दोन हजार शाळा असून, या शाळा बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला होता. मात्र आता शिक्षण विभागाने यावर क्लस्टरची मात्रा शोधली आहे. पुण्यातील पानशेत धरण भागातील २० पटसंख्येच्या १६ शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा तयार केली आहे. त्यामुळे ३२० विद्यार्थ्यांची एक शाळा सुरू होत आहे. राज्यात २० पटसंख्येच्या २ हजार शाळांमध्ये क्लस्टरचा नवा प्रयोग राबविला जाणार आहे. पुण्यातील ३२० विद्यार्थ्यांसाठी १६ शाळांमधील शिक्षक उपलब्ध असून, पहिली ते आठवीपर्यंत हे शिक्षक कार्यरत राहणार आहेत.


पीएम श्री योजनेतून भौतिक विकास

राज्यात शाळांच्या सक्षमीकरणासाठी मॉडर्न स्कूलची संकल्पनाही पुढे आली आहे. यामध्ये पीएमश्री योजनेंतर्गत निवड झालेल्या शाळांना प्रत्येक शाळेला जवळपास ७० लाखांचा निधी देऊन शाळांचा भौतिक विकास केला जाणार आहे. डिजिटल वर्गखोल्या, डिजिटल ग्रंथालये यासह भौतिक सुधारण शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी विविध उपायोजना केल्या जातील. राज्यातील ५१६ शाळांची यासाठी निवड करण्यात आली आहे. हा प्रयोग एका बाजूला होत असताना क्लस्टरच्या माध्यमातून शाळांचे समायोजन होणार आहे.


 केंद्रप्रमुख पदभरती, स्पर्धा परीक्षा 2022   50 टक्के  पदोन्नती व 50 टक्के  विभागीय केंद्रप्रमुख भरती 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)