आता संच मान्यता पोर्टलवर 2023- 24 ची संच मान्यता उपलब्ध झाली आहे. माहिती वाचा.
सन 2022-23 ची अंतिम फायनलाईज संच मान्यता स्टेटस मुख्याध्यापक लॉगीनवर उपलब्ध झालेली आहे.
सरल वेबसाईट मध्ये संच मान्यता मध्ये जाऊन मुख्याध्यापक लॉगिन करून आपण आपल्या शाळेमध्ये कोणकोणत्या संवर्गाची किती पदे 2022-23 च्या संच मान्यतेनुसार मंजूर आहेत हे पाहू शकता.
त्यासाठी पुढील अधिकृत लिंक open करा.
वेबसाईट
https://education.maharashtra.gov.in/sanch/users/login/7
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला मेन स्क्रीन ओपन होईल मेन स्क्रीन मध्ये आपल्या शाळेचा यु डायस नंबर म्हणजेच युजर आयडी व आपण सेट केलेला पासवर्ड व कॅपच्या कोड टाकून आपण लॉगिन केल्यानंतर आपल्याला दुसरी विंडो ओपन होईल.
त्या विंडो मधील सूचना काळजीपूर्वक वाचून त्याच्या खाली दिलेल्या OK बटन वर क्लिक करा म्हणजे ती सूचना स्क्रीन वरून निघून जाईल.
व आपल्याला दुसरी विंडो ओपन होईल सदर विंडोज च्या डाव्या बाजूला संक्शन पोस्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेमध्ये मंजूर पदाचा तपशील दिसेल सदर तपशील आपण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड देखील करू शकता.
दिलेल्या विंडोमध्ये संक्शन पोस्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेमध्ये मंजूर असलेल्या पदांचा तपशील मिळेल.
अशा प्रमाणे आपण आपल्या शाळेची फायनलाईज झालेली सन सन 2022 23 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता पाहू शकता व पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून त्याची प्रिंट करून आपल्याजवळ ठेवू शकता.
मागील वर्षीची म्हणजेच 2021-22 ची संचमान्यता देखील आपण याच पद्धतीने पोर्टलवर पाहू शकता.