केंद्रप्रमुख पदभरती, स्पर्धा परीक्षा 2022 50 टक्के पदोन्नती व 50 टक्के विभागीय केंद्रप्रमुख भरती

Rajan garud
0

 केंद्रप्रमुख पदभरती, स्पर्धा परीक्षा 2022   

50 टक्के  पदोन्नती व 50 टक्के  विभागीय केंद्रप्रमुख भरती  संदर्भात दि १ डिसेंबर २०२२ रोजी आलेलेल्या शासन निर्णयानुसार......




   

१.केंद्रप्रमुख पद भरती संदर्भात यापूर्वी पारित करण्यात आलेल्या शासन निर्णय दिनांक 16-2-2018 अधिक्रमित करण्यात येत आहे व याबाबतीत तदअनुषंगिक शासन निर्णय /शासन शुद्धिपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहेत.


 २. केंद्रप्रमुखांची सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे तसेच सेवानिवृत्ती ,राजीनामा, बडतर्फी इत्यादी कारणांनी यापुढे रिक्त होणाऱ्या पदावर ती पदे जसजशी रिक्त होतील तसतशी 50 टक्के पदे पदोन्नतीने व 50 टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्याच्या मर्यादित भरण्यास मान्यता देण्यात येत आहे.


 ३. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्ह्यातील उर्दू शाळांची संख्या विचारात घेऊन केंद्रप्रमुखांची पदे निश्चित करावीत.


 ४. केंद्रप्रमुखांची रिक्त पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा तसेच  पदोन्नतीने भरण्याबाबत खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.


 4.1 विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा


      विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात येईल.


    4.2 परीक्षेचे आयोजन व स्वरूप 


        विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षाद्वारे केंद्र प्रमुखाच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित करेल. अशा परीक्षा यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येईल. सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येतील.


 या चाचणी परीक्षेचे आयोजन व स्वरूप खालील प्रमाणे राहील.


 १. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येईल, अर्थात विषयनिहाय  चाचणी घेतली जाणार नाही. सदर परीक्षा आवश्यकतेनुसार ऑनलाइन / ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल. सदर परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल.


  २. ऑनलाईन परीक्षा घेताना समान काटिन्य पातळीच्या किमान दहा प्रश्नपत्रिका संच सदर परीक्षा यंत्रणा तयार ठेवेल. परीक्षार्थींना समान काठीण्य  पातळीच्या विविध प्रश्नपत्रिका देण्यात येतील.


 ३. उपलब्ध रिक्त पदे विचारात घेऊन सदर परीक्षा घेण्यात येईल.


 ४.परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येईल.


 4.3 परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम


         परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण दोनशे गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील परीक्षेसाठी पुढील प्रमाणे घटक व गुणांकन राहील.

( वरील  परिपत्रक downlod  करा. )

5.1 शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता :


      विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी ज्यांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीए/ बी कॉम/ बीएससी ही पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षे पेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण केलेली असणे आवश्यक्य आहे.


 5.2 विभागीय मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांक पर्यंत कमाल वयोमर्यादा 50 वर्ष राहील.


 5.3 विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल त्याच जिल्ह्यासाठी पात्र राहील.


शासन शुद्धिपत्रक दि ९ मार्च २०२३ नुसार अहर्ता बाबत  बदल खालील  पहा .


 ६. पदोन्नतीने नियुक्तीसाठी 

         ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षे पेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवकालावधी वगळून) पूर्ण केली असेल अशा उमेदवारांमधून सेवा जेष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल.


 ७. कागदपत्रांची पडताळणी 

         केंद्रप्रमुख पदी विभागीयस मर्यादित परीक्षेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्राची पडताळणी संकेतस्थळावर उमेदवारांची सूची जाहीर झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या मुदतीत खालील समितीमार्फत करण्यात येईल.

संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे समिती राहील.


 १.संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  -  अध्यक्ष 


२. समाज कल्याण अधिकारी  -  सदस्य 


३. शिक्षणाधिकारी माध्यमिक   - सदस्य 


४. शिक्षणाधिकारी प्राथमिक  -  सदस्य सचिव 

       कागदपत्रांच्या पडताळणीस उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या उपस्थितीची  नोंद ठेवणे आवश्यक्य राहील. उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासणीची नोंद घेऊन उमेदवारांकडून प्रमाणपत्राच्या प्रतीचा एक संच घ्यावा व त्यावर कागदपत्राच्या पडताळणीचा दिनांक व नोंद क्रमांक नोंदविण्यात यावा. मूळ प्रमाणपत्रे उमेदवारास तात्काळ परत करण्यात यावीत.

८. कागदपत्र पडताळणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

 9. शासन निर्णय दिनांक 2-2-2010 ते दिनांक 10-6-2014 या कालावधीत अभावितपणे नियुक्त केंद्रप्रमुखांच्या सेवा दिनांक 16 फेब्रुवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये नियमित करण्यात आले आहेत. सदर आदेश कायम राहील.

 १०. तक्रारीचे निवारण  

उमेदवारांच्या तक्रारीची निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील. उमेदवारांनी याबाबत लेखी तक्रार संबंधित प्राधिकार्‍यांकडे करावी. प्राप्त झालेल्या तक्रारीची निवारण संबंधित प्राधिकार्‍यांनी पंधरा दिवसात करणे आवश्यक्य राहील. याबाबत शिक्षण संचालक प्राथमिक ही अपीलिय प्राधिकारी राहतील.


 11. केंद्रप्रमुखांची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदे भरण्याची संपूर्ण प्रक्रिया शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येईल. यासंदर्भात संचनालय स्तरावरून वेळोवेळी सविस्तर सूचना निर्गमित करण्यात येतील.

      उपरोक्त  प्रमाणे केंद्रप्रमुखांच्या मंजूर पदाच्या 50% पदे पदोन्नतीने व 50 टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे या प्रमाणात राहतील. सद्यस्थितीत पदोन्नतीच्या कोट्यातील पदे 50 टक्के पेक्षा अधिक असल्यास सदर पदे जसजशी रिक्त होतील तस तशी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.

 12.केंद्रप्रमुख ही पदे जिल्हा परिषदेच्या आस्थापने मधील असल्याने त्यांच्या सेवा प्रवेशा संदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा प्रदेश नियम 1967 मध्ये आवश्यक्य सुधारणा करण्यासाठी ग्रामविकास विभागाने कार्यवाही करावी.

 13. ज्या जिल्ह्यांनी केंद्रप्रमुखांची पदे भरण्याची प्रक्रिया प्रस्तावित शासन निर्णय याच्या दिनांक पर्यंत पूर्ण केली असल्यास ती वैध असेल.

 14. सदर शासन निर्णय ग्रामविकास विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 48 स्थापना 14 दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी च्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)