परिभाषित निवृत्ती वेतन , राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली अंतर्गत सेवा कालावधीत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतन बाबत शासन आदेश दिनांक -३१/३/२०२३..
फॅमिली पेंशन-ग्रॅच्युटी चा शासन निर्णय अखेर निर्गमित...💥
(GR- 31 मार्च 2023 )
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे तीन महिन्यांपूर्वी मान्य झालेला मात्र काही कारणास्तव प्रलंबित असलेला फॅमिली पेंशन ग्रॅच्युटी शासन निर्णय अखेर निर्गमित झाला..🤝💥
सन 2015 पासून आपल्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे आणि गेल्या गेल्या 27 डिसेंबर 2022 रोजी च्या नागपूर अधिवेशनातील दीड लाख कर्मचाऱ्यांच्या 'पेंशन संकल्प यात्रा' मोर्चात मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलेल्या केंद्रा प्रमाणे फॅमिली पेंशन - ग्रॅच्युटी इत्यादी लाभ देण्याचा हा शासन निर्णय आज जारी झालाय..
या GR मुळे काय मिळाले-
1) सेवेत असतांना मृत्यू आल्यास जुनी पेंशन चे लाभ-
फॅमिली पेंशन(जुनी पेंशन) आणि सोबत डेथ ग्रॅच्युटी (मृत्यू उपदान) लाभ..
2) सेवेत असतांना जख्म/इजा/आजारपण इत्यादिमुळे सेवा समाप्त झाल्यास रुग्णता निवृत्तीवेतन (जुनी पेंशन) आणि सेवानिवृत्ती ग्रॅच्युटी(सेवा उपदान) लाभ..
3) सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर पूर्वीप्रमाणे रिटायरमेंट ग्रॅच्युटी (सेवा उपदान..)
येथे उपदान म्हणजे शासनाकडून कर्मचाऱ्यांना मिळालेली बक्षीस रक्कम आहे, ही उपदान रक्कम कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीवर अवलंबून आहे..
उदा- 1 वर्ष च्या आत सेवा - असल्यास मिळणारे उपदान-
अंतिम वेतनाच्या दुप्पट रक्कम..
1 वर्ष ते 5 वर्ष सेवा- मिळणारे उपदान- अंतीम वेतनाच्या 6 पट रक्कम,
5 वर्ष ते 11 वर्ष सेवा- उपदान= अंतिम वेतनाच्या 12 पट
11 वर्ष ते 20 वर्ष दरम्यान सेवा, उपदान = अंतिम वेतनाच्या 20 पट...
20 वर्ष पेक्षा जास्त सेवा, उपदान = अंतिम वेतनाच्या 33 पट ₹
(कमाल मर्यादा 14 लाख..₹)
तरी मयत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत खालील अटी ना अधीन राहून वरील लाभ मिळतील..
👉🏻ज्यांना 10 लाख रु सामुग्रह अनुदान मिळाले आहे, त्यांना ती रक्कम परत करावी लागणार आहे...
👉🏻 NPS/DCPS मधील जमा रकमे पैकी शासन अंशदानाची रक्कम व शासन अंशदान रकमेवरील वाढीव व्याज / परतावा शासनास परत करावा लागणार आहे...
वरील रकमा समायोजित केल्या जातील..
तथापि कर्मचाऱ्यांचा 10% कर्मचारी हिस्सा व कर्मचारी हिश्यावरील व्याज ही रक्कम कर्मचारी कुटूंबा कडेच राहील...
मित्रांनो ही सुरुवात असली तरी शेवट नाही, मात्र एकच की आज तुमच्या आपल्या सर्वांच्या साथीमुळे, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या संघर्षामुळे
राज्याध्यक्ष श्री वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील माझ्या 1659 मयत कर्मचारी/अधिकारी बांधवांना, त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळाला आहे...
सोबतच शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी च्या माध्यमातून थोडा का होईना पण एक दिलासा मिळाला आहे..
आपली साथ अशीच असू द्या, येणाऱ्या काळात सरसकट जुनी पेंशन मिळाल्याशिवाय आपण थांबणार नाहीत..
ये तो आगाज हैं, अंजाम अभी बाकी बाकी हैं।
(टीप- सदर शासन निर्णया नंतर देखील अद्यापही केंद्रा प्रमाणे इतर बरेच लाभ देण्याचे बाकी राहिले आहेत, त्यासाठीही पाठपुरावा करण्यात येईल, कारण मुख्यमंत्री महोदयांनी 27 डिसेंबर 2022 रोजी केंद्रा प्रमाणे पेंशन लाभ देऊ असे आश्वासन दिले होते...)
एकच मिशन जुनी पेंशन...✊🏻
🙏🏻
आपलाच
विनायक चौथे
राज्य सोशल मीडिया प्रमुख
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना..