संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांना 21 एप्रिल पासून सुट्टी.शिक्षण संचालक यांचे आदेश.
महाराष्ट्र राज्याची प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांची सन 2023 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन 2023 24 सुरू करणे बाबत परिपत्रक निर्गमित करून पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२३ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्षा करिता २०२३-२४ मध्ये शाळा सुरु करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.
१. मंगळवार दि. ०२ मे २०२३ पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी बुधवार दि. १४ जून २०२३ पर्यंत ग्राहय धरण्यात येवून पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये गुरुवार दि. १५ जून २०२३ रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील शाळा शुक्रवार दि. ३० जून २०२३ रोजी सुरू होतील.
२. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचा निकाल दि. २९ एप्रिल २०२३ रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत जाहिर करवा, तथापि तो निकाल विद्यार्थी/ पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधीत शाळेची राहील.
३. शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांच्या परवानगीने घ्यावी.
४. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील परिशिष्टामध्ये शालेय कामकाजाचे किमान दिवस
अ) इ. १ ली ते ५ वी साठी किमान २०० कार्यदिन / प्रत्येक शैक्षणिक वर्षात
अध्यापनाचे किमान ८०० घडयाळी तास प्रत्यक्ष
ब) इ. ६ वी ली ते ८ वी साठी किमान २२० कार्यदिन / प्रत्येक शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष अध्यापनाचे किमान १००० घडयाळी तास निश्चित केले आहेत. त्यानुसार कामाचे दिवस होणे आवश्यक आहे.
५. माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्टया ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.
उपरोक्त सूचनानुसार सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतचे निर्देश आपल्या स्तरावरुन तात्काळ निर्गमित करावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.
शरद गोसावी, शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे ०१. यांनी वरील प्रमाणे सूचना सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांना दिल्या आहेत.