शाळापूर्व तयारी अभियान ,मेळावा, सर्व टप्पे व संपूर्ण माहिती
शासनाकडून मार्च - मे, 2022 मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा' आयोजित करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या.त्यापूर्वी कोरोनाचा काळ होता. शाळा बंद असल्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही झालेला होता. मुलांना अंगणवाडी किंवा बालवाडीचा अनुभवच घेता आलेला नव्हता. या मुलांची व्यवस्थितपणे शाळापूर्व तयारी. होणे फार आवश्यक होते, ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना वाचन-लेखन शिकताना कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि ते व्यवस्थितपणे शिकू शकतील.
गेल्यावर्षी सर्व शाळांमध्ये यशस्वीरीत्या शाळापूर्व तयारी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले, ज्याचा मुलांना खूप फायदा झाला. त्यामुळेच शासनाने सन 2022 -23 मध्येही 'शाळापूर्व तयारी मेळावा' आयोजीत करावा अशा सूचना दिल्या आहेत.
या अभियानात गाव पातळीवर मुलांचे पालक, ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा आणि स्वयंसेवक (volunteers) यांची मुख्य भूमिका असते. आपण समजून घेऊ, की या अभियानाचे स्वरूप काय आहे आणि आपल्याला नेमके काय करायचे आहे.
स्टेप 1
इयत्ता पहिलीत दाखल होणारी मुले व त्यांच्या पालकांची नोंद करणे. इयत्ता पहिलीत दाखल होणान्या मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना मेळाव्याबाबत माहिती दयायची आहे. तसेच पालकांचे गट बनवायचे आहेत.
आपल्याला काय करायचे आहे ?
इयत्ता पहिलीत दाखल होणारी मुले व त्यांच्या पालकांशी संपर्क साधायचा. अशा ४-५ पालकांचे मिळून बनविलेल्या या गटांच्या संपर्कात आपल्याला शेवटपर्यंत रहायचे. इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलाना लहान मुलांचे समूह बनविण्यासाठी मार्गदर्शन करायचे.
स्टेप 2
शाळा, गाव, वस्ती स्तरावर शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा आयोजित करणे.
आपल्याला सगळ्यांच्या मदतीने पालकांसाठी व मुलांसाठी मेळाव्याचे आयोजन करायचे आहे. या मेळाव्यात विविध क्रियाद्वारे पालक आपल्या मुलांकडून कशाप्रकारे शाळापूर्व तयारी करून घेऊ शकतात याबाबत समजावून सांगायचे आहे. इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व मुलांना शाळापूर्व तयारीचा एक सेट दिला जाईल. पालकांना विकास पत्राच्या मदतीने कृती समजावून सांगायच्या
आपल्याला काय करायचे आहे ?
प्रत्येक शाळा, गाव, वस्ती स्तरावर मेळाव्याचे आयोजन करायचे.पहिल्यांदा मुलांचे मूल्यमापन करून रिपोर्ट कार्ड दयायचे. आणि मूल्यमापनाची माहिती स्वतः सोबत ठेवायची. पालक व मुलाला school readiness pack दयायचे, टॅबलेट अथवा मोबाइलद्वारे व्हिडिओ दाखवून पालकांना ते काय करू शकतात याची माहिती दयायची.
स्टेप 3
पालक व मुले शाळापूर्व तयारीच्या कृती घरी तसेच गटांत करताना.मेळाव्यानंतर पालक आपल्या मुलांकडून शाळापूर्व तयारी करायला सुरुवात करतील. या दरम्यान आठवड्यातून एकदा पालक गटांना कृती कशा कराव्यात याबद्दल मार्गदर्शन करायचे, मार्च मे या दरम्यान १० से १२ वेळा आपण पालक गटांना भेटणार आहोत. Idea Cards च्या मदतीनेही आपण पालकांना मार्गदर्शन करणार आहोत..
आपल्याला काय करायचे आहे ?
जेव्हा पालक घरात व समूहामध्ये आपल्या मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी कृती करीत असतील तेव्हा गरजेनुसार पालकांच्या शंकाचे समाधान करायचे आणि त्यांना प्रोत्साहन दयायचे. प्रत्येक समूहाला आठवड्यातून एकदा भेटून Idea Card वर आधारित कृती करून घ्यायच्या आहेत, तसेच Idea Card वरील सूचनेनुसार व्हिडिओ दाखवायचे आहेत.
स्टेप 4
दुसरे मूल्यमापन आणि शाळापूर्व तयारी (मेळावा)
१० ते १२ आठवडे झाल्यानंतर मे / जून महिन्यात पुन्हा एकदा मेळावा आयोजित करणार आहोत. या मेळाव्यात विकास पत्राच्या मदतीने मुलांची प्रगती समजेल आणि शाळापूर्व तयारीचे प्रमाणपत्र दिले जाईल. जूनमध्ये पुन्हा शाळा सुरू होतील. यावेळी इयत्ता पहिलीत या मुलांचे विशेष स्वागत करण्यासाठी 'प्रवेशोत्सव' साजरा करायचा आहे.
आपल्याला काय करायचे आहे ?
जेव्हा पालक घरात व समूहामध्ये आपल्या मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी कृती करीत असतील तेव्हा गरजेनुसार पालकांच्या शंकाचे समाधान करायचे आणि त्यांना प्रोत्साहन दयायचे. प्रत्येक समूहाला आठवड्यातून एकदा भेटून Idea Card वर आधारित कृती करून घ्यायच्या आहेत, तसेच Idea Card वरील सूचनेनुसार व्हिडिओ दाखवायचे आहेत. आपल्याला काय करायचे आहे ? दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन मुलांची प्रगती पाहून प्रमाणपत्र वितरण गावातील मान्यवर व्यक्तींना बोलावून त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण, पालकांचे मनोगत ऐकणे,ही शाळापूर्व तयारी एखादया सणाप्रमाणे आनंदाने साजरी करायची आहे.
या चला!शाळेत पहिल्यांदाच जाणाऱ्या आपल्या मुलांची तयारी आपण मिळून करू या.
!!! सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!
शाळा पूर्व तयारी मेळावा माहिती वाचण्यासाठी डाउनलोड करा.