एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना आता भरावा लागणार कुटुंब तपशील नमुना-1 जुन्या फॅमिली पेंशन- ग्रॅच्युटी चा विकल्प नमुना-2

Rajan garud
0

एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना आता भरावा लागणार 

कुटुंब तपशील नमुना-1 

 जुन्या फॅमिली पेंशन- ग्रॅच्युटी चा विकल्प नमुना-2 



सर्व कार्यरत NPS/DCPS धारक कर्मचारी /शिक्षक/ अधिकारी बांधवांनी ( DCPS/NPS खाते असले नसले तरीही...) 31 मार्च 2023 च्या GR मधील कुटुंब तपशील (नमुना-१) व 1982- फॅमिली पेंशन व ग्रॅच्युटी विकल्पाचा फॉरमॅट (नमुना-२) असे दोन्ही फॉर्म पूर्ण भरून स्वाक्षरी करून आपापल्या आस्थापना / विभाग प्रमुख कार्यालयात लवकरात लवकर जमा करा.. 


नमुना 1

 


नमुना 2

 


तर मयत झालेल्या किंवा रुग्णता मुळे सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नमुना - 3 भरून द्यायचा आहे, मात्र तो आत्ताच देऊन उपयोग नाही, जेव्हा फॅमिली पेंशन - ग्रॅच्युटी प्रस्ताव सादर करणार तेव्हा तो त्या प्रस्तावासोबत द्यावा..

नमुना 3

 


फॅमिली पेंशन ग्रॅच्युटी चा प्रस्ताव नमुना लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल... संबंधित विभागाने नवीन प्रस्ताव नमुना दिल्यास तो वापरावा लागणार आहे, म्हणून सध्या कोणी फॅमिली पेंशन ग्रॅच्युटी चा प्रस्ताव टाकण्याची घाई करू नये, सुधारित परिपत्रक/ निर्देश येण्यासाठी थोडी वाट बघूया.. तोपर्यंत मयत कर्मचाऱ्यांचे मूळ मृत्यू दाखला, मूळ वारस प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे कुटूंबास तयार ठेवायला सांगा.. 


 शासन निर्णय डाउनलोड करा.

 



 सर्व सेवानिवृत्त DCPS/NPS कर्मचाऱ्यांना विनाअट ग्रॅच्युटी मिळणार आहे, त्यासाठी त्यांना ग्रॅच्युटी चा प्रस्ताव सादर करावा लागेल.. त्याबाबत ग्रॅच्युटी प्रस्ताव नमूना लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल..


तूर्तास एवढेच.. पुढील निर्देश लवकरच देऊ.. धन्यवाद


(टीप- सोबत नमुना-1,2,व 3 च्या फॉर्म ची PDF पाठवत आहे, ज्यात NPS वर काट मारली आहे, व जुनी पेंशन विकल्प कोरा ठेवला आहे, तो कोरा भाग तेवढा आपण भरून द्यावा.


संपूर्ण शासन निर्णय.. 

 

(पुन्हा एकदा लक्षात घ्या की कार्यरत कर्मचाऱ्यांनी फक्त नमुना 1 व 2 भरायचा आहे..) 


आपलाच-

विनायक चौथे

राज्य सोशल मीडिया प्रमुख,

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)