शाळासिद्धि बाह्यमूल्यमापन साठी जिल्ह्यातील निर्धारक व मुख्याध्यापक यांना आवश्यक सूचना.......

Rajan garud
0

 शाळासिद्धि बाह्यमूल्यमापन साठी जिल्ह्यातील निर्धारक व मुख्याध्यापक यांना आवश्यक सूचना....... 



शाळासिद्धि बाह्यमूल्यमापन निर्धारक शाळेत आले असता मुख्याध्यापकांनी उपलब्ध करावयाच्या बाबी....

१ ) सर्वप्रथम शाळा सिद्धिच्या सात क्षेत्रानुसार फाईल उपलब्ध ठेवाव्या. 


२ ) मागील वर्षीची 2020-21ऑनलाईन प्रिंट उपलब्ध ठेवावे.


३ ) त्याचबरोबर शाळेतील प्रत्येक क्षेत्रानुसार निवडक पुरावे फाईल मध्ये ऊपलब्ध ठेवावे.


बाह्यमूल्यमापन निर्धारक...

1) शाळेत जाण्यापूर्वी शाळेच्या मुख्याध्यापक यांना सूचना देतील.

2) शाळासिद्धि बाह्यमूल्यमापन दिवशी शाळेत शक्य असल्यास smc सदस्य व अध्यक्ष  यांना उपस्थित राहण्यासाठी सूचना देण्यास कळवावे.

3) शाळेत वेळेपूर्वी उपस्थित राहून....


A)परिपाठ ,परिसर ,वर्गखोल्या,

वाचनालय,प्रयोगशाळा, स्वयंपाकगृह व इतर निरिक्षण करून,नोंदी घेतील.


B) वर्ग निरीक्षण व विद्यार्थी संपादणूक पडताळणी करून,


C) अंतिम SMC सभेत संपूर्ण चर्चा करून,मुल्यमापन पूर्ण  करतील.


क्षेत्र-7 


मानके- 46 


एकूण गुण - 138

बाह्यमूल्यमापन निर्धारक म्हणून स्तर निश्चित करताना क्षेत्र व मानके (मुद्दे) निहाय लक्षात घ्यावयाच्या आवश्यक मानके विश्लेषण.....


स्तर 3 साठी  मानके निहाय  विश्लेषण मुद्दे.....

(पुरेश्या बाबी नसल्यास  स्तर 2 व नसल्यास स्तर 1)


 क्षेत्र 1 शालेय परिसर 

1.1 परिसर स्वच्छता व पुरेशी विद्यार्थी प्रमाणात जागा.

1.2  क्रीडांगण

क्रीडांगण पुरेशी जागा.

क्रीडा साहित्य मांडणी व यादी.

आंतर शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन.

1.3 वर्ग खोल्या व इतर खोल्या

वर्ग खोल्यात विषय कोपरे असावे.

विषय निहाय साहित्य मांडणी असावी.


1.4 वीज व इतर उपकरणे

मीटर जवळ किटकॅट(LCB) असावे.

1.5 वाचनालय

पुस्तके 1:5 प्रमाणात उपलब्ध. 

स्वतंत्र वाचनालय कक्ष.(अपवाद वर्ग 1ते4) 

वर्ग 1ते 8 साठी पुस्तक वर्गीकरण व वेळापत्रकात तासिका समावेश असेल.

पुस्तके घरी व शिक्षक वापर.

1.6 प्रयोगशाळा

स्वतंत्र प्रयोग शाळा कक्ष.(अपवाद वर्ग 1ते8) 

वर्ग 9 ते 12 साठी पूर्ण उपकरणे आवश्यकच व प्रयोग संधी

1.7 संगणक

स्वतंत्र संगणक कक्ष व इंटरनेट सुविधा.(अपवाद वर्ग 1ते5) 

संगणक इंटरनेट सुविधा व अध्यापनात वापर

1.8 उतार रस्ता

रॅम्प 1:12 प्रमाणात उपलब्ध असावा.

1.9 MDM स्वयंपाकगृह व भांडी स्वतंत्र स्वयंपाकगृह , पाककृती साठी जागा व भांडी वापरानंतर स्वच्छ .

1.10 पेयजल

अखंडित पाणीपुरवठा व स्वच्छता

स्वच्छ पाणी उपलब्ध

1.11 हात धुण्याची सुविधा

अखंडित पाणीपुरवठा व स्वच्छता पुरेश्या नळ तोट्या 

साबण वापर

1.12 स्वच्छता गृहे

मुले व मुली स्वतंत्र स्वच्छता गृहे

अखंडित पाणीपुरवठा व स्वच्छता

दिव्यांग बालकांसाठी व बालस्नेही स्वच्छता गृहे


 क्षेत्र- 2 अध्यापन अध्ययन आणि मूल्यमापन 

2.1 शिक्षकांची विद्यार्थ्यांविषयी जाणीव

लर्नल प्रोफाइल व त्यातील नोंदी विद्यार्थी व पालक फीडबॅक देतात/घेतात

2.2 शिक्षकांचे विषय ज्ञान आणि अध्यापन कौशल्य

विद्यार्थी वर्गात आंतरक्रिया  घडवून आणतात. 

विषय ज्ञान व अध्यापन कौशल्य अद्यावत करतात.

2.3 अध्यापनाचे नियोजन

विद्यार्थ्यांच्या अध्ययन गरजा लक्षात घेऊन,अध्यापनाचे नियोजन 

बाल केंद्रित अध्यापन

अध्यापनात योग्य साहित्याचा प्रमाणात वापर

(फक्त पाठ्यपुस्तकाचे धडे शिकवून अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे लक्ष असल्यास, लेवल एक)

2.4 अध्ययनक्षम वातावरण निर्मिती

वर्गामध्ये peer learning ला व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन विद्यार्थ्यांनी केलेले कार्य, तक्ते प्रदर्शीत 

विद्यार्थ्यांना वैयक्तिक नावाने उल्लेख.

2.5 अध्यापन अध्ययन क्रिया वर्गात प्रयोगाद्वारे संकल्पना स्पष्ट 

गृहकार्य तपासून योग्य प्रत्याभरण 

प्रोजेक्ट व संगणक वापर करून अध्ययन

(फक्त पाठ्यपुस्तके फळा असल्यास लेवल एक)

2.6 वर्ग व्यवस्थापन

ऍक्टिव्हिटी बेस्ट अध्यापन

वर्गात आणि वर्गाबाहेर जागेचे व्यवस्थापन

ग्रुप चर्चा  व pair लर्निंग

2.7 विद्यार्थ्यांचे मूल्यांकन

विद्यार्थ्यांचे मागील मूल्यांकनाचे विश्लेषण 

विद्यार्थी प्रगती व संपादनूक प्रत्याभरण 

रिपोर्ट कार्ड मध्ये वर्णनात्मक नोंदी

2.8 शैक्षणिक साहित्याचा उपयोग

शाळा व ग्रंथालय यांचा वापर इतर शाळांबरोबर इंटरनेट द्वारे संसाधनाची देवाण-घेवाण विज्ञान गणित भाषा प्रयोगशाळा यांचा वापर

(फक्त पाठ्यपुस्तक आधारित इतर साहित्याचा  उपयोग असल्यास,level 1)

2.9 शिक्षकांचे अध्यापन अध्ययन प्रशिक्षण बाबतची चिंतन

वैयक्तिक व  संगीत सांघिक नियोजन 

फलनिष्पत्तीच्या अनुषंगाने सुधारण्यासाठी नियोजन 

लेखी स्वरूपात नोंदी (सुधारणा)


 क्षेत्र 3 विद्यार्थ्यांची प्रगती संपादनूक आणि विकास 

3.1विद्यार्थ्यांची उपस्थिती

वक्तशीर आणि नियमितपणा विद्यार्थी प्रोत्साहन

नियमित विद्यार्थी कौतुक 

शालेय फलकावर उपस्थिती

3.2 विद्यार्थी सहभाग आणि कार्यप्रवणता 

सह शालेय उपक्रमाचे आयोजन प्राविण्य प्राप्त करण्यासाठी संधी व मार्गदर्शन

3.3 विद्यार्थ्यांची प्रगती 

CCE नोंदी

प्रत्याभरनाचा उपयोग वर्गांतर क्रियेसाठी

विद्यार्थी संपादणूक स्तर  तालुका/ जिल्हा/ राज्य

3.4 वैयक्तिक आणि सामाजिक विकास 

शालेय परिपाठ, दिनविशेष व विशेषदिन कार्यक्रम आयोजन गटकार्य. पालक/ समाज सभा

3.5 विद्यार्थी  संपादणूक सातत्यपूर्ण सुधारणा.

संपादणूक पातळी अपेक्षेप्रमाणे/ अधिक


 क्षेत्र 4 शिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकास मार्गदर्शन 

4.1नवीन शिक्षकांचे उद्बोधन


4.2 शिक्षकांची उपस्थिती


4.3 जबाबदाऱ्या व कामगिरीची ध्येय 


4.4अभ्यासक्रमाच्या बदलत्या

अपेक्षाप्रति शिक्षकांची तयारी


4.5 कामगिरीची देखरेख


4.6 शिक्षकांचा व्यावसायिक विकास


 क्षेत्र 5 शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन 

5.1दृष्टीची निर्मिती व दिशा निश्चिती 


5.2बदलाचे व सुधारण्याचे नेतृत्व 


5.3अध्ययन अध्यापन नेतृत्व


5.4 शालेय व्यवस्थापनाचे नेतृत्व


 क्षेत्र 6 समायोजन,आरोग्य आणि संरक्षण 

6.1 समावेशित संस्कृती 


6.2 CWSN समावेशन


6.3शारीरिक संरक्षण 


6.4मानसिक संरक्षण 


6.5आरोग्य आणि स्वच्छता


 क्षेत्र 7 उत्पादक समाजाचा सहभाग 


7.1 संघटन आणि शाळा  व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापन


7.2शाळा विकासनामधील भूमिका 


7.3 शाळा समाज संसाधन


7.4 समाज एक अध्ययन स्त्रोत


7.5 आरोग्य आणि स्वच्छता


(अधिक माहितीसाठी PDF पाहावी)





7 क्षेत्रांतील मानकांची priority ही खालील प्रमाणे भरावी.

स्तर 1 साठी priority ही High असेल, स्तर 2 साठी Medium तर स्तर 3 साठी Low येईल

स्तर 1 साठी 1 गूण, स्तर 2 साठी 2 गूण व स्तर 3 साठी 3 गूण आहेत. तुमच्या शाळेत असणाऱ्या विविध सुविधा आणि शाळेतील विविध घटक यातील फरक जाणून वरील योग्य त्या स्तरानुसार गुण द्यावे. यासाठी शाळा सिध्दी ची मराठी तील पुस्तिकेचे वाचन करावे.

मिशन (mission)स्टेटमेंट हे आगामी शैक्षणिक वर्षासाठी vission असते. 

School Improvement Plan (शाळा सुधारणेचे नियोजन) भरताना शाळा सुधारण्यासाठी आणखी कोणते प्रयत्न केले पाहिजे याविषयी अधिक सकारात्मक प्रतिसाद असावा.

शाळा सिद्धी गुणांकन, शाळा सिद्धी (Shaala Siddhi) श्रेणी 

अ- 112 ते 138 गुण

ब - 69 ते 111 गुण

क- 68 किंवा पेक्षा कमी गुण


'शाळा सिद्धी' शासन निर्णय GR 

1. शाळा सिद्धी 14 जुलै 17 

2. शाळा सिद्धी 30 मार्च 2016


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)