आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सातवा वेतन आयोग तिसरा हप्ता मिळणार नाही.
personRajan garud
मार्च १७, २०२३
0
share
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सातवा वेतन आयोग तिसरा हप्ता मिळणार नाही.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सातवा वेतन आयोग तिसरा हप्ता मिळणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक 13 मार्च 2023 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार सन 2022 23 या आर्थिक वर्षांमध्ये सातव्या वेतन आयोगातच्या तिसरा हप्त्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. या अगोदर या कार्यालयाकडील आदेशानुसार 2022 23 या आर्थिक वर्षात सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता देण्यात यावा असे निर्देश देण्यात आले होते.
परंतु आता दिनांक 13 मार्च 2023 रोजी च्या पत्रानुसार सन 2022 23 या आर्थिक वर्षांमध्ये लेखाशीर्ष निहाय शंभर टक्के तरतूद वितरित करण्यात आलेली असल्यामुळे उपलब्ध करून दिलेल्या निधीतून अथवा तरतुदी म्हणून सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता अदा करण्यात येऊ नये असे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, विभाग शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व व अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक सर्व यांना दिले आहेत. त्यामुळे जर आपण मार्च एंडिंग मध्ये सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता आपल्याला मिळेल यानुसार आपल्या आर्थिक नियोजन केलेले असेल तर सदर नियोजनात बदल करावा लागेल. कारण या आर्थिक वर्षात तरी निदान सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता आपल्याला मिळणार नाही.