शिक्षक बदली अभ्यासगट आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत - २०२३ ने धोरण ठरवण्यासाठी मागविल्या सूचना (गुगल फॉर्म लिंक)

Rajan garud
0

शिक्षक बदली अभ्यासगट  आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत - २०२३ ने धोरण ठरवण्यासाठी मागविल्या सूचना (गुगल फॉर्म लिंक) 




 

सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया अखेर दिनांक 21 मार्च 2023 रोजी बदलीचा सर्वात शेवटचा टप्पा म्हणजेच अवघड क्षेत्रातील जागा भरण्याचा टप्पा पूर्ण होऊन अवघड क्षेत्रासाठी बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या उपलब्ध झाल्या आहेत.

2022 मधील बदली प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदरच पुढील वर्षीच्या म्हणजेच 2023 मधील बदलीची प्रक्रिया ठरवण्यासाठी व नवीन धोरण राखण्यासाठी शासनाने शासन निर्णय निर्गमित करून पुणे जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून पुढील वर्षीचे बदलीचे धोरण ठरवण्यासाठी अहवाल मागितला आहे.

व माननीय आयुष प्रसाद यांचे अध्यक्षतेखालील सदर समितीने पुढील वर्षीची म्हणजेच 2023 मधील बदली प्रक्रिया या धोरणामध्ये शिक्षक नागरिक शिक्षक संघटना यांना सूचना मागविले आहे. सदर समितीने त्यासाठी गुगल फॉर्म तयार केलेला आहे सदर गुगल फॉर्म ची लिंक आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.


मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून सदर माहिती देण्यात आलेली आहे.




 सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना, शिक्षक यांना ७ एप्रिल २०२१ च्या आंतरजिल्हा शिक्षक बदलीच्या शासन निर्णयामध्ये बदल सुचवायचे असल्यास खालील गुगल फॉर्म भरावे. कृपया प्रत्येक नवीन बदल सुचवताना नवीन फॉर्म भरावा. सदरील फॉर्म अंतिम दिनांक २५  मार्च २०२३ पर्यंत भरावा. 


👇 गुगल फॉर्म लिंक.. 👇


https://forms.gle/QEaUAPXAGNbRMRTT9



     🌏 rajangarud.com🌏

✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤
    ✍️ श्री.राजन गरुड✍️
    🦅 गरुडझेप,पालघर🦅
      ☎️7875313385☎️
      LIKE SHARE SUBSCRIBE
༶༺𖠷◈═══🙏🏼═══◈𖠷༻༶

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)