बदलीपात्र शिक्षकांनी बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरावे ? (Eligible - Round 1) सविस्तर माहिती

Rajan garud
0

 



DOWNLOAD HERE



🚨बदली पोर्टल महत्त्वाचे🚨


बदली पोर्टल संवर्ग
4 बाबत सर्वसाधारण शंका


📌बदली पात्र शिक्षकाला खो नाही मिळाला तरीही त्याची बदली होईल का  ?


उत्तर 👉👉जर मी मला बदली नको असे स्वीकारले असेल आणि जर मला बदली पत्र फेरी 1 मध्ये अँड 2 मध्ये  (टॅग) नाही केले आणि मी ज्या झिलल्यात आहे तो अवघड नाही तरच शक्याता आहे 

नाही तर बदली पासून सुटका नाही. 



📌 जूनियर शिक्षक सीनियर शिक्षकाला खो देऊ शकतो का?


उत्तर 👉👉 या बदली मध्ये ज्युनियर सीनिअर असा काही नाही कोणी कोणाची ही जागा मागू शकतो



📌A या सेवाजेष्ठ शिक्षकांनी प्रशासकीय बदली फॉर्म भरला व B या सेवा कनिष्ठ शिक्षकांनी विनंती बदलीने प्राधान्यक्रम भरला तर अशावेळी B या ज्युनिअर शिक्षकाने A या सेवाजेष्ठ शिक्षकाची शाळा मागितली तर मिळेल का ? आणि मिळाली तर सेवाजेष्ठ शिक्षकाची बदली प्रक्रिया कशी होईल त्याला त्याचे प्राधान्य क्रमातील शाळा मिळतील का?


उत्तर 👉👉👉 सेवाजेष्ठ शिक्षकांचे राऊंड अगोदर चालतील. त्यामध्ये जर त्यांनी प्रशासकीय निवडले असेल व त्यांचा राऊंड होईपर्यंत खो मिळाला नाही परंतु नंतर  त्यांचा ज्युनियर शिक्षकाने खो दिल्यास  त्या नंतरच्या राऊंड मध्ये त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमातील शाळेचा विचार होईल.


📌एक युनिट म्हणून फॉर्म भरताना मागील वर्षी कोणत्याही प्रकारातून बदली झाली किंवा यावर्षी बदली पात्र ठरलेत असे 30 किलोमीटरच्या आतील पती-पत्नीला एक युनिट म्हणून फॉर्म भरता येईल का?



उत्तर 👉👉सिस्टम ला 30  किमी चे अंतर कळत नाही. आणि मागील सर्व बदलीच्या डेटा ची नोंद सिस्टम मध्ये नाही gr प्रमाणे ऑफलाइन कार्यवाही करावी सिस्टम ला चेक नाही 


📌30 km च्या आतील पती पत्नी पैकी एक जण बदलीपात्र ( ऑलरेडी tagged ) आहे व partner ला एका शाळेवर 4 वर्ष झालेत, एक unit बनून दोघांनीही  अर्ज केल्यास व दिलेल्या option पैकी गाव न मिळाल्यास दोघेही विस्थापित होतील की फक्त जो बदलीपात्र आहे तोच होईल?


उत्तर👉👉👉


1. One unit compulsory नाही

2. स्वीकारले तर दोघांची बादली होऊ शकते पण आवश्यक नाही की दोघांची होईल पण जो बादली पात्र आहे त्यांनची होणार

3. दोघे बादली पात्र असतील तर सेवा ज्येष्ठ जो असेल तोच एक एकक सिलेक्ट करू शकेल पण विकल्प दोघांना भरणे आवश्यक आहे नाही तर ते विस्तपीत होऊ शकेल

4.  शक्य तो एक शाळेत प्रयत्न केले जाईल पण नाहीच मिळाला तर 30 मधील 2 शाळांमध्ये नाही झाले तर मग जोडीदार जर बादली पात्र असेल तर त्याच्या विकलपने त्यांच्या सेवा ज्येष्ठ ने बदली केली जाईल . नाही झाली तर मग विस्तपित फेरीत परत विकल्प घेतले जातील इथे नाही झाली तर मग  जर अवघड क्षेत्रात जागा असेल तर तिथे आधी नाही तर जिथे असेल तिथे

5.  किंवा जेवढे उपलब्ध असतील त्यावेळी म्हणजे 30 किंवा त्याहून कमी असतील तर तेवढे. विकल्प देणे आवश्यक आहे.


📌 एक ल युनिट ला प्राधान्य मिळेल का ?


उत्तर 👉👉👉. नाही बदल्यांचे राऊंड हे केवळ सेवाजेष्ठतेनेच चालतील 


📌 बदली मध्ये अ व आ नुसार प्राधान्य मिळेल का ?


उत्तर 👉👉👉. नाही बदल्यांचे राऊंड हे केवळ सेवाजेष्ठतेनेच चालतील.


बदली नको ( प्रशासकीय ) असे निवडले तर बदली होईल का?


उत्तर 👉👉 बदली नको   = एखाद्या बदली पात्र  शिक्षकास कोणीही टॅग केले नाही किंवा त्या जिल्ह्यातील  अवघड क्षेत्रात रिक्त पद नसेल तर त्या बदली पात्र शिक्षकाची बदली होणार  नाही.


📌एक युनिट मधून फॉर्म भरतांना दोघांनाही पसंतीक्रम भरणे अनिवार्य आहे का ?


उत्तर 👉👉👉 जर दोघेही बदली पात्र असतील तर दोघांनाही भरावा लागेल.

जर एक बदली पात्र असेल व जोडीदार बदली पात्र नसेल तर केवळ बदली पात्र नेच पसंतीक्रम भरावा या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यावी युनिट मधून फॉर्म भरणे हे अनिवार्य नसून ते ऐच्छिक आहे.


📌 मी भरलेले पसंतीक्रम बदलू शकतो का?


उत्तर   👉👉वेळापत्रकानुसार तुम्ही दिलेल्या कालावधीत कितीही वेळा बदलू शकता परंतु कालावधी संपल्या नंतर कोणत्याच परिस्थितीत कोणत्याच लॉगीन मधून बदल होणार नाहीत.


📌एका शिक्षकाचे सर्व पसंतीक्रम अगोदर बघितले जातील की प्रत्येकाचा प्रथम पहिला पसंतीक्रम नंतर प्रत्येकाचा दुसरा असे बघितले जाईल ?


उत्तर 👉👉👉 प्रत्येकाचे सर्व पसंतीक्रम  पडताळूनच दुसऱ्याचा राउंड लागणार.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)