पुन्हा शिक्षक बदली प्रक्रिया 2022 पुढे ढककली नवीन वेळापत्रक जाहीर
Teacher transfer 2022 postpone new timetable
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरू आहे. सदर बदली प्रक्रिया ज्या पोर्टलवर सुरू आहे त्यामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे संवर्ग ४ मधील शिक्षकांना फॉर्म भरण्यासाठी तारीख वाढवून द्यावी लागली आहे. त्यामुळे एकंदरीत सर्वच बदली प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी खालील pdf पहा.
आजचे ग्रामविकास विभागाचे सुधारित वेळापत्रक.
आज दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याबाबत सुधारित वेळापत्रक पुढील प्रमाणे.
दिनांक 20 डिसेंबर 2022 च्या वेळापत्रकात सुधारणा करून आज ग्रामविकास विभागाने जिल्हा अंतर्गत बदलीचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे निर्मित केले आहे.
यानुसार बदली पात्र शिक्षक संवर्गच्या यांना दिनांक 21 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 पर्यंत शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी मुदत देण्यात आलेली होती ती वाढवून आता 24 जानेवारी ऐवजी बदली अधिकार प्राप्त संवर्ग चार मधील शिक्षक 26 जानेवारी 2023 पर्यंत आपला शाळांचा प्राधान्यक्रम बदली पोर्टलवर नोंदवू शकतील..
31 जानेवारी 2023 पर्यंत बदली पात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया पोर्टल राबवेल.
तर एक फेब्रुवारी 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पुन्हा रिक्त पदांची यादी प्रकाशित करतील.
संवर्ग चार मधून विस्थापित झालेल्या शिक्षकांना शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक दोन फेब्रुवारी 2023 ते दिनांक 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी मुदत असणार आहे.
विस्थापित शिक्षकांच्या बदल्या पोर्टल दिनांक 12 फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण करेल.
13 फेब्रुवारी 2023 रोजी पुन्हा रिक्त पदांची यादी जाहीर होईल.
सुगम क्षेत्रात सलग दहा वर्षे ज्यांची सेवा झालेली आहे अशा शिक्षकांची यादी दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर होईल.
अवघड क्षेत्रात राहिल्या रक्त जागा भरण्याचा राऊंड 18 फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण होईल.
तर अवघड क्षेत्रातील राहिलेल्या जागा भरण्यासाठी पोर्टल 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत प्रक्रिया पूर्ण करेल.
आणि याच वेळापत्रकाप्रमाणे संपूर्ण बदली प्रक्रिया पूर्ण झाली असता दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी हे झालेल्या बदलांची आदेश पोर्टलवर प्रसिद्ध करतील.
Download वर क्लिक करा.