इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षणाच्या आयोजनाबाबत..

Rajan garud
0

 इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी निपुण भारत 

 अध्ययन अभ्यास सर्वेक्षणाच्या आयोजनाबाबत..




राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. भारत सरकारने निपुण भारत अभियान अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता तिसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्यानुसार राज्यामध्ये सन २०२६-२७ पर्यंत इयत्ता तिसरीच्या पर्यंतच्या १००% विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी तसेच इयत्ता तिसरीच्या पुढे गेलेल्या/अपेक्षित क्षमता प्राप्त न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

सन २०१७ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी अध्ययन निष्पत्ती प्रसिद्ध केल्या आहेत. राज्यामध्ये सन २०१७-१८ मध्ये प्रत्येक शाळेसाठी अध्ययन निष्पत्ती पुस्तिका यांचे वाटप करण्यात आलेले होते. तसेच या अध्ययन निष्पत्ती पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा सुरवातीला देण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांची शैक्षणिक संपादणूकीचे मूल्यमापन अध्ययन निष्पत्तीच्या आधारे करणे अपेक्षित आहे. सन २०१७ व २०२१ राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS ) तसेच पायाभूत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण(FLS) –२०२२ हे अध्ययन निष्पत्तीच्या आधारेच घेण्यात आलेले आहे. यापुढील काळात होणारी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS ) व राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS) अध्ययन निष्पत्तीवरच आधारित असणार आहेत. 

राज्यस्तरावरून विद्याप्रवेश, निपुण भारत अभियान, १०० दिवस वाचन अभियान, पुण भारत शिक्षण परिषद, निष्ठा प्रशिक्षण ३.०, सेतू अभ्यास, समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत विविध उपक्रम, शाळापूर्व तयारी मेळावे इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहेत. संदर्भ क्र. ७ नुसार सन २०२२- २३ या कालावधीसाठी विभागास दिलेल्या KRA मधील पहिले उद्दिष्ट “ प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत (Learning Outcomes ) मध्ये १० टक्केने वाढ करणे" हे आहे. हे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे आणि त्यानुसार अध्ययन संपादणूक वाढीसाठी कोणत्या शैक्षणिक उपक्रमाची आखणी करावी, याअनुषंगाने इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण २०२२ - २३ मध्ये करण्यात येणार आहे. 

· 

 

अ) निपुण भारत : अध्ययन अभ्यास सर्वेक्षण मुख्य उद्दिष्टः 

“प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त /संपादित केलेल्या आहेत हे पडताळणे व त्यानुसार शिक्षकांनी उपचारात्मक अध्यापन करणे.” 

वरील उद्दिष्टास अनुसरून इयत्ता दुसरी ते पाचवीमधील विद्यार्थ्यांचे निपुण भारत : अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने पूर्वीच्या / पाठमागील इयत्तेची अध्ययन निष्पत्ती / अध्ययन क्षमता प्राप्त केली आहे किंवा नाही तसेच ती/त्या किती प्रमाणात प्राप्त केलेली/ केलेल्या आहेत, याची तपासणी केल्यास विद्यार्थ्यांना ज्या विषयामध्ये / अध्ययन निष्पत्तीमध्ये / अध्ययन क्षमतेमध्ये अडचणी असतील त्यासाठी कृती कार्यक्रम आखून अंमलबजावणी करणे सोयीचे होईल आणि प्रत्येक विद्यार्थी प्रभुत्त्व पातळीकडे वाटचाल करू शकेल. सदर सर्वेक्षण हे शिक्षक व विद्यार्थी यांना अध्ययन-अध्यापनास मदत करण्याच्या हेतूने घेण्यात येणार आहे. 

ब) निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण अंमलबजावणीबाबत सूचना 

१. निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण हे केवळ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात यावे. 

२. इयत्ता दुसरी ते पाचवीच्या निपुण भारत : 

अध्ययन अभ्यास सर्वेक्षणाचे साधन परिषदेच्या https://www.maa.ac.in संकेतस्थळावर खालीलप्रमाणे इयत्ता निहाय व विषय व माध्यम निहाय उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच प्रस्तुत सर्वेक्षण हे कसे करावे, याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शिक्षकांनी सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी. 

माध्यम 

अ. क्र. 

१ 

इयत्ता दुसरी ते पाचवी 

विषय 

प्रथम भाषा 

२ 

दुसरी ते पाचवी 

गणित 

चौथी व पाचवी 

४ दुसरी ते पाचवी 

मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी, 

कन्नड, तमिळ, तेलगू, 

परिसर अभ्यास: भाग १ व २ गुजराती, बंगाली, सिंधी तृतीय भाषा 

इंग्रजी 

३. सर्वेक्षणाचे साधन सर्वाना ऑनलाईन पाहता येतील, डाउनलोड करता येतील. शिक्षकांना आपल्या इयत्तेची /विषयाची सर्वेक्षण साधने (Tools) डाउनलोड करण्यास सूचना द्याव्यात. त्याची एकच प्रिंट अथवा झेरॉक्स काढण्यास सांगावे. प्रती विद्यार्थी सर्वेक्षण साधन प्रिंट अथवा झेरॉक्स काढण्याची आवश्यकता नाही. 

४. शिक्षकांनी सर्वेक्षण साधन कसे वापरावे, याबाबत शिक्षकांसाठी सर्वसाधारण सूचना परिषदेच्या 

संकेतस्थळावर देण्यात येत आहेत. 


५. इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी तृतीय भाषा इंग्रजी विषयाचे सर्वेक्षण साधन वेबसाईटवर उपलब्धकरून देण्यात येत आहे, तृतीय भाषा इंग्रजी व्यतिरिक्त इतर तृतीय भाषा विषयाचे सर्वेक्षण साधन वेबसाईटवर उपलब्ध असणार नाही, त्यासाठी शाळांनी अथवा शिक्षकांनी इतर माध्यमाप्रमाणे सर्वेक्षण साधन स्वत: तयार करावे व सर्वेक्षणाची अंमलबजावणी करावी. 

६. सदर सर्वेक्षण हे शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे मौखिक स्वरुपात घ्यावयाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षकांनी स्वतंत्र सर्वेक्षण करावयाचे आहे. यासाठी साधारणपणे प्रती विद्यार्थी, प्रती विषय सर्वेक्षण कालावधी सर्वसाधारणपणे १० ते १५ मिनिटाच्या असणार आहे. मात्र यामध्ये विद्यार्थी प्रतिसादनुसार लवचिकता असेल. 

७. सदर सर्वेक्षण साधनासाठी गुण असणार नाहीत मात्र सर्वेक्षण साधनामधील प्रत्येक प्रश्नासाठी 

मूल्यांकन रुब्रिक असणार आहे. 

८. प्रत्येक अध्ययन निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नावर आधारित मूल्यांकन रुब्रिक नुसार 

विद्यार्थी अध्ययन श्रेणी निश्चित करावयाची आहे. प्रत्येक प्रश्नाच्या रुब्रिकमध्ये चार मूल्यांकन निकष असणार आहेत. प्रत्येक निकषाला ०, १, २ व ३ अशी श्रेणी देण्यात आलेली आहे. यामुळे प्रत्येक मूल्यांकन रुब्रिकनिहाय आलेल्या विद्यार्थी प्रतिसादाचे / उत्तराचे वर्गीकरण खाली दिलेल्या स्तरावर होईल. 

१. प्रारंभिक (Below Basic / Beginners) 

या स्तरामधील विद्यार्थ्यांच्या संबधित विषयाच्या / विषयाची अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी ज्ञान व कौशल्ये पुरेशा प्रमाणात प्राप्त /संपादित झालेली / झालेल्या नसतात. या विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या प्रत्येक टप्प्यावर खूप मार्गदर्शनाची, प्रोत्साहन देण्याची गरज असते. 

२. प्रगतशील (Basic /Progressive ) 

या स्तरामधील विद्यार्थ्यांने संबधित विषयाच्या / विषयाची अध्ययन निष्पत्तीमधील किमान ज्ञान व कौशल्ये प्राप्त/संपादित केलेली असतात. हे विद्यार्थी सामान्य सूचनांचे/नियमांचे पालन/अनुकरण करतात. त्यांच्याकडे काही चांगल्या कल्पना असतात. मात्र त्यामध्ये सुसंगतता नसते. अध्ययनाच्या अनेक टप्प्यावर यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. सामान्य समस्या ते तर्काने सोडवू शकतात. या पातळीवरील विद्यार्थी सोप्या भाषेत आपले म्हणणे अभिव्यक्त करतात. 

३. प्रवीण (Proficient) 

या स्तरामधील विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती बऱ्याच प्रमाणात प्राप्त /संपादित केलेल्या असतात. या स्तरावरील विद्यार्थी कमीत कमी निरीक्षणाखाली ते आपले कार्य स्वतंत्रपणे 

करतात. पद्धतशीरपणे ते आपली समस्या निराकरण करतात. स्वत:च्या कल्पना ते इतरांना स्पष्टपणे सांगतात. कमीत कमी मार्गदनाखाली व पर्यवेक्षणाखाली ते नवीन कल्पना 

मांडतात किंवा निर्माण करतात. 

४. प्रगत (Advanced) 

या स्तरामधील विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती पूर्ण संपादित/ प्राप्त केलेल्या असतात. अशा विद्यार्थ्यामध्ये उच्च विश्लेषण क्षमता, तार्किक क्षमता, चिकित्सक विचार, प्रभावी संप्रेषण कौशल्य, स्वतंत्र विचार क्षमता, सृजनशीलता असते. असे विद्यार्थी काही एकत्रित संकल्पना अथवा कल्पना याद्वारे नवीन ज्ञानाची निर्मिती करतात. या स्तरामधील विद्यार्थी कठीण समस्येचे निराकरण करतात. प्राप्त परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असते. 

८) विद्यार्थ्यास शिक्षकांनी मूल्यांकन रुब्रिकमधील जास्तीत जास्त वरची श्रेणी / स्तर मिळावेत या हेतूने विद्यार्थ्यांना सर्वेक्षण पूर्वी अथवा सर्वेक्षणाच्यावेळी अतिरिक्त मदत करू नये, असे केल्यास विद्यार्थ्यास नेमक्या कोणत्या अध्ययन निष्पत्ती संपादित करण्यामध्ये अडचणी आहेत, हे समजू शकणार नाही. त्यामुळे त्यास उपचारात्मक अध्यापन करण्यास मदत होणार नाही. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी सर्वेक्षण करण्यात यावे. 

९) दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर सर्वेक्षण घेण्याबाबतचा निर्णय संबधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी. 

१०) प्रस्तावित सर्वेक्षणाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. 

इयता इयत्ता २ री ते ५ वी 

विषय 

कालावधी 

वेळ 

प्रथम भाषा 

२२ ते २४ डिसेंबर २०२२ 

शाळेच्या वेळेत 

इयत्ता २ री ते ५ वी 

गणित 

२६ ते २८ डिसेंबर २०२२ 

शाळेच्या वेळेत 

इयत्ता २ री ते ५ वी 

तृतीय भाषा 

२९ ते ३१ डिसेंबर २०२२ 

शाळेच्या वेळेत 

इयत्ता ४ थी ते ५ वी 

परिसर अभ्यास भाग १ 

०२ ते ०४ जानेवारी २०२३ 

शाळेच्या वेळेत 

इयत्ता ४ थी ते ५ वी 

परिसर अभ्यास भाग २ 

०५ ते ०७ जानेवारी २०२३ 

शाळेच्या वेळेत. 

११) सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल, याची दक्षता घ्यावी. शाळेमध्ये असणारे वर्ग, शिक्षक व विद्यार्थी यांचे संख्येनुसार तसेच शालेय सुट्टी चा कालावधी विचारात घेऊन नियोजन करण्याची लवचिकता शाळांना वरील वेळापत्रकामध्ये असेल. वर्गातील विद्यार्थी पटसंख्येवर आधारित सदर कालावधी कमी अथवा जास्त होऊ शकतो. 

१२) प्रस्तुत सर्वेक्षण हे कसे करावे, याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या यु-ट्यूब वाहिनीद्वारे शिक्षकांसाठी उद्बोधन सत्राचे आयोजन दि. २० डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ ते ०१:३० या कालावधीमध्ये करण्यात येईल. यु-ट्यूब लिंक जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) व शिक्षण विभाग (प्राथमिक) जि. प. / म. न. पा. (सर्व) यांना पाठविण्यात येईल. तसेच सदर उद्बोधन सत्राची यु-ट्यूब लिंक Whats App ग्रुपवर देखील पाठविण्यात येईल. तरी 


3 सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व दुसरी ते पाचवीच्या शाळामधील शिक्षक व मुख्याध्यापक यांना उद्बोधन 

सत्रास उपस्थित राहण्यास सांगावे. 


इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी निपुण भारत   अध्ययन अभ्यास सर्वेक्षणाच्या आयोजनाबाबत.शासन परिपत्रक साठी इथे क्लिक करा.


१३) निपुण भारत: अध्ययन सर्वेक्षण श्रेणी नोंद संकलन पत्रक सोबत जोडण्यात येत आहे. या प्रपत्रामध्ये शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीनिहाय श्रेणी मूल्यांकन रुब्रिकच्या आधारे निश्चित करता येणार आहेत. 

१४) निपुण भारत : अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद संकलन पत्रकाच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबाजवणी करावी, जेणेकरून प्रारंभिक (Below. Basic) व प्रगतशील (Basic) स्तरावरील विद्यार्थी अधिकाधिक प्रवीण (Proficient) व प्रगत (Advance) स्तरावर असतील. 

१५) निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी संकलन प्रपत्राची विद्यार्थीनिहाय माहिती. शाळास्तरावर एकत्रित करून ठेवण्यात यावी. राज्यस्तरावर एकत्रित माहिती येण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची इयत्ता व विषयनिहाय संकलित स्वरूपात माहिती शाळा अथवा शिक्षक यांना सरल पोर्टलवर भरणे आवश्यक असणार आहे. सरल पोर्टलवर निपुण भारत : अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी संकलन प्रपत्राच्या आधारे नोंदी करणेबाबतच्या सूचना यथावकाश देण्यात येतील. 

१६) पर्यवेक्षीय अधिकारी ज्या वेळी शाळाभेटीला देतील त्यावेळी विद्यार्थी संपादणूक स्तर व विद्यार्थीनिहाय राबविण्यात येणारा कृति-कार्यक्रम याबाबत चर्चा करण्यात यावी. पर्यवेक्षीय अधिकारी यांनी बहुतांस विद्यार्थी वरच्या स्तरावर / पातळीवर कसे जातील यादृष्टीने शिक्षकांना शैक्षणिक सहाय्य, मार्गदर्शन व प्रोत्साहन द्यावे. 

क) पर्यवेक्षीय यंत्रणा व शिक्षक सक्षमीकरण अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण कालावधीत करावयाच्या भेटीबाबत 

१) जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन जिल्हा स्तरावरून करावे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, प्राचार्य व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी एकत्र बसून त्याचे नियोजन करावे. 

२) जिल्हा स्तरावरून केलेले नियोजन त्या त्या तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे. 

३) सर्वेक्षण कालावधीपैकी आठवड्यातून दोन दिवस वेगवेगळ्या दोन शाळेस (एका दिवशी एक 

शाळा) अधिकाऱ्यांची भेट होईल असे नियोजन करावे. 

४) भेटी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण काळात कोणत्याही विद्यार्थ्यास कोणत्याही अनाहूत सूचना 

देऊ नयेत, जेणेकरून त्याचे लक्ष विचलित होईल. 

५) भेटीच्या दिवशी अधिकारी ज्या शाळेत जाणार आहे, त्या शाळेतील वेगवेगळ्या किमान ४ विद्यार्थ्याचे वेगवेगळ्या विषयांचे सर्वेक्षण (एक विद्यार्थी एकाच विषयाची सर्वेक्षण चाचणी) 



उद्बोधन 

शिक्षक सर्वसाधारण सूचनेप्रमाणे करावे. विषयनिहाय निपुण भारत : अध्ययन सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्रकामध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय नोंदी कराव्यात. सदर नोंदी आपल्या सोबत जपून ठेवाव्यात व तसेच शिक्षकांना सुद्धा या नोंदी ठेवण्यास सांगावे. 

६) ज्या विद्यार्थ्याचे संबधित विषयाचे शिक्षकांनी/अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले आहे, पुन्हा त्यांच विद्यार्थ्याचे झालेल्या विषयाचे सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी / शिक्षकांनी करू नये. मात्र अधिकाऱ्यांनी केलेल्या विषयनिहाय निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्रकामधील संबधित विद्यार्थ्याच्या नोंदी शिक्षकांनी आपल्याकडे सुद्धा घ्याव्यात. 

उपरोक्त सूचनांचा विचार करून निपुण भारत : अध्ययन अभ्यास सर्वेक्षण उपरोक्त नमूद नियोजनाप्रमाणेच होईल याची नोंद घ्यावी. सर्वेक्षण वेळापत्रकामध्ये स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन बदल करता येईल. वरीलप्रमाणे आपल्या अधिनस्त शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांचेकरिता निपुण भारत : अध्ययन अभ्यास सर्वेक्षणाच्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)