पालघरमधील २ नवोपक्रमशील शिक्षक गुजरातमध्ये राष्ट्रीय गौरव शिक्षण ॲवार्डने सन्मानित

Rajan garud
0

पालघरमधील २  नवोपक्रमशील शिक्षक  गुजरातमध्ये राष्ट्रीय गौरव शिक्षण ॲवार्डने सन्मानित 



महाराष्ट्र  राज्यातील, पालघर जिल्ह्यातून, पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कर्दळ येथील शिक्षक श्री.राजन गौतम गरुड व डहाणू तालुक्यातील सौ.शिल्पा बळवंत वनमाळी ,जिल्हा परिषद शाळा आगवन नवासाखरा या शाळेतील शिक्षिका या दोन नवोपक्रमशील शिक्षकांना राष्ट्रीय गौरव शिक्षक अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.


भारतातील नाविन्यपूर्ण उपक्रम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी गुजरात मध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय शिक्षक नवोपक्रम संमेलनामध्ये रविवार, दिनांक ११ डिसेंबर 2022 रोजी  हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुजरातच्या टीम
मंथन संस्थेने शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या देशातील 16 राज्यातून 172 शिक्षकांचा राष्ट्रीय गौरव शिक्षक अवॉर्ड देऊन सन्मान केला. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 11 शिक्षक निवडले गेले होते आणि यातून पालघर जिल्ह्यातून या दोन उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रम गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील ऊंझा येथे हा सन्मान सोहळा पार पाडण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व विश्वशांती अवॉर्ड विजेते धर्मेंद्र आचार्य व डॉ.भावेश पांड्या सर ( गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 5 टाईम)यांनी  शिक्षकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्रक व पुस्तक  देऊन सन्मानित केले.


संपूर्ण पालघर जिल्ह्यातून नाविन्यपूर्ण उपक्रमांनी आपल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास करण्याचा सतत प्रयत्न करणाऱ्या  श्री .राजन गौतम गरुड आणि सौ .शिल्पा बळवंत वनमाळी   या दोन्ही  शिक्षकांचे कौतुक केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)